मनोरंजन

मार्व्हलने पुन्हा जिंकले प्रेक्षकांचे मन, Thor: Love And Thunder ची समाधानकारक सुरुवात 

Vaidehi Raje  |  Jul 10, 2022
Thor love and thunder

मार्व्हल स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित नवीन चित्रपट Thor: Love And Thunder ‘ने गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला विशेषत: उत्तर भारतात प्रचंड यश मिळाले आहे. हा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा 29वा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या व्यवसायाची सुरुवात MCU च्या आधीच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मॅडनेस ऑफ मल्टीवर्स’एवढी झाली नाही, पण मागच्या गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल असा अंदाज आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई देशात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. शुक्रवारी चित्रपटाचा व्यवसाय थोडा मंदावला होता पण शनिवारी पुन्हा या चित्रपटाने उचल खाल्ली. या चित्रपटाचे कलेक्शन शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सुमारे 36 टक्क्यांनी वाढले. आणि  या चित्रपटाने रविवारच्या मॉर्निंग शोच्या कमाईसह पन्नास कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत 13 कोटी रुपयांची कमाई करून हिंदी चित्रपट निर्मात्यांनाही आश्चर्यचकित केले आहे.

तिकीट खिडकीवर समाधानकारक ओपनिंग

Thor: Love And Thunder

Thor: Love And Thunder हा चित्रपट 7 जुलै रोजी भारतात प्रदर्शित झाला. अमेरिकेत प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आणि रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याने तब्बल 18.60 कोटी रुपयांची कमाई केली आणि हॉलीवूडच्या टॉप ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये पाचवे स्थान पटकावले.  पहिल्याच दिवशी  या चित्रपटाच्या इंग्रजी आवृत्तीने 11.75 कोटी रुपये, हिंदीने 5.5 कोटी रुपये, तामिळने 60 लाख रुपये आणि तेलुगू आवृत्तीने 75 लाख रुपये कमावले आहेत. शुक्रवारी चित्रपटाची कमाई थोडी मंदावली होती. पण  शनिवारी अनेक कार्यालयांना सुट्टी असल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसच्या कमाईत आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे 36  टक्क्यांनी उचल खाल्ली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, ‘Thor: Love And Thunder’ या चित्रपटाने शनिवारी जवळपास 16 कोटींचा व्यवसाय केला आहे. 

विनोदाने भरलेली थॉरची कथा 

Thor: Love And Thunder’ हा चित्रपट अतरंगी आहे. सोप्या भाषेत समजून बोलायचे झाल्यास गोविंदा किंवा वरुण धवन यांना सुपरहिरो बनवले आणि त्यांच्या नैसर्गिक सवयी बदलल्या नाहीत तर कसा विनोदी सुपरहिरो दिसेल याची तुम्ही कल्पना करू शकता. ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ख्रिस हेम्सवर्थने गेल्या 11 वर्षांत या व्यक्तिरेखेसोबत जो प्रवास केला त्याचा हा प्रभाव आहे. ख्रिस हेम्सवर्थने आतापर्यंत आठ वेळा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये थॉरची भूमिका साकारली आहे. थॉर: लव्ह अँड थंडर’ हा त्याचा सोलो हिरो म्हणून चौथा चित्रपट आहे. थॉर सुरुवातीच्या काळात अतिशय गर्विष्ठ आणि गंभीर स्वभावाचा होता. पण ‘थॉर: रॅग्नारॉक पासून ख्रिसने थॉरला थोडा विनोदी टच दिला. 

Thor: Love And Thunder

पराक्रमी सैतान आणि थॉरची लढत 

थॉर हा ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिकेतील चित्रपटांचा एक विशेष भाग आहे. एन्डगेमच्या शेवटी थॉरने न्यू ऍसगार्डची जबाबदारी वॅलकरीवर सोपवली व तो गार्डिअन्स ऑफ द गॅलेक्सीच्या पात्रांबरोबर गेला असे दाखवले होते. ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ मध्ये देवाचा एक पुजारी त्याच्या वैयक्तिक नुकसानाचा बदला घेण्यासाठी देवाविरुद्ध उभा राहतो. सुरुवातीची ही दृश्ये प्रेक्षकांचा थरकाप उडवतात. 

त्यामुळे मार्व्हल फॅन्स हा चित्रपट बघायला गर्दी करणार यात शंका नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन