थंडीच्या दिवसात जास्तीतजास्त गरम पाण्याने आंघोळ करायला प्रत्येकाला आवडते. पण अति गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचं खूप नुकसान होतं. गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील सर्व तेल निघून जातं आणि त्वचा पूर्णपणे ड्राय होते. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या जाणवते. पण आयुर्वेदानुसार जर आंघोळीच्या पाण्यात काही घटक मिक्स करून तुम्ही आंघोळ केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या तुम्हाला टाळता येतील. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यात मिक्स करून आंघोळ केल्यास फायदा होतो.
सैंधव मीठ आणि तुरटी
जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल तेव्हा एक बादली पाण्यात एक चमचा सैंधव मीठ आणि तुरटी मिक्स करा आणि आंघोळ करा. यामुळे बॉडीतील ब्लड सर्क्युलेशन योग्य राहतं. तसंच स्ट्रेस आणि मसल्सच्या वेदनापासून सुटका होते.
ग्रीन टी
एक बादली गरम पाण्यात सहा ग्रीन टी बॅग टाका. किमान 15 ते 20 मिनिटं या टी बॅग्ज्स तशाच बुडवून ठेवा. ग्रीन टीमधील अँटी-ऑक्सीडंट आणि डिटॉक्सीफायर हे गुण तुमच्या चेहऱ्यावर अँटी-एंजिंग आणि क्लींजरचं काम करतील.
आंघोळीच्या पाण्यात दूध
दूध आंघोळीच्या पाण्यात घालण्याचे अनेक फायदे आहेत. दूधात असलेलं लॅक्टिक एसिड हे नैसर्गिक एक्सफॉलिएंटसारखं काम करतं. ज्यामुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत कोशिका दूर होतात आणि चेहऱ्याची त्वचा फ्रेश वाटते. ज्यामुळे तुमचा चेहरा दिसतो चमकदार.
बेकिंग सोडा
आंघोळीच्या पाण्यात चार ते पाच मोठे चमचे बेकिंग सोडा घालून आंघोळ केल्यास शरीरातील एसिडची मात्रेचा परिणाम कमी होतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. तसंच शरीरातील जळजळ कमी होऊन त्वचा मुलायम होते. मद्य, कॅफीन, निकोटीन आणि औषधांचा शरीरावरील प्रभावापासून डिटॉक्स करण्याचा उत्तम उपाय आहे.
संत्र्याचं साल
एक बादली कोमट पाण्यात दोन संत्र्याच्या सालं टाकावी. जवळपास 10 मिनिटांनी हे आंघोळीच्या पाण्यातून काढा आणि मग आंघोळ करा. संत्र्याचं साल घातलेल्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची वेदना आणि स्किन इन्फेक्शन्स दूर होतात.
कडूनिंबाची पान
कडूनिंबाची 8 ते 10 पानं एक ग्लास पाण्यात उकळून मग ते पाणी गाळून घ्या. त्यानंतर एक बादली पाण्यात हे कडूनिंबाचं पाणी मिक्स करा आणि मग आंघोळ करा. असं केल्याने स्किन इन्फेक्शन आणि सूज येण्याची समस्या दूर होते.
कापूर
एक बादली पाण्यात 2 ते 3 कापराचे तुकडे घालून मग आंघोळ करा. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते. तसंच बॉडीही रिलॅक्स होते.
गुलाबपाणी
एक बादली पाण्यात 3 ते 4 चमचे गुलाबपाणी मिक्स करून मग आंघोळ करा. यामुळे तुमचे स्नायू रिलॅक्स होतील. तसंच तुमच्या शरीराची दुर्गंधीही दूर होईल.
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे ‘5’ फायदे
सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
हेही वाचा –
आंघोळ करताना या गोष्टींचा वापर कराल तर त्वचेच्या विकारांपासून होईल सुटका
जेवणानंतर कधीही करु नका आंंघोळ जाणून घ्या कारण