लाईफस्टाईल

असा करा तुमचा प्रत्येक प्रवास अविस्मरणीय, फॉलो करा या सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Jul 21, 2022
असा करा तुमचा प्रत्येक प्रवास अविस्मरणीय, फॉलो करा या सोप्या टिप्स

वेकेशनवर गेल्यामुळे दैनंदिन कामातून काही निवांत क्षण माणसाला मिळतात. काही जणांना वर्षांतून एकदा, दोनदा तर काही जणांना महिन्यातून एकदा ब्रेकवर जाण्याची सवय असते. तुम्ही लॉंग वेकेशन प्लॅन करा अथवा छोटा ब्रेक घ्या. तुमचा प्रत्येक प्रवास आनंदाचा आणि लक्षात राहील असा व्हायला हवा. अशा वेळी तुमच्या वेकेशनमधील आनंद आणि एक्सायटमेंट वाढण्यासाठी या काही सोप्या ट्रॅव्हल टिप्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. या लक्षात ठेवल्या तर तुम्ही जगभरात कुठेही गेला तरी तुमचा प्रवास सुखाचाच होईल. यासाठी वाचा 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi, भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे (Places For Solo Travelers In India In Marathi), महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Tourist Places In Mahmjarashtra In Marathi)

प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

तुम्ही नियमित फिरत असाल अथवा कधी तरीच वेकेशनवर जात असाल तरी काही गोष्टी प्रवासादरम्यान तुम्ही लक्षात ठेवायलाच हव्या. तरंच तुमचा प्रवास अविस्मरणीय होऊ शकतो.

सकाळी लवकर प्रवासाला सुरूवात करा 

आजकाल ट्रॅव्हलिंगचा उद्योग जोमाने सुरू आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. फिरण्याची आवड नसतानाही अनेक लोक हौस म्हणून फिरायला येतात. तुफान गर्दी, आवाज यामुळे तुमचा फिरण्याचा आनंद कमी होऊ शकतो. यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेला आहात तिथे लवकर उठून फिरायला जा. कारण सकाळी पर्यटकांची गर्दी कमी असते. अशा वेळी स्थानिक लोकांशी गप्पा मारून तिथली भौगोलिक परिस्थिती आणि काही खास ठिकाणं तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील. सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केली तर तुमचे फोटोही छान येतील जे तुम्हाला सोशल मीडियावर अपलोड करता येतील.

संयम राखा

प्रवासादरम्यान नेहमी संयम राखा. प्रत्येक गोष्ट जशी तुम्ही प्लॅन केली आहे तशी होईलच याची खात्री देता येणार नाही. अशा वेळी चिडचिड झाल्यास तुमचा प्रवासाचा आनंद कमी होतो. प्रवासात कितीही कठीण समस्या आल्या तरी त्या संयमाने स्वीकारा तरंच तुम्हाला फिरण्याचा खरा आनंद घेता येईल.

तुमचा कम्फर्ट झोन तोडा

प्रवास अविस्मरणीय करायचा असेल तर तुम्हाला त्या सर्व गोष्टी करायला हव्या ज्या तुम्ही यापूर्वी नाही केल्या. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत प्रवासातील नव नवीन गोष्टी पाहा आणि अनुभवा. कारण पुन्हा तुम्हाला त्या कधी अनुभवता येतील हे माहीत नाही. त्यामुळे या संधीचा आताच फायदा घ्या. 

पर्यटन स्थळे पाहण्याची घाई नको

एखादं डेस्टिनेशन ठरवलं की तिथे गेल्यावर जे जे आहे ते सर्व घाई घाईत पाहण्याकडे पर्यटकांचा कल असतो. पण जर तुम्हाला तुमचा प्रवास अविस्मरणीय करायचा असेल तर अशी घाई करू नका. एखादा पिकनिक स्पॉट पाहायला राहून गेला तरी चालेल पण जिथे जिथे तुम्ही जाल ते स्थळ निवांतपणे फिरा आणि तिथल्या छोट्या छोटया गोष्टींचा मनसोक्त आनंद घ्या.

लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदला

एखाद्या ठिकाणी गेल्यावर त्या जागेबद्दल असलेला तुमचा दृष्टीकोण बाजूला ठेवत फिरण्याचा आनंद घ्या. इतरांच्या लाइफस्टाइलला जज करण्यापेक्षा तिथलं लोकल फूड, पेहराव, संस्कृतीचा आनंद घ्या. ज्यामुळे तुम्ही जगभरात कुठेही गेला तरी तुम्हाला फिरण्याचा खरा आनंद मिळेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लाईफस्टाईल