बॉलीवूड

अभिनेत्री सारा अली खानबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

Trupti Paradkar  |  Aug 11, 2019
अभिनेत्री सारा अली खानबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा आज वाढदिवस आहे. 12 ऑगस्ट 1995 ला साराचा जन्म झाला. सारा अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. सध्याच्या नवोदित कलाकारांमध्ये सारा सर्वात जास्त लोकप्रिय कलाकार आहे. शिवाय चित्रपटातील तिच्या यशासोबतच अभिनेता कार्तिक आर्यनसोबत असलेली तिची अगदी खास मैत्री सध्या चर्चेचा विषय आहे.  

Instagram

साराबाबत काही खास गोष्टी …

साराने न्युयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. लहानपणी साराचं वजन फारच जास्त होतं मात्र प्रचंड मेहनत घेऊन साराने तिचं वजन कमी केलं आहे. ज्यावरून तिचं फिटनेस प्रेम नक्कीच दिसून येतं. वजन कमी करण्यासाठी तिने जीम आणि डाएट फॉलो केलं होतं. खरंतर साराला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण वाढत्या वजनामुळे ते शक्य नव्हतं. म्हणूनच तिने तिचे वजनही कमी केलं. या फिटनेसमुळेच तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या सारा अली खानला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साराला लहान वयातच चांगली प्रसिद्धी मिळत आहे. केदारनाथ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला असला तरी खरी प्रसिद्धी तिला सिम्बामधील अभिनय कौशल्यामुळे मिळाली. कमी वयात आणि इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर लगेचच तिला चांगलं यश मिळालं. सेलिब्रेटी किड असूनही सारा नेहमी एका सर्वसाधारण मुलीसारखेच राहते. ती अनेक वेळा कोणत्याही बॉडीगार्डशिवाय बिनधास्त फिरत असते. तिचा हाच अंदाज अनेकांना आवडतो .साराने आतापर्यंत दोन चित्रपटात काम केले आहे. पण तरीदेखील तिचा पाय जमिनीवर आहे. तिच्या याच स्वभावामुळे तिचे सगळीकडून नेहमीच कौतुक होत असते. शिवाय ती तिच्या चाहत्यांशी नेहमीच आदराने आणि  नम्रपणे बोलताना दिसते. 

Instagram

सारा आणि कार्तिकचं नातं

सारा आणि कार्तिकच्या अफेअर्सच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. आजकाल सगळीकडेच ही जोडी कायम फिरताना दिसते.सारा आणि कार्तिक लवकरच ‘लव आज कल 2’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शूटींगच्या निमित्ताने ही दोघं सध्या जास्त जवळ आली आहेत. बऱ्याचदा शूटींग व्यतिरिक्तही ही जोडी अनेकदा बाहेर फिरताना दिसते. त्यामुळे आता या दोघांमध्ये जे काही सुरु आहे अशी चर्चा सुरू आहे. सारा आणि  कार्तिकने याबाबत काहीच ऑफिशिअली सांगितलं नसलं तरी लोकांनी या दोघांची जोडी कन्फर्म करुन टाकली आहे. 

Instagram

साराच्या आवडी-निवडी

साराला फिरायला जाणं आणि शॉपिंग करणं फार आवडतं. साराचे फेव्हरेट डेस्टिनेशन गोवा, लंडन, न्यूयॉर्क आणि दुबई आहेत. सारा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना अतिशय नम्रपणे वागताना दिसते. एक सेलिब्रेटी म्हणून जेव्हा तिचे चाहते तिच्याशी संवाद साधतात अथवा तिचे फोटो घेतात तेव्हा सारा त्यांना नमस्कार करून अगदी अदबीने बोलते. तिला अगदी साधं राहायला आवडतं यामुळेच ती लोकांच्या मनात घर करून आहे. 

अधिक वाचा

या’ अभिनेत्री प्रमोट करत आहेत Nude Yoga, व्हायरल झाले फोटोज

या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या

बॉलीवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From बॉलीवूड