Mythology

तुमची जन्मतारीख असेल 4,13,22,31.. असा आहे तुमचा स्वभाव

Leenal Gawade  |  Feb 2, 2021
तुमची जन्मतारीख असेल 4,13,22,31.. असा आहे तुमचा स्वभाव

प्रत्येकाच्या स्वभावाची काही खास वैशिष्ट्य असतात.काहींचा स्वभाव तापट काहींचा प्रेमळ तर काहींचा अगदीच घाबराघुबरा… तुमचा स्वभाव कसा आहे या बद्दल तुमची जन्मतारीख खूप काही सांगून जाते. या आधी आपण मुलांक 1 आणि 2 या मुलांकाविशयी जाणून घेतले आहे आणि आज आपण मुलांक 4 बद्दल अधिक जाणून घेणार आहोत. ज्यांची जन्मारीख 4, 13, 22, 31 असते यांचा स्वभाव थोडासा विशेष असतो. अशा व्यक्ती नेमक्या कशा असतात. त्यांचे स्वभावदोष आणि त्याची वैशिष्ट्य काय ती जाणून घेऊया

2,11,20,29 जन्मतारीख असलेल्यांचा असतो असा स्वभाव

  1. 4 मुलांक असलेल्या व्यक्तींवर हर्षल ग्रहाचे अधिपत्य असते. त्यामुळे या व्यक्ती फारच चिकित्सक असतात. नव्या गोष्टी शोधण्यात यांचा हातखंडा असतो. त्यामुळे नव्या नव्या गोष्टी शोधायला यांना खूप आवडते. त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट असेल त्या गोष्टी करण्यामध्ये त्या चांगल्यात माहीर असतात.
  2. अतिशय विचारी अशा या व्यक्ती असतात. पण असे करताना त्यांना कधी कधी ते कधी चिंताग्रस्त होतात हे कळत नाही. त्यामुळे त्या काहीशा तापट आणि चिडचिड्या स्वभावाच्या असतात. या लोकांना सगळे काही कळत असते. पण ते इतरांना समजून सांगण्याची त्यांची पद्धत समोरच्याला मुळीच कळत नाही. त्यांचे बोलणे हे मुळीच पटणारे नसते. समोरच्याला त्यांचे म्हणणे पटत नाही. अशावेळी त्यांना उगीचच सगळे एकटे पाडतात असे वाटत राहते. 
  3. अत्यंत प्रामाणिक अशी ही लोकं असतात. त्यांच्या मनात फसवणुकीची भावना मुळीच नसते. कोणत्याही गोष्टींमध्ये ते कोणाचीही फसवणूक करत नाही. त्यांचा तो स्वभावच नाही. जर त्यांच्यासमोर कोणी चुकत असेल तर त्या अगदी ठामपणे त्यांना सांगतात. 
  4. सतत काहीतरी करत राहणे या लोकांना खूप आवडते. सुट्टीच्या दिवशीही काहीतरी करत राहायला त्यांना फार आवडते. छोटी छोटी काम करत आपला वेळ घालवायला या लोकांना फार आवडते. मग त्यासाठी ते आपला कितीही वेळ वाया घालवू शकतात. 
  5. अस्थिरता हा यांच्यामधील एक दुर्गुण आहे. त्यांना सतत आपण काही केले की, ते चूक की बरोबर यामध्येच गोंधळत राहायला होते.अगदी एखादी गोष्ट झाली तरी ते त्याचा विचार सतत करत राहतात. इतका की मग त्यामुळे त्यांचा हट्टी स्वभाव वाढतो हे त्यांना कळत नाही.

जाणून घ्या 1 मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो तरी कसा

 

Instagram

  1. एखादी गोष्ट या लोकांना हवी असेल तर ते त्याचा चांगलाच पिछ्छा पुरवतात. त्यांना एखादी गोष्ट त्याचवेळी द्या. असा त्यांचा हट्ट असतो. असा हट्ट करताना ते किती जणांना दुखावतात याचा अंदाजही त्यांना येत नाही. पण ते हट्ट करत राहतात.
  2. अबोल असा स्वभाव असल्यामुळे या व्यक्ती चारचौघात कितीही उठून दिसल्या तरी त्यांचा मित्र परिवार हा कमी असतो. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतका त्यांचा मित्र परिवार असतो. त्यांच्या फारच कमी लोकांमध्ये राहायला आवडते. 
  3. शॉर्टकट हा त्यांचा अत्यंत वाईट असा स्वभाव आहे. एखाद्या गोष्टीत यश मिळवण्यासाठी त्या शॉर्टकट मारतात. त्यामुळे बरेचदा त्यांना अपयश येते. त्यांनी त्यांचा हा स्वभाव बदलायला हवा.
  4. आर्थिक बाजूचा विचार करता अत्यंत परिश्रम करुन ते त्यांचा पैसा कमावतात.अशा व्यक्ती श्रीमंत असल्या तरी देखील ते त्यांची श्रीमंती दाखवून देत नाही.त्यांना साधे राहायला आवडते. पण ते परिश्रम करत राहतात. 
  5. व्यवहाराच्या बाबतीत या व्यक्ती फारच काटेकोर असतात. त्यांना व्यहारात चूक करायला आवडत नाही. आणि ते दुसऱ्यांनाही करु देत नाही.

    फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या

बड्या असामी: ना.सी फडके, भीमसेन जोशी, सरदार वल्लभभाई पटेल

Read More From Mythology