मनोरंजन

दुसरं लग्न करून काही अभिनेत्रींना मिळाला आनंद तर काहींच्या नशीबी आलं दुःख

Dipali Naphade  |  Oct 8, 2019
दुसरं लग्न करून काही अभिनेत्रींना मिळाला आनंद तर काहींच्या नशीबी आलं दुःख

भारतीय परंपरेमध्ये लग्न हे अतूट बंधन असल्याचं समजण्यात येतं.  आपल्या अनेक अपेक्षा आणि आकांक्षांसह दोन व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न बघतात. पण काही वर्षांनंतर अथवा काहींच्या बाबतीत काही दिवसांनंतर भांडणं, गैरसमज अथवा घरगुती हिंसाचार अशा सगळ्या गोष्टी चालू होतात आणि मग अशा प्रेमाच्या नात्यात कडवटपणा येऊन त्यांना वेगळं व्हावं लागतं. आपल्या टीव्ही कलाकारांच्या बाबतीत तर अशा गॉसिप्स नेहमी छापून येत असतात. त्यापैकी काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या नवऱ्यापासून फारकत घेऊन दुसरं लग्न केलं आणि त्या आपल्या संसारात अत्यंत सुखी आहेत. तर काहींनी दुसरं लग्न केल्यानंतरही त्यांना त्रास सहन करावा लागला आहे.  आपलं मागचं कडवट आयुष्य या अभिनेत्रींनी सोडून नवीन संसार मांडला आणि त्यापैकी काही जणी अगदी सुखाने संसार करत आहेत.

दुसऱ्या लग्नानंतर बदललं या अभिनेत्रींचं आयुष्य

सामान्य माणूस असो अथवा कोणताही सेलिब्रिटी, खोट्या आणि वाईट नातेसंबंधामध्ये राहणं कोणालाच आवडत नाही. त्यामुळे एकमेकांमधील भांडण, हिंसाचार या सगळ्याला कंटाळून काही अभिनेत्रींनी आपल्या पहिल्या नवऱ्यापासून फारकत घेतली आणि पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवून दुसरं लग्नही केलं. त्यापैकी काही जणींच्या नशीबात सुख आलं तर काही जणींच्या नशीबात दुसऱ्या वेळीही दुःखच आलं.

दीपिका कक्कर इब्राहिम

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम टीव्हीवरील क्यूट कपल्समधील एक आहेत. यामध्ये नक्कीच कोणाचंही दुमत नाही. बऱ्याच कमी लोकांना हे माहीत असेल की, ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्करचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी तिचं लग्न पायलट रौनक सॅमसनबरोबर झालं होतं. मात्र या दोघांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. दीपिका आणि शोएब हे मालिकेमध्ये एकत्र काम करत असताना एकमेकांच्या अधिक जवळ आले म्हणून हे लग्न तुटलं असं सांगण्यात येतं. त्यानंतर दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने 22 फेब्रुवारी, 2018 मध्ये लग्न केलं. दोघेही अत्यंत आनंदी यानंतर दिसून येतात.  सोशल मीडियावरदेखील हे दोघेही अॅक्टिव्ह आहेत आणि दोघेही एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 

गौतमी गाडगीळ कपूर

गौतमी गाडगीळ ही स्वतः एक उत्तम अभिनेत्री आहे. अभिनेता राम कपूरबरोबर तिने लग्न करूनही बरीच वर्ष झाली आहेत. दोघेही 2000 मध्ये ‘घर एक मंदीर’ या मालिकेदरम्यान एकमेकांना भेटले. थोड्याच महिन्यात या दोघांममधील रिल लाईफ प्रेम हे खऱ्या आयुष्यात बदललं. आज दोघेही आपल्या संसारात आनंदी आहे. त्यापूर्वी गौतमीने कमर्शियल फोटोग्राफर मधुर श्रॉफ याच्याबरोबर लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार जास्त महिने टिकला नाही. आता राम आणि गौतमीला एक मुलगा आणि एक मुलगी असून सुखाचा संसार चालू आहे. 

2019 मध्ये बॉलीवूडमधल्या ‘नव्या’ जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीचं आयुष्य तर सर्वांनाच माहीत आहे. केवळ 18 व्या वर्षीच श्वेताने अभिनेता राजा चौधरीबरोबर लग्न केलं. त्यांना पलक नावाची एक मुलगीदेखील आहे. पण काही वर्षांनंतर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावत श्वेताने राजाबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर श्वेताने काही वर्षांपूर्वीच अभिनेता अभिनव कोहलीबरोबर लग्न केलं. सोशल मीडियावर दोघेही अत्यंत आनंदी दिसत होते. तसंच त्यांना एक मुलगाही झाला. पण काही दिवसांपूर्वीच श्वेताने आपला दुसरा नवरा अभिनववर मुलगी पलकवर घरगुती हिंसा करण्याचा आणि तिला अश्लील मेसेज पाठवत असल्याचा आरोप लावला. त्यानंतर आता श्वेता आणि अभिनव एकत्र नाहीत अशाच बातम्या येत आहे. मात्र यावर श्वेताने अजिबात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. 

तनाझ इराणी

‘कहां हम कहां तुम’ मधील निशी बुआ अर्थात तनाझ इराणीने साल 2007 मध्ये अभिनेता बख्तियार इराणीबरोबर लग्न केलं. दोघेही आपल्या मुलांबरोबर सुखाने आयुष्य जगत आहेत. तनाझ इराणीचं हे दुसरं लग्न आहे. इतकंच नाही तर तनाझ ही बख्तियारपेक्षा 7 वर्षांनी मोठीदेखील आहे.तनाझचा पहिला नवरा फरीद करीम हा प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट आहे. तसंच तिला आणि फरीदला एक मुलगीदेखील आहे. मात्र त्या मुलीसह बख्तियारने तनाझला स्वीकारलं आणि आता गेले कित्येक वर्ष दोघंही सुखाचा संसार करत आहेत. 

‘रब’ने नाही तर एकताने बनवली जोडी, आता करत आहेत सुखाचा संसार

चाहत खन्ना

‘बड़े अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्री चाहत खन्नाने साल 2006 मध्ये केवळ 19 व्या वर्षी लग्न केलं पण काही महिन्यातच तिने घरगुती हिंसाचाराचा आरोप लावत आपल्या नवऱ्यापासून फारकत घेतली. पण काही वर्षांनंतर तिने पुन्हा फरहान मिर्झाबरोबर दुसरं लग्न केलं. पण या दुसऱ्या लग्नातही तिने फरहान मिर्झावर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप लावत घटस्फोट घेतला आहे. तिला दोन मुली असून सध्या ती या दोन्ही मुलींंचा सांभाळ करत आहे. दोन्ही लग्नामध्ये तिला केवळ त्रासच झाला आहे. 

वयाचं अंतर असूनही प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत टीव्हीवरील ‘या’ जोड्या

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे.

तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन