मेकअप करणे ही एक कला आहे. ती सर्वांना जमते असं नाही. तर अनेक जणी मेकअप करतात असंही नाही. पण मेकअपचे नक्की बेसिक काय आहे आणि मेकअप करताना कोणती उत्पादने वापरणे गरजेचे आहे हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे. मेकअप करताना काही उत्पादनांचा वापर सर्रास केला जातो. तसं पाहायला गेलं तर मेकअप बेसिक हे दोन प्रकारचे असते. त्यामुळे तुम्ही कोणते बेसिक वापरता यावरदेखील असते. तुम्हालाही मेकअपचे बेसिक जाणून घ्यायचे असेल आणि यासाठी कोणती उत्पादने चांगली आहेत हेदेखील तुम्हाला आम्ही या लेखात सांगणार आहोत.
सर्वात पहिल्यांदा वापरावे मॉईस्चराईजर
मेकअप करताना सर्वात पहिल्यांदा तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्यायला हवा. चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर मेकअप बेसिक करताना सर्वात पहिल्यांदा वापरा मॉईस्चराईजर. चेहऱ्याला मॉईस्चराईजर लावणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सतत मेकअप केल्यास, चेहरा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही मॉईस्चराईजर लावल्यास, तुम्हाला त्रास होत नाही.
तुम्हाला सर्व स्किन टोनसाठी चांगले मॉईस्चराईजर हवे असेल तर तुम्ही The Skin Story – Aqua Boost All Day Moisturizer चा वापर करू शकता. हे अत्यंत चांगले मॉईस्चराईजर असून त्वचा चिकट होत नाही. हे मॉईस्चराईजर तुमच्या त्वचेवर येणार ब्रेकआऊट्स दिसू देत नाही आणि त्वचा कोरडी राहू देत नाही. तसंच हे तुमच्या खिशाला परवडण्यासारखे आहे. तसंच संवेदनशील त्वचेसाठीही याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. बेसिक मेकअप करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मॉईस्चराईजरचा वापर करावा.
प्रायमर लावणे आहे दुसरे बेसिक
चेहऱ्यावर जर खड्डे असतील तर प्रायमर लावणे अत्यंत गरजेचे आहे. प्रायमर लावल्याने तुमच्या त्वचेवरील पोर्स व्यवस्थित होतात आणि तुमचा चेहरा अत्यंत व्यवस्थित होऊन मेकअपसाठी योग्य होतो. तुमची त्वचा जर खडबडीत असेल तर ती व्यवस्थित करण्यासाठी प्रायमरचा उपयोग होतो. तसंच त्यानंतर त्वचेवर फाऊंडेशन लावायचे असेल तर एक बेस तयार करण्यासाठी प्रायमर लावणे आणि तुमची त्वचा इव्हन होते. यासाठी तुम्ही Renee Face Base Illuminating Primer चा उपयोग करू शकता. हे प्रायमर तुम्हाला अधिक काळ चेहऱ्यावर टिकून राहण्यास मदत करते. याशिवाय याचा वापर करणेही सोपे आहे. तुमचा नैसर्गिक लुक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या उत्पादनाचा वापर करू शकता. याशिवाय तुमची त्वचा अधिक चमकदार दिसण्यासाठी आणि अधिक काळ मॉईस्चराईजरचा परिणाम टिकून राहण्यासाठीही याचा उपयोग होतो.
कन्सिलरचा करा वापर
मेकअपमध्ये फेस बेस मेकअपसाठी तुम्ही Renee Face Base Concealer चा देखील वापर करू शकता. कन्सिलर हे मेकअपसाठी लागणारे एक महत्त्वाचे उत्पादन आहे. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, असलेले व्रण, डोळ्याखाली आलेले काळे डाग जर लपवायचे असतील तर या उत्पादनाचा बेसिक मेकअपमध्ये तुम्हाला वापर करून घेता येतो. मेकअप करताना चांगला लुक मिळविण्यासाठी आणि स्किन टोन परफेक्ट करण्यासाठी फाऊंडेशनच्या आधी तुम्ही कन्सिलरचा वापर करावा.
चांगले कव्हरेज मिळण्यासाठी या कन्सिलरचा तुम्ही वापर करू शकता. तसंच अधिक काळ हे टिकते. तसंच तुमची असमान त्वचा समान करण्यासाठी उपयोग होतो. तसंच त्वचा नैसर्गिक दिसावी यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच चेहऱ्यावरील सर्व व्रण लपविण्यासाठी याचा उपयोग होतो आणि कोणत्याही स्किन टोनवर हा नैसर्गिकच दिसतो हे याचे वैशिष्ट्य आहे.
फाऊंडेशन खास कार्यक्रमासाठी
नियमित वापरासाठी नक्कीच आपण फाऊंडेशन वापरत नाही. मात्र घरातील काही खास कार्यक्रम असेल अथवा बाहेर कुठे कार्यक्रमाला जाण्यासाठी बेसिक मेकअपमध्ये फाऊंडेशनचा वापर करण्यात येतो. Renee Face Base Foundation चा तुम्ही यासाठी उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला जर फाऊंडेशनच्या बाबतीत जास्त काही माहिती नसेल आणि पहिल्यांदाच वापर करणार असाल तर तुम्ही नक्की वापरून पाहा.
या फाऊंडेशनमध्ये एसपीएफचे संरक्षण आहे. याशिवाय इतर फाऊंडेशनच्या तुलनेत हे जास्त काळ टिकते आणि नैसर्गिक लुक मिळवून देते. यामध्ये असलेले विटामिन ई हे त्वचेला अधिक चांगले पोषण देते आणि मेकअप लुकसाठी तुम्हाला नैसर्गिक लुक मिळवून देण्याचे कामही हे फाऊंडेशन करते.
लिप आणि चिक टिंट (Lip and cheek tint)
बेसिक मेकअपमध्ये जेव्हा तुम्हाला ओठ आणि गालांसाठी कोणतेही उत्पादन लागणार असेल आणि तुम्हाला अति मेकअप आवडत नसेल तर तुम्ही लिप आणि चिक टिंटचा वापर करावा. MyGlamm चे Tint It Up – Frolic वापरावे. यामध्ये चार शेड्स असून तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या चेहऱ्यावर अगदी नैसर्गिक लुक मिळवून देते आणि त्याशिवाय तुमचे ओठ आणि गाल अधिक तरूण दिसण्यासाठी मदत करते. याशिवाय अधिक काळ टिकून राहते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे विगन फ्रेंडली आहे. तसंच याचे टेक्स्चर क्रिमी असून हे वापरण्यास आणि काढण्यास सोपे आहे. याशिवाय हे सर्व स्किन टोनसाठी उपयुक्त आहे. क्रुएल्टी फ्री आणि परफ्युम फ्री असल्यामुळे तुमच्या त्वचेवर याचा दुष्परिणाम होत नाही.
काजळ आणि आयलाईनर
कधी कधी मेकअप बेसिक करताना इतर कोणत्याही उत्पादनांची गरज भासत नाही, जर तुमच्या किटमध्ये योग्य काजळ आणि आयलाईनर (Kajal and Eyeliner) असेल. काही जणांचा लुक केवळ काजळ आणि आयलाईनर लावल्याने पूर्ण होतो. तुम्हाला मेकअप बेसिक करताना योग्य उत्पादनांचा वापर करणेही आवश्यक आहे. यासाठी तुम्ही MyGlamm चे MANISH MALHOTRA 24H KAJAL EYELINER – BLACK DIAMOND वापरू शकता. काजळ, आयलाईनर आणि आयशॅडो अशा तिन्ही वापरासाठी तुम्हाला हे उत्पादन उपयुक्त ठरते. याचा इंटेन्स आणि गडद रंग तुम्हाला आपलासा वाटेल. तसंच 24 तासापर्यंत हे काजळ टिकून राहाते. याशिवाय वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून मॅट फिनिश आहे. वॉटरप्रूफ, स्मज-प्रूफ, टिअर-प्रूफ आणि स्वेट-प्रूफ असे सगळे गुण या एका काजळमध्ये मिळतात. तसंच हे त्वचारोगतज्ज्ञांकडून परीक्षण करून घेण्यात आल्यामुळे कोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त ठरते.
लिप बाम
बेसिक मेकअपमध्ये सर्वात शेवटचे उत्पादन म्हणजे लिप बाम. काही जणांना कोणत्याही मेकअप उत्पादनांचा वापर करायला आवडत नाही. पण केवळ लिप बामचा वापर करूनही तुम्हाला तुमचा लुक अधिक सुंदर करता येतो. यासाठी नैसर्गिक लिप बाम हवे असेल तर तुम्ही Myglamm चे Superfoods Lip Balm वापरावे.
हे टिंटेट लिप बाम असून तुमच्या ओठांना 12 तासापेक्षा अधिक तास पोषण देण्याचे हे काम करते. याशिवाय यामध्ये युव्हीए आणि युव्हीबी किरणांपासून संरक्षण करण्यासाठी एसपीएफ 20 देखील समाविष्ट आहे. तसंच अव्हाकाडो बटर, विटामिन ई, शिया बटर, जोजोबा आणि मोरिंगा तेलाचाही यामध्ये समावेश आहे, ज्यामुळे तुमच्या ओठांचा मुलायमपणा टिकून राहातो. इतर कोणताही मेकअप उत्पादनाचा वापर केला नाही आणि तरीही तुम्हाला चांगला लुक हवा असेल तर तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता.
आम्ही तुम्हाला बेसिक मेकअपसाठी कोणती चांगली उत्पादने वापरता येतील याबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्हीही याचा वापर करून करा तुमचा लुक अधिक ग्लॅमरस!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक