आपल्यापैकी कोणालाच दैनंदिन आयुष्यात आर्थिक संकट नकोसं असतं. पण काही ना काही कारणाने प्रत्येकाच्या आयुष्यात पैशांची चणचण भासते. तसं तर पैसे कमावण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे मेहनत. पण बरेचदा असं होतं की, मेहनत केल्यानंतरही आपल्याला अपेक्षेएवढी कमाई करता येत नाही. अशावेळी तुम्हाला मदत होईल ती वास्तूशास्त्राची. या शास्त्रानुसार जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही.
वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये ठेवू नये ‘या’ गोष्टी
किल्ल्या
जर तुमचा वास्तूशास्त्रावर विश्वास असेल तर चुकूनही पर्समध्ये किल्ल्या ठेवू नका. नेहमी लोक घराच्या किंवा ऑफिसच्या ड्रॉव्हरच्या किल्ल्या पर्समध्ये ठेवतात. पण वास्तूशास्त्रानुसार हे योग्य नाही. पर्समध्ये किल्ल्या ठेवल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतं. जर तुम्हाला हे नको असेल तर किल्ल्या ठेवण्याची एक जागा निश्चित करा.
बिलं
अनेकजणी किराणा सामान घेतल्यानंतर किंवा वीजेचं बिल भरल्यानंतर ते पर्समध्येच ठेवतात. असं केल्याने नकारात्मकता वाढते. तुमच्यासाठी चांगलं हेच होईल की, कोणत्याही प्रकारची बिलं किंवा कागदपत्र तुमच्या पर्समधील पैशांसोबत ठेवू नका. असंही होऊ शकतं की, तुमच्याकडे येणारे पैसे नेहमी कमी होतील.
उधारीवर घेतलेले पैसे
कधीही उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवू नका. जे पैसे तुम्हाला परत करायचे आहेत ते पैसे पर्समध्ये ठेवण्यात काहीच फायदा नाही. जर तुम्ही ते उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवले तर तुमची उधारी वाढतच जाईल. योग्य वेळेत उधार घेतलेले पैसे परत करा.
‘या’ गोष्टी पर्समध्ये नेहमी ठेवाव्या
- जर तुमचा वास्तूशास्त्रावर विश्वास असेल तर पर्समध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा फोटो जरूर ठेवावा. तुमची आर्थिक स्थिती कायम चांगली राहील. तसंच तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांदीचं नाणं तुमच्या पर्समध्ये नक्की ठेवा.
- असं म्हणतात की, पिंपळाच्या पानात लक्ष्मीचा वास असतो. पिंपळाचं पान आधी गंगाजलने धुवून त्यावर श्री लिहावं. यानंतर ते पान तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल. तुम्ही तुळशीचं पानही पर्समध्ये ठेवू शकता.
- हिंदू धर्मामध्ये तांदूळ शुभ मानले जातात. तांदूळाचा वापर आपण देवाच्या पूजेसाठीही करतो. जर तुम्ही तांदूळाचे काही दाणे हळदीत रंगवून पर्समध्ये ठेवले तर तुमचे खर्च कमी होतील आणि पैशांची आवकही वाढेल.
हेही वाचा –
यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स