DIY सौंदर्य

खरेदी करत असलेले मेकअप उत्पादन बनावट तर नाही, कसे ओळखावे

Dipali Naphade  |  Oct 23, 2020
खरेदी करत असलेले मेकअप उत्पादन बनावट तर नाही, कसे ओळखावे

मेकअप महिलांचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्याचे काम करते यातही नक्कीच दुमत नाही. चेहऱ्याची काही कमतरता असेल तर तुम्हाला मेकअपच्या सहाय्याने लपविता येते. पण त्यासाठी मेकअपचा दर्जा अर्थात क्वालिटीदेखील तितकीच उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला ब्रँडेड आणि खरे उत्पादन खरेदी करायला हवेत. वास्तविक अनेकदा मेकअप ब्रँडेड आहे आणि खरे आहेत असे समजून बऱ्याचदा मेकअपची खरेदी करण्यात येते.  पण काही वेळा हे बनावट असते. केवळ किमतीवर खरे आणि बनावट ठरत नाही तर बनावट उत्पादन ओळखण्याची पद्धत असते.  बरेचदा महाग उत्पादने खरेदी करूनही ती बनावट निघालेली दिसून येतात.  मग खरेदी करण्यापूर्वी नक्की ही उत्पादने खरी आहेत की बनावट हे कसे ओळखायचे? कारण अशी मेकअपची उत्पादने तुम्हाला चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर स्मूद आणि चांगला लुक देत नाही. त्यामुळे तुम्हालाही राग येणं साहजिक आहे. पण तुम्हाला या परिस्थितीतून सुटायचं असेल तर तुम्हाला यामधील अंतर जाणून घ्यायला हवे.  ते कसं  समजून घ्यायचं ते आम्ही तुम्हाला यातून सांगणार आहोत. 

किमतीतील अंतर

ब्रँडेड उत्पादने ही नेहमी परवाना असलेल्या दुकानदारांकडून विकण्यात येतात. त्यामुळे तुम्ही केवळ अशा दुकानदारांकडूनच मेकअपचे साहित्य खरेदी करत आहात याची काळजी घ्या. या ठिकाणी तुम्हाला सहसा बनावट उत्पादनं मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खरेदी करून शकता. पण तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असाल तर तुम्ही विशिष्ट ब्रँडच्या मेकअप खरेदीसाठी त्याच्या संकेतस्थळावर जाऊनच खरेदी करावी. उदाहरणार्थ तुम्हाला MyGlamm चे मेकअप उत्पादन विकत घ्यायचे असेल तर तुम्ही myglamm.co या संकेतस्थळावरून त्या उत्पादनांची खरेदी करावी.  विना परवाना असलेल्या दुकानात असणारे मेकअपचे उत्पादन हे सहसा कमी किमतीचे आणि हलक्या प्रतीचे असते. त्यामुळे तुम्ही खरकेसाठी जाताना किमान संकेतस्थळावरून मेकअप उत्पादनांच्या मूळ किमती पाहून घ्या. दुकानात घेताना त्यामध्ये तफावत आढळल्यास,  तुम्ही त्वरीत उत्पादन खरेदी न करण्याचा निर्णय घेऊ शकता. 

https://marathi.popxo.com/article/new-arebic-smokey-eye-look-for-navratri-in-marathi

पॅकेजिंग पडताळून पाहा

Shutterstock

https://marathi.popxo.com/article/should-foundation-and-concealer-be-the-same-shade-in-marathi

पॅकेजिंगवरूनही तुम्ही बनावट उत्पादने ओळखू शकता. कमी दर्जाचे प्लास्टिक, फिका रंग आणि खराब फिटिंग असणारे आरसे नक्कीच तुमच्या डोळ्यांना धोका देणार नाहीत. अशा तऱ्हेने मेकअप उत्पादन हे तुमच्या चेहऱ्याला खराब करण्यासाठी  कारणीभूत ठरतात.  त्यामुळे खरेदी करताना नीट दहा वेळा लक्ष देऊन तुम्ही तपासून घ्यायला हवे. काही ठिकाणी नावं चुकीची लिहिली जातात. अर्थात स्पेलिंगमध्ये उलटसुलट केलेले असते.  त्यातही तुम्ही जाणून घेऊ शकता.  अशा तऱ्हेने पॅकेजिंग व्यवस्थित आहे की नाही हेदेखील पाहणं गरजेचे आहे. 

इन्स्टा शॉपिंगपासून राहा सावध

https://marathi.popxo.com/article/golden-eyeshadow-for-this-festive-season-for-perfect-look-in-marathi

काही ठिकाणी सोशल मीडियावर अशा तऱ्हेची उत्पादने कमी किमतीत आणि बनावट स्वरूपाची विकली जातात.  त्यामुळे यापासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. मुळात तुम्हाला मेकअप उत्पादनांच्या किमतीची रेंज माहीत असायलाच हवी. तरच तुम्ही यापासून सावध होऊ शकता. अशा ठिकाणी मेकअप उत्पादने 100 टक्के चांगल्या दर्जाची असल्याचा दावा करण्यात येतो. वेगवेगळ्या ऑफर्सची लालूच दाखवण्यात येते. पण तुम्ही अशा ठिकाणी ना मेकअप उत्पादनांची तपासणी करू  शकता ना दर्जा बघू शकता. त्यामुळे सहसा अशा सोशल मीडिया साईट्सवरून सहसा खरेदी करणे टाळा आणि मुळात आपल्या नजरेतून जितकं स्पष्ट पाहण्याचा प्रयत्न करता येईल तितका करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य