Diet

#vegan diet करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

Trupti Paradkar  |  Jul 19, 2019
#vegan diet करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

जर तुम्हाला निरोगी आणि फिट राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल अथवा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल कर वेगन डाएट (vegan diet) तुमच्यासाठी अगदी परफेक्ट डाएट आहे. आजकाल फिटनेससाठी अनेकजण हे डाएट फॉलो करत असतात. खरंतर वेगन डाएट हे केवळ एक डाएट नसून एक प्रकारची जीवनशैलीच  आहे. आजकाल अनेक सेलिब्रेटी देखील सध्या या नव्या जीवनशैलीचा अवलंब करत आहेत. मात्र वेगन डाएटबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. नावावरून हे डाएट म्हणजे नॉनव्हेज न खाता फक्त व्हेज खाणं अस काहीजणांना वाटत असतं. मात्र हे मुळीच खरं नाही. जर तुम्हालादेखील वेगन व्हायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या.

जाणून घ्या वेगन डाएट कसं करतात

वेगन डाएटमध्ये केवळ फळं, भाज्या, तृणधान्य, डाळी, सुकामेवा यांचा समावेश केला जातो. मात्र एवढंच नाही तर या डाएटमध्ये दूध आणि दुधापासून तयार केलेले खाद्यपदार्थ म्हणजेच प्राण्यांपासून तयार केलेले पदार्थ टाळले जातात. वेगन डाएट हे शाकाहारी आहारापेक्षा थोडं अधिकच काटेकोरपणे पाळावं लागणारं एक डाएट आहे. या डाएटमुळे तुम्हाला पोषक तत्त्व भरपुर प्रमाणात मिळू शकतात. वेगन डाएटचे अनेक चांगले फायदे असले तरी जर तुम्ही वेगन होण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.

Vegan diat करण्यापूर्वी या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

अधिक वाचा

डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं

डाएट न करताही कमी करता येऊ शकते वजन, वाचा टीप्स

जाणून घ्या नव्या Eco-Keto Diet बद्दल

फोटोसौजन्य – इन्साग्राम

Read More From Diet