संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या चित्रपटातील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील (Sachit Patil), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), हेमांगी कवी (Hemangi Kavi), पुष्कर जोग (Pushkar Jog), नागेश भोसले (Nagesh Bhosale), मृणाल देशपांडे (Mrunal Deshpande), मनमीत पेम (Manmit Pem), आयुषी भावे (Ayushi Bhave), भरत जाधव (Bharat Jadhav) यांच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये सिद्धार्थ म्हणतो बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार? हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना 24 जूनला मिळणार आहे. याशिवाय ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सचित आणि सोनालीचा रॉकिंग डान्सही पाहायला मिळत आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.
नृत्याला दिलेले आधुनिक रूप चित्रपटाची खासियत
‘तमाशा लाईव्ह’बद्दल दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) म्हणतात, ” ‘तमाशा लाईव्ह’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे. चित्रीकरणाआधी आमची अडीच महिने कार्यशाळा सुरु होती. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच या कलाकारांना व्यक्तिरेखेशी एकरूप होणे जरा कठीण जात होते. त्या व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय मिळत नसल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त होत होती. मात्र अडीच महिन्यांनी हे चित्र पूर्णपणे पालटले. मला आठवते, चित्रीकरण संपल्यानंतर एकदा एडिटला बसल्यावर मला सोनालीची एक लाईन सापडत नव्हती आणि ती त्यावेळी एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. मी तिला फोन केला आणि अल्पावधीतच तिने मला व्हॉट्सअपवर संपूर्ण सीन रेकॉर्ड करून पाठवला. एवढी ती त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झाली होती आणि तीच नाही तर चित्रपटातील प्रत्येक कलाकार अडीच महिन्यांनी आपापल्या व्यक्तिरेखेशी जोडले गेले होते.”
म्युझिकल ट्रीट प्रेक्षकांसाठी
‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ज्या वेळी संजय जाधवने ‘तमाशा लाईव्ह’ची संकल्पना मला ऐकवली, तेव्हाच मला यात काहीतरी अफलातून असल्याचे जाणवले. ‘तमाशा लाईव्ह’ या धमाकेदार नावातच खूप काही दडले आहे. जे चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना कळेलच. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची निवड ही अतिशय अचूक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर हे दिग्गज एकत्र आले आहेत. त्यामुळे हा एक खूप भव्यदिव्य असा जागतिक पातळीचा चित्रपट आहे. संजय जाधवच्या डोक्यात काही गोष्टी पक्क्या असल्याने त्या चित्रपटात उतरवणे त्याला खूप सोपे जाते आणि त्यातूनच मग एक उत्तम कलाकृती घडते.” प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मिती ‘तमाशा लाईव्ह’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाण्यांचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. त्यामुळे ही म्युझिकल ट्रीट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade