दूरदर्शन आणि केबल चॅनल्सनी 90 च्या दशकातील अनेक कलाकाराचं आयुष्यचं बदलून टाकलं. मग तो फौजीमधला अभिनेता शाहरूख खान असो वा शांती मालिकेतील अभिनेत्री मंदिरा बेदी असो. या कलाकारांना आपल्या दमदार अभिनयाने ना फक्त फॅन्सच्या मनावर राज्य केलं तर 90 च्या दशकात टीव्हीवरही राज्य केलं. अशाच 90 च्या काळातील अभिनेत्रींवर आपण या लेखात नजर टाकणार आहोत.
शांती – मंदिरा बेदी
शांतीच्या भूमिकेने अभिनेत्री मंदिरा बेदीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कुरळ्या केसांची मंदिरा टीव्हीवर येताच अनेकांच्या हदयाचे ठोके वाढत असत. अगदी तिच्या टिकलीची फॅशनही ट्रेंडमध्ये होती तेव्हा. अनेकांनी ही मालिका पाहून मुलीचं नावही शांती ठेवलं होतं. त्यानंतर मंदिरा पुन्हा एका नव्या अवतारात दिसली ती क्रिकेट शोजमध्ये. सध्या मंदिरा तिच्या फिटनेससाठी जास्त लोकप्रिय आहे.
सुरभी – रेणुका शहाणे
अभिनेत्री रेणुका शहाणे हिला खरी ओळख मिळाली ती सुरभी या शोमुळे. 1990 ते 2001 एवढ्या कालावधीत हा शो रेणुका होस्ट करत होती. त्यावेळी रेणुकाचे अनेकजण डाय हार्ड फॅन्स होते. आजही आहेतच. रेणुका आजही चित्रपट, वेबसीरिज आणि युवा पिढीला आवडणाऱ्या सोशल व्हिडिओजमध्येही काम करते. याशिवाय तिचे ट्वीट्सही अनेकदा ट्रेंड होतात.
तू तू मैं मैं – सुप्रिया पिळगांवकर
हा विनोदी सास-बहू ड्रामा त्यावेळी अगदी टॉपला होता. प्रत्येक घरातून दुपारी या टायटल ट्रॅकचा आवाज हमखास येत असे. सुप्रियाची राधा वर्मा ही भूमिका त्यावेळी अनेक सासू-सुनांना आवडायची. सुप्रिया आणि रिमा लागू यांचं कॉमेडी टायमिंग अफलातून आहे.
तारा – नवनीत निशान
नवनीत निशान या अभिनेत्रीला आजही लोकं तारा या नावानेच ओळखतात. त्या काळी आलेल्या केबल चॅनल्सवरील पहिल्या मालिकांमध्ये ताराची गणती होते. ही मालिका तब्बल 5 वर्ष चालली. जी 1993 साली टीव्हीवर दाखल झाली होती. नंतर नवनीतने अनेक चित्रपपटातही भूमिका केल्या. पण तिची तारा टीव्ही विश्वात अजरामर आहे.
सावी – शेफाली शाह
90s मधील कभी कभी आणि हसरतें या दोन मालिकांमुळे शेफाली शाह लोकप्रिय झाली. नुकतीच तिने केलेली दिल्ली क्राईम वेबसीरिजमधील भूमिकाही लोकांना आवडली. शेफालीने मालिकानंतर चित्रपट आणि आता वेबसीरिज असा यशस्वी प्रवास केला आहे.
केवळ बॉलीवूडच नाही तर टीव्हीवरील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींही केली आहे प्लास्टिक सर्जरी
चंद्रकांता – शिखा स्वरूप
चंद्रकांता की कहानी…हे गाणं आजही डोक्यात फिट आहे. मालिका जास्त लक्षात नसली तरी चंद्रकांता मात्र आजही आठवते. 1994 ते 1996 च्या काळात ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. ज्यात चंद्रकांताची भूमिका केली होती अभिनेत्री शिखा स्वरूपने. 1988 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकलेल्या शिखाच्या सौंदर्याचे तेव्हा अनेकजण दिवाने होते. शिखाने 2012-13 साली आलेल्या रामायण या मालिकेत कैकेयीची भूमिकाही केली होती. शिखा सोशल मीडियावर जास्त एक्टिव्ह नाही. पण तिचे फॅन्स मात्र तिचे फोटो शेअर करत असतात.
बॉलीवूडच्या ‘या’ टॉप १० अॅक्टर्सनी अनाथ मुलांना घेतलं दत्तक
कहानी घर घर की – श्वेता कवात्रा
ग्रे शेड भूमिका करणं तेव्हा एवढं ट्रेंडमध्ये नव्हतं. तेव्हा श्वेताने कहानी घर घर की या मालिकेत तशी भूमिका केली होती. या मालिकेत तिने श्वेताने पल्लवीची भूमिका केली होती. सध्या श्वेता अभिनयात नसली तरी तिच्या सोशल अकाउंटवर बरीच एक्टीव्ह असते व सतत व्हिडिओज शेअर करत असते.
आपल्या पार्टनरसाठी या सेलेब्सनी बदलला धर्म
बुनियाद आणि चंद्रकांता कृतिका देसाई
कृतिका बुनियाद आणि चंद्रकांता या मालिकांमध्ये दिसली होती. चंद्रकांतामध्ये तिने सभ्या आणि रम्या या जुळ्या बहिणींची भूमिका केली होती. नुकतीच ती मेरे अंगने में या मालिकेत दिसली होती.
Flashback : सलमान खान ते आलिया… पाहा तुमच्या सेलेब्सचे Audition videos
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade