कॉफी विथ करण (Koffee With Karan Season 7) हा शो नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा ठरताना दिसून येतो. यामध्ये कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत आणि एकमेकांच्या बाबतीतील गप्पाटप्पा, गॉसिप हे पाहायला नेहमीच प्रेक्षकांना आवडते आणि यावर्षी या रियालिटी शो चा सातवा सीझन सुरू झाला असून पहिले तीन भाग खूपच गाजले आहेत. त्यातही रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भटच्या (Alia Bhatt) भागाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले असल्याचे दिसून आले आहे. दर गुरूवारी याचा नवा भाग प्रसारित होतो आणि आता केवळ टॉलीवूडवरच नाही तर बॉलीवूडवरही राज्य करण्यासाठी तयार झालेला विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांच्या मुलाकखतीचे टीझर प्रदर्शित झाले आहे आणि यामध्ये विजयने केलेल्या वक्तव्यामुळे टीझरला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता हा भाग कधी प्रसारित होतोय याचीच वाट प्रेक्षक पाहात आहेत.
लायगरचा हा हिरो आहे बिनधास्त
विजय देवरकोंडाने दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि बॉलीवूडमध्ये ‘लायगर’ (Liger) चित्रपटातून विजय प्रेक्षकांसमोर येत आहे. नुकतेच याचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांनी या ट्रेलरला तुफान प्रतिसाद दिला आहे. तर कॉफी विथ करणमध्ये अनन्या आणि विजयने आपल्या वक्तव्यांनी धमाल केली आहे. टीझर पाहिल्यानंतर पूर्ण भागात किती धमाल असू शकते याचा नक्कीच अंदाज येतो आहे. कॉफी काऊच ही एक अशी जागा आहे जिथे कोणीच आपले सिक्रेट्स लपवू शकत नाही. तर पॉलिटिकली उत्तर देणं इथे प्रत्येकाला जमतंच असं नाही. हीच गोष्ट विजयच्या बाबतीतही घडताना दिसून येत आहे. या शो मध्ये विजय आपल्या सेक्स लाईफबाबत बोलताना दिसून आला आहे.
अनन्या आणि करणने घेतली विजयची फिरकी
करणने (Karan Johar) एका पार्टीत आदित्य रॉय कपूर आणि विजय नक्की काय करत होते असा प्रश्न विचारला तर दुसऱ्या बाजूला अनन्या म्हणाली की, याबाबत त्याला काही विचारू नकोस. तर यावर विजयने काहीही उत्तर देणे टाळले. त्यानंतर शेवटचे सेक्स कधी केले होते असा प्रश्न विचारल्यावर अनन्याने आज सकाळीच केले असेल असे विजयच्या बाबतीत म्हटले आणि त्यावरही विजयच्या हावभावावरून प्रेक्षकांना नक्कीच मजा येत आहे. तर कॉफी बिंगो (Coffee Bingo) सेगमेंटमध्ये विजय देवराकोंडाने आपण आतापर्यंत कोणकोणत्या जागी सेक्स केले आहे याबाबत खुलासा करत सर्वांनाच धक्का दिला. सार्वजनिक ठिकाणी आणि कारमध्येही आपण सेक्स केल्याचे यावेळी त्याने मान्य केले आहे. यावर करणने ही असुविधाजनक नाहीये का? असं विचारल्यावर विजयने Desperate Times असे मजेशीर उत्तर देत सर्वांनाच धक्का दिला आहे. या टीझरमधली ही धमाल प्रेक्षकांना आवडत असून सोशल मीडियावर सध्या कमेंट्सचा पाऊस पडताना दिसून येत आहे.
Threesome वर देखील विजयने केले वक्तव्य
बऱ्याचदा सेलिब्रिटी आपल्या व्यक्तीगत आयुष्याबाबत बोलणे टाळतात आणि त्यातही जर सेक्स असेल तर त्याबाबत न बोलणेच बरे असा अनेकांचा पवित्रा असतो. मात्र करण जोहरने विजयला थ्रीसमबाबत प्रश्न विचारला असता आपण कधीही हे केले नसल्याचे सांगितले. मात्र करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ‘माझी काहीच हरकत नाही’ असंही उत्तर विजयने दिले आहे. याआधी आलेल्या जान्हवी आणि साराने विजयला ‘चीज’ म्हटले होते. याबाबतदेखील विजयला विचारणा करण्यात आली आणि त्यावर अनन्या म्हणाली मलादेखील ही प्लॅटर हवी आहे. तर MyGlamm Zone मध्येही दोघांनी धमाल केली असल्याचे कळते आहे. त्यामुळे विजय देवरकोंडाचा हा भाग नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. कधी एकदा हा भाग प्रसारित होतो आहे याचीच आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade