मनोरंजन

दगडूच्या प्रेमाला फुटणार नवी ‘पालवी’, टाइमपास 3 चा टिझर

Dipali Naphade  |  May 31, 2022
timepass-3-teaster-out-hruta-durgule-in-a-different-role-palvi-in-marathi

‘हम गरीब हुए तो क्या हुआ !’, ‘ चला, हवा येऊ द्या !’, ‘ नया है वह!’,  ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ’ यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू – प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती,  शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे टाइमपास (Timepass) ! झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाने सजलेले टाइमपास आणि टाइमपास 2 हे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास 2 मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

टाइमपास 3 चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

टाइमपास 3 ची ही गोष्ट दगडू-प्राजूच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची ! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ‘ पालवी दिनकर पाटील’ ! टाइमपास 3 च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी ! जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने. याशिवाय प्रथमेश परबचा (Prathamesh Parab) दगडू आणि वैभव मांगले (Vaibhav Mangle) यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट काय असणार आहे ? ही पालवी कोण आहे? चित्रपटात प्राजू दिसणार की नाही? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील पण त्याची उत्तरे हळूहळू मिळतच जातील. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे हे निश्चित !  झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या टाइमपास 3 चे दिग्दर्शन रवी जाधव यांचे आहे. येत्या 29 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हृताची वेगळी भूमिका

आतापर्यंत प्रेक्षकांनी हृताला अत्यंत लाघवी, सालस आणि वेगळ्या भूमिकांमधून पाहिले आहे. मात्र डॅशिंग आणि वेगळ्याच टपोरी भाषेतील हृता ऊर्फ पालवी आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृताने नुकतेच प्रतीक शाह (Prateek Shah) याच्याशी लग्नगाठ बांधली. तर तिची सध्या ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zala) ही मालिकाही गाजते आहे. अजिंक्यसह हृताची जोडी सर्वांनाच आवडते आहे. तर पालवी दिनकर पाटील या भूमिकेतूनही प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यास हृता आता तयार झाली आहे. तर या चित्रपटासह हृताचा ‘अनन्या’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या हृताच्या चाहत्यांना मात्र खूपच आनंद झाला आहे. मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही पातळ्यांवर हृता सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आता चित्रपटातूनही वेगळ्या भूमिकेतून हृताला पाहता येणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. तर आता टाइमपास या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर तिसऱ्या भागातून नक्की काय कथा समोर येणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. नुकताच याचा टीझर आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट सिनेरसिक पाहत आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन