भविष्य

27 डिसेंबर 2018 चं राशीफळ

Trupti Paradkar  |  Dec 26, 2018
27 डिसेंबर 2018 चं राशीफळ

मेष – व्यवसायात नफा होईल. आज घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. वाहन खरेदीची संकल्प पूर्ण होईल. घरात उत्सवाचे वातावरण असेल. प्रेमाच्या नात्यातील मधुरता वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विरोधी त्रास देतील.

कुंभ –  प्रियकराची भेट होईल. घरातील वयस्कर मंडळींमुळे प्रॉपर्टीविषयक वाद संपतील. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.मित्रांकडून लाभ मिळेल. भावनिकदृष्ट्या समाधानी व्हाल.

मीन- शिक्षण आणि नोकरीमध्ये अचानक समस्या येतील. निर्णय घेताना सावध रहा. व्यवसायामध्ये नव्या ओळखी वाढवताना सावध रहा. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासोबत नातेसंबंध सुधारतील. आई-वडीलांचे सहकार्य लाभेल.

वृषभ- विद्यार्थ्यांचा तणाव वाढेल. काम करताना अडथळे येतील. काही महत्वाच्या योजना लांबणीवर पडतील. विरोधक त्रास देतील. जमा आणि खर्चाचा समतोल साधा. दिवस साधारण असेल. आज काही समस्यांपासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन-  एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. नवीन प्रेमप्रकरण होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आहाराची काळजी घ्या. सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. बिझनेस अथवा नोकरीमध्ये सावध रहा. समस्या येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद करणे टाळा.

कर्क- मानसिक  त्रास जाणवेल. जास्त दगदग होण्याची शक्यता आहे. शारीरिक दुखणी वाढण्याची शक्यता आहे. वयस्कर लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुंटुबासोबत वेळ घालवा. नात्यातील गोडवा वाढेल. काम पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

सिंह- विद्यार्थ्यांना यश मिळेल.नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.रागावर नियंत्रण ठेवा. नवीन कामाला सुरुवात कराल. मित्रांच्या सहाकार्यांने अपूर्ण कामे पूर्ण कराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या- आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. खूप मेहनत करुनदेखील उत्पन्न कमी आणि खर्च वाढेल. विरोधकांचा त्रास वाढेल. कुंटुंबाची साथ लाभेल. जोडीदारासोबत गोडीगुलाबीने संसार कराल.विद्यार्थ्यांच्या समस्या कमी होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.

तुळ – आरोग्य सुधारेल.मेडीकल रिपोर्ट चांगले येतील. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. व्यावसायिक योजनांमध्ये यशस्वी व्हाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल.

वृश्चिक- कुंटुबकलह वाढतील. विनाकारण दगदग करावी लागेल. प्रेमप्रकरणात दूरावा येईल. बिझनेसमध्ये एखाद्या व्यक्तीकडून समस्या निर्माण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस साधारण असेल.

धनु- उद्योगात वाढ होण्याची शक्यता आहे.नोकरीत प्रमोशन मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.सुखसाधनांमध्ये वृद्धी होईल. जुने वाद मिटतील.भावनिकरित्या समाधानी व्हाल.

मकर- आरोग्याची काळजी घ्या.पोटाच्या समस्या होण्याची शक्यता आहे.आत्मविश्वास कमी होईल.नोकरी करणाऱ्या महिलांसाठी दिवस चांगला असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने खुश व्हाल. आर्थिक स्थिती चांगली असेल. मंगल कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Read More From भविष्य