देशातील सर्वात श्रीमंत अंबानीच्या मुलीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि प्रि – वेडिंग सोहळ्यांना राजस्थानमधील उदयपूरमध्ये धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अगदी हिलरी क्लिंटनपासून ते बॉलीवूड आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि कलाकार ईशा आणि आनंदच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. तसं बघायला गेलं तर सध्या राजस्थानमध्ये सर्व सितारे अवतरले आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र आज सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचंही आगमन उदयपूरमध्ये झाल्याचं पाहण्यात आलं आहे. प्रसिद्ध गायिका बियॉन्सेची ईशा प्रचंड चाहती आहे आणि त्यामुळे ईशा आणि आनंदच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी अंबानी यांनी बियॉन्सेला बोलावण्याचं वृत्त आधीही ठिकठिकाणी आलं होतं आणि ते खरं असल्याचंही आता पाहायला मिळत आहे. ईशासाठी बियॉन्से उदयपूरमध्ये आली असून तिने परफॉर्मन्ससाठी तब्बल 15 कोटी रूपये घेतले असल्याचंही वृत्त आहे.
बियॉन्सेचा लाईव्ह परफॉर्मन्स
गॉर्जियनने दिलेल्या वृत्तानुसार बियॉन्से ईशा – आनंदच्या प्रि – वेडिंग सोहळ्यात खास लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे. ईशा आणि आनंद या दोघांचीही बियॉन्से ही आवडती गायिका असून त्यांच्या लग्नामध्ये तिने उपस्थिती लावावी असं अंबानी कुटुंबीयांना वाटत होतं आणि त्यानुसार त्यांनी बियॉन्सेला आमंत्रण दिलं असून बियॉन्सेदेखील परफॉर्मन्स करण्यासाठी तयार झाली. सध्या उदयपूरमध्ये अनेक सेलिब्रिटीजने हजेरी लावली असून देशातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मुलीच्या सोहळ्याचा चाललेला धुमधडाका सध्या फोटोच्या रूपाने सर्वांसमोर येत आहे.
ईशाच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूड थिरकले
ईशाच्या संगीत सोहळ्यामध्ये संपूर्ण बॉलीवूड हजर होतं. तर ईशासाठी खास शाहरूख – गौरी, अभिषेक – ऐश्वर्या आणि प्रियांका यांनीही नृत्य केल्याचं सध्या समोर येत आहे. इतकंच नाही तर या लग्नासाठी सर्व खान मंडळीही आवर्जून उपस्थित आहेत. दरम्यान करण जोहरने हा संगीत सोहळा होस्ट केल्याचं सध्या वृत्त समोर येत आहे. आता यानंतर प्रि – वेडिंग सोहळ्यात बियॉन्सचा लाईव्ह परफॉर्मन्सही धमाल उडवून देणार यात वाद नाही.
भारतातील दोन मोठ्या उद्योगपतींच्या मुलांची लग्न
ईशा आणि आनंद हे दोघेही भारतातील दोन सर्वात मोठ्या उद्योगपतींची मुलं आहेत. त्यामुळे या लग्नामध्ये कोणतीही कमतरता राहू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. लवकर अंबानीच्या दोन्ही मुलांचीही लग्न धुमधडाक्यात पार पडतील. तत्पूर्वी ईशा आणि आनंदचं लग्न 12 डिसेंबरला मुंबईच्या अँटिलिया इथे होणार असलं तरीही सध्या त्यांच्या प्रि – वेडिंगचा सोहळा राजस्थानमधील उदयपूरमध्ये धुमधडाक्यात सुरु आहे.
फोटो सौजन्य – Viral Bhayani, Instagram
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade