अभिनेता सुनिल शेट्टीची लेक आथिया लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही वर्षांपासून क्रिकेटर केएल राहुलसह आथियाच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. मागच्या वर्षीच त्यांनी हे नातं चाहत्यांसमोर जाहीर केलं. आता आथिया तिच्या बॉयफ्रेंड केएल राहुलसह लवकरच लग्नदेखील करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्याच्या आत दोघं लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. दोघांच्या घरी लगीनघाई सुरू झाली असून सारं काही आथियाच्या मनाप्रमाणेच असणार आहे.
कसा रंगणार लग्नसोहळा
केएल राहुल नुकताच त्याच्या सर्जरीनंतर जर्मनीहून परतला आहे. त्याला जून महिन्याच्या आठ तारखेला एका ट्रेनिंग सेशनमध्ये कंबरेत दुखापत झाली होती. तीस जूनला त्याने चाहत्यांना तो बरा असल्याचं सोशल मीडियावरून जाहीर केलं होतं. आता तर तो पुन्हा घरी परतला आहेत. त्यामुळे आता आथियाने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय पक्का केला आहे. लवकरच म्हणजे पुढील तीन महिन्याच्या आत आथिया आणि केएल राहुल लग्न करणार आहेत. दोघांनी यासाठी आपापल्या घरच्यांना तयार केलं असून थाटामाटात लग्नसोहळा करण्याचं प्लॅनिंग सुरू झालं आहे. प्रत्येक वधूचं लग्नाबाबत एक स्वप्न असतं. आथियाच्याही लग्नाबाबत खूप काही इच्छा आहेत. त्यामुळे हा संपूर्ण सोहळा आथिया स्वतः मॅनेज करणार आहे. लग्नात असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींवर तिचं बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे हा लग्नसोहळा आथिया शेट्टीला हवा तसाच असेल.
आथिया आणि केएल राहुलची लव्हस्टोरी
आथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मागच्या वर्षी त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नातं जगासमोर जाहीर केलं होतं. त्यानंतर ते सर्वांसमोर जाहीरपणे आपलं प्रेम व्यक्त करू लागले. आता या नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. एकमेकांच्या कुटुंबासोबत चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांनी मुंबईत स्वतःसाठी घर देखील पाहिलं आहे. लग्नानंतर आथिया आणि केएल राहुल नव्या घरी शिफ्ट होणार आहेत. लग्नाची तारीख अजून जाहीर झाली नसली तरी तीन महिन्याच्या आत आथियाच्या घरी सनईचौघडे वाजण्याची शक्यता आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje