सायफाय (Si-Fi Story) कथानक असलेला चित्रपट म्हणून साकार राऊत दिग्दर्शित अजूनी या चित्रपटाची चर्चा आहे. अतिशय उत्कंठावर्धक अशा या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, हा चित्रपट 8 जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे. पियुष रानडे, प्रणव रावराणे यांची मध्यवर्ती भूमिका असून “अजूनी” चित्रपटातून परग्रहवासीयांची गोष्ट उलगडणार आहे. चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच झाले आहे. संघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा अजूनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहेत.अर्थ स्टुडिओज यांच्या संयोगाने सारा मोशन प्रा.लि. आणि गोल्डन पेटल्स फिल्म्स यांनी “अजूनी” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade), प्रणव रावराणे (Pranav Raorane), श्वेता वेंगुर्लेकर, प्रतीक देशमुख यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. साकार राऊत यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा “अजूनी” हा चित्रपट खूपच वेगळा ठरणार आहे. चित्रपटाचा विषय आणि कथानक अतिशय वेगळं असल्याचं, सायफाय कथानकाला प्रेमाचा पदर असल्याचं टीजरमधून दिसून आलं होतं. आता चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करतानाच टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं.
एलियनची कथा
“अजूनी” या चित्रपटात एलियनची अर्थात परग्रहवासीची गोष्ट मांडण्यात आली आहे. नदीच्या मधोमध होडीत बसून घाटाकडे पाहणारा तरूण टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तसंच चित्रपटाचा लूक आणि फील अतिशय इंटरेस्टिंग वाटतो आहे. त्यामुळे नावातलं आणि कथानकातलं वेगळेपण चित्रपटातही नक्कीच दिसेल यात शंका नाही. आपल्याकडे काल्पनिक चित्रपट अधिक आवडतात. प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायची इच्छा असते. इंग्रजी अथवा मराठी चित्रपटातून अशा वेगळ्या कथा आपल्याला दिसतातच. पण मराठीमध्ये अशी एलियनची कथा आता या चित्रपटातून घेऊन येत आहेत. यामध्ये पियुष रानडे आणि प्रणव रावराणेची महत्त्वाची भूमिका असून या दोघांना एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एलियनची कथा पाहताना प्रेक्षकांनाही नक्कीच धमाल येईल हे काही वेगळं सांगायला नको.
मालिकांमधून पियुषची ओळख
पियुष रानडेने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांमधून पियुष प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला आहे. पियुष हा अत्यंत ओळखीचा चेहरा आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या मालिकांमधून पियुषने काम करत आपला अभिनय दाखवला आहे. तर आता या वेगळ्या चित्रपटातून पियुष पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय. याशिवाय प्रणव रावराणेनेही आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. सशक्त अभिनयाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून प्रणव प्रेक्षकांसमोर आला आहे. तर या चित्रपटातही त्याची वेगळी भूमिका आहे. पियुषला पहिल्यांदाच अशा मोठ्या पडद्यावर महत्त्वाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहतेही नक्कीच उत्सुक आहेत. तर एलियनची अशी नक्की कोणती कथा असणार आणि प्रेक्षकांना या कथेशी कसे कनेक्ट करता येणार याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. जुलै महिन्यात हा चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे. असे सायफाय चित्रपट फारच कमी प्रमाणात निर्माण केले जातात. त्यामुळे आता हा मराठीतील सायफाय चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर नक्की काय परिणाम करतो ते पाहावं लागेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade