Fitness

अक्कल दाढ येतेय, ही आहेत अक्कल दाढ येण्याची लक्षणे

Leenal Gawade  |  Jan 18, 2021
अक्कल दाढ येतेय, ही आहेत अक्कल दाढ येण्याची लक्षणे

 शरीराची सगळी दुखणी परवडली. पण दातांचं दुखणं अजिबात नको असे नेहमीच म्हटले जाते. दात दुखायला लागले की, जीव अगदी नकोसा होतो. दातांचे दुखणे हे काही साधेसोपे आणि घरगुती इलाजांनी बरे होईल असे नसते. त्यात जर हे दुखणे अक्कल दाढेचे असेल तर पाहायलाच नको. अक्कल दाढ येण्याचे ठराविक असे वय नाही. पण साधारण विशी पार केली की अक्कल दाढ येते असं म्हणतात. अक्कल दाढेविषयी अनेकांची वेगवेगळी मत आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल अगदी निश्चित आणि शास्त्रशुद्ध माहिती देता येणार नाही. पण तुम्हाला अद्याप अक्कल दाढ (Wisdom Tooth) आलेले नसतील तर तुम्हाला दातांचे निरीक्षण करणे फारच गरजेचे आहे. अक्कल दाढ येताना काही ठराविक लक्षणे अगदी हमखास जाणवतात. जर तुम्हालाही अक्कल दाढ येणार असतील तर घरगुती उपाय करा. पाहुयात अक्कल दाढ येण्याची ही काही लक्षणं.

 

हिरड्या दुखणे

Instagram

लहान मुलांना ज्यावेळी दात येतात. तेव्हा ते सतत रडतात. त्यांना जुलाब लागतात. त्यांची सतत चिडचिड होत राहते. लहान मुलांच्या कोवळ्या हिरड्या फोडून दात येताना जसा त्रास होता. त्याहून दुप्पट त्रास हा मोठेपणी हिरड्या फाडून बाहेर येताना येतो. दाढ येताना अशाप्रकारे हिरड्या दुखणे हे अगदी सर्वसाधारण लक्षण आहे. जर तुमच्या हिरड्या अगदी मागच्या बाजूला ( अक्कल दाढ) येतात त्या ठिकाणी सुजल्या असतील. अगदी जरासा धक्का लागल्यावर त्या दुखू लागल्या असतील तर समजून जावे की, तुम्हाला अक्कल दाढ येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.अक्कल दाढ ही एकाएकी पटकन येत नाही. ती येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. जर तुम्हाला असा त्रास होऊ लागला की, लगेच डॉक्टरांकडे जा.कारण ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील.

चिडचिड होणे

अक्कल दाढ येताना जो त्रास होतो. ज्याचा परिणाम म्हणजे सतत चिडचिड होत राहणे. खूप जणांमध्ये जाणवणारे हे लक्षण आहे. दाढ येताना हिरड्या इतक्या दुखतात की काहीही खाताना खूप त्रास होतो. त्यामुळे अगदी क्षुल्लक गोष्टीवरुन चिडचिड होणे अगदी स्वाभाविक असते. अशी सतत चिडचिड होत असेल तर तुम्ही थोंड धीराने घेणं गरजेचे आहे. रागामुळे तुमचा आहारा आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष होऊ शकते. जे तुमच्या आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही.

ताप येणे

लहान मुलांप्रमाणे अक्कल दाढ येताना ताप येणे हे अगदी स्वाभाविक आहे. खूप जणांना दात येताना ताप येतो. हा ताप इतका जास्त असू शकतो की, साथीच्या तापाप्रमाणे तुम्हाला काही दिवसांसाठी हा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही योग्य औषधोपचार घ्या. हिरड्या फाडून अक्कल दाढ येते. तिची दिशा आणि आकार ठरलेला नसतो. त्यामुळे कधीकधी ती वाकडी येताना इतका त्रास होतो की, त्यामुळे कणकण जाणवणे ते अगदी 100 डिग्रीपर्यंत ताप येणे अगदी स्वाभाविक असते.

कान दुखणे

Instagra

अक्कल दाढ येताना कान दुखीचा त्रास होणेही अगदी स्वाभाविक आहे. खूप जणांना कानदुखी होणे हे अगदी यामध्ये ठरलेले लक्षण आहे. तुम्हाला जर तुम्हाला कानात सतत ठणकत असेल आणि वरील सगळी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही दातांचे एकदा चेकअप करुन घ्या. कारण अक्कल दाढ येतानाही अशा प्रकारे कानदुखी होते हे अनेकांचे अगदी ठरलेले लक्षण आहे.

जाणून घ्या दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय- Home Remedies For Toothache In Marathi

डोकं दुखणे

दातांचा  होणारा हा त्रास इतका तापदायक असतो की त्यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास ही होतो. दाढेचे दुखणे इतके त्रासदायक असते की, त्यामुळे ज्याबाजूला दाढ येते त्या ठिकाणी अगदी हमखास डोकेदुखी होत राहते. पण याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा अक्कल दाढेची काळजी घ्या. 

तर ही काही लक्षणं आहेत जी तुम्हाला अक्कल दाढ येताना अगदी हमखास जाणवतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

तुमचे smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का

Read More From Fitness