Diet

पॉलिश्ड आणि अनपॉलिश्ड डाळींमधील पोषक तत्त्वांबद्दल या 5 गोष्टी माहिती असायलाच हवी

Dipali Naphade  |  Jun 29, 2021
पॉलिश्ड आणि अनपॉलिश्ड डाळींमधील पोषक तत्त्वांबद्दल या 5 गोष्टी माहिती असायलाच हवी

रोजच्या आहाराची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे शरीर निरोगी राखण्यासाठी आहारातील प्रमुख घटक म्हणून वेगवेगळ्या डाळींचा समावेश रोजच्या जेवणामध्ये करण्याची भारतीय पोषण पद्धत किती योग्य आहे हे एव्हाना सर्वांच्या ध्यानात आले आहे. महामारीच्या काळात हा खूप मोठा धडा आपण सर्वजण शिकलो आहोत आणि आशा आहे की पुढे कधीही त्याचे विस्मरण होणार नाही. पण हे एवढेच ज्ञान पुरेसे नाही तर आपण ज्या डाळी वापरतो त्या कुठून येतात, कशा तयार केलेल्या असतात हेदेखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. याबाबत आम्ही कविता देवगण, पोषण तज्ज्ञ – टाटा संपन्न यांच्याकडून अधिक जाणून घेतले.  या लेखातून आपण याविषयी अधिक जाणून घेऊ. जेणेकरून तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात याचा फायदा होऊ शकेल. 

हेल्दी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ डाळींचा समावेश

कशा डाळी वापराव्या

Freepik

सर्वात पहिला नियम म्हणजे खुल्या विकल्या जाणाऱ्या डाळींऐवजी विश्वसनीय ब्रँडच्या दर्जेदार, पॅकेज्ड डाळी वापरल्या पाहिजेत.  यामुळे स्वच्छतेचे लाभ तर मिळतीलच शिवाय खुल्या विकल्या जाणाऱ्या डाळींमध्ये मिसळल्या जाणाऱ्या अनावश्यक आणि हानिकारक पदार्थांमुळे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम देखील टाळता येतील.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पॉलिश्ड डाळींऐवजी अनपॉलिश्ड डाळी वापरा. तुमचा हा एक निर्णय तुमच्या आहाराची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात वाढवण्यात खूप मोलाचा ठरू शकतो. पॉलिश्ड डाळी चमकदार आणि छान दिसतात पण त्यांच्यातील पोषकतत्त्वे नैसर्गिक म्हणजेच अनपॉलिश्ड डाळींपेक्षा कमी असतात.

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

अनपॉलिश्ड डाळी महत्त्वाच्या का आहेत?

Freepik

अनपॉलिश्ड डाळी महत्त्वाच्या का आहेत याची अनेक कारणे आहेत. आपण त्यापैकी 5 प्रमुख कारणे समजून घेऊ – 

1. डाळी जेव्हा पॉलिश केल्या जातात तेव्हा त्यांचा वरचा थर निघून जातो, डाळींवरील या सर्वात वरच्या थरामध्ये फायबर आणि पोषकतत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. सहाजिकच पॉलिश्ड डाळींमधील पोषकतत्त्वे कमी होतात.  डाळींमध्ये असलेल्या प्रमुख खनिजांमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक यांचा समावेश असतो, तसेच फोलेट, थियामिन आणि नियासिन यासारखी भरपूर ब जीवनसत्त्वे देखील डाळींमध्ये असतात.  पॉलिशिंगच्या प्रक्रियेमध्ये ही खनिजे व जीवनसत्त्वे निघून जातात. पण अनपॉलिश्ड डाळींमध्ये त्यांची पोषकतत्त्वे आणि शक्ती नैसर्गिक स्वरूपात कायम टिकून असते.

2. आरोग्यसंपन्न जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी दररोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असणे आवश्यक असते जेणेकरून आपल्या पोटाचे कार्य सुरळीतपणे चालत राहते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील उत्तम राहते.  पॉलिश्ड डाळींमध्ये फायबर कमी असते आणि फायबरची ही कमतरता आपल्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम करू शकते, यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते, बद्धकोष्ठासारखे पोटाचे विकार त्रास देऊ लागतात.

3. तिसरे कारण म्हणजे अनपॉलिश्ड डाळींमध्ये पॉलिश्ड डाळींच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते.  आपल्या रोजच्या आहारात, खास करून शाकाहारी व्यक्तींसाठी डाळी हा प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत असतो, पॉलिश्ड डाळी वापरल्याने शरीराला प्रथिनांचा पुरवठा कमी होऊन आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतात.

4. पॉलिश्ड डाळींचा वरचा थर निघून गेलेला असतो, त्यामुळे त्यांची चव देखील नीट लागत नाही, तसेच पॉलिश्ड डाळी शिजायला जास्त वेळ लागतो. म्हणजेच अनपॉलिश्ड डाळी तुमचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत करतात.

5. खरे तर पॉलिश्ड डाळी आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात कारण मार्बल आणि सोपस्टोन पावडर यासारखे डाळी पॉलिश करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ पचनसंस्थेसाठी अत्यंत हानिकारक असतात.  तेलाच्या साहाय्याने पॉलिश केलेल्या डाळींमध्ये अनावश्यक अतिरिक्त फॅट्स वाढतात आणि पॉलिशिंग प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारे पाणी असुरक्षित, अस्वच्छ असू शकते. त्यामुळे नैसर्गिक, स्वच्छ, शुद्ध अनपॉलिश्ड डाळींचा वापर करणे नेहमी चांगले ठरते.

पॉलिश्ड डाळी दिसायला कितीही आकर्षक, चमकदार असल्या तरी त्यामुळे आपल्या आरोग्याला मात्र नुकसान पोहोचू शकते.  कोणतेही खाद्य उत्पादन जितके जास्त नैसर्गिक स्वरूपात आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले असेल तितके ते आपल्या शरीरासाठी जास्त लाभदायक ठरू शकते. डाळींची निवड करताना ही बाब नेहमी ध्यानात ठेवा. 

मिश्र डाळींपासून बनवा या हेल्दी रेसिपीज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Diet