तुमची जन्मपत्रिका म्हणजे तुमचा जन्म झाला त्या क्षणी सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह कुठे होते याचा एक स्नॅपशॉट आहे. तज्ज्ञ ज्योतिषी तुम्हाला पत्रिकेतील ग्रह कुठल्या घरात आहेत यावरून तुमचे व्यक्तिमत्व, सामर्थ्य, आव्हाने, नातेसंबंध आणि बरेच काही सांगू शकतात. तसेच तुमचा जन्म झाला तेव्हा मंगळाचे स्थान काय होते यावरून देखील तुमच्या एकूण आवडीनिवडी व व्यक्तिमत्वाच्या बाबतीत अनेक गोष्टी जाणून घेता येतात. तुमच्या मार्स साइनचा अर्थ आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडू शकतो हे जाणून घ्या. अर्थात पत्रिकेतील केवळ एकाच ग्रहावरून कशाचाही अंदाज लावता येत नाही. संपूर्ण पत्रिकेचा व ग्रहांच्या स्थानांचा सखोल अभ्यास करूनच एखाद्याच्या पत्रिकेतील योग कसे असू शकतील याचा अंदाज वर्तवता येतो.
मंगळ पुरुषांच्या गुणांचे प्रतिनिधित्व करतो
आपण मागच्या लेखात बघितले की स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ ज्या घरात आहे त्यावर तिला कोणत्या प्रकारच्या पुरुषांविषयी आकर्षण वाटू शकते हे सांगता येते. मंगळ ग्रह आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीचे कुठले गुण आकर्षक वाटतात याचे संकेत देतो. खास करून स्त्रियांच्या पत्रिकेत रवीचे व मंगळाचे स्थान त्यांना पार्टनर म्हणून कसा पुरुष अपेक्षित असतो याविषयी संकेत देते. मंगळ पारंपारिकपणे पुरुषांच्या गुणांचे प्रतिनिधित्व करतो. मागच्या लेखात आपण स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ मेषेत, वृषभेत, मिथुनेत ,कर्केत, सिंहेत व कन्येत असेल तर त्यांना कोणत्या प्रकारचे पार्टनर आवडू शकतात हे बघितले. आता त्यापुढील राशींबद्दल जाणून घेऊया.
प्रत्येक राशीची विविध वैशिष्ट्ये
तूळेचा मंगळ – जर एखाद्या स्त्रीचा मंगळ तूळ राशीमध्ये असेल, तर ती वरकरणी दिसायला आकर्षक असलेल्या पुरुषांपेक्षा ,ज्यांची वागणूक सभ्य व चांगली असेल, शांत आणि संतुलित स्वभाव असलेल्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होते. अतिस्पष्टवक्तेपणा आणि असभ्यपणा या स्त्रियांना आवडत नाही. या स्त्रिया अशा पुरुषांना प्राधान्य देतात जे दुसऱ्यांना सहकार्य करतात आणि जे आनंदी असतात. या स्त्रियांना क्लासी, रोमँटिक पुरुष प्रचंड आवडतात.
वृश्चिकेचा मंगळ -जर स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ वृश्चिक राशीमध्ये असेल तर तिला डार्क , कॉम्प्लिकेटेड व्यक्तिमत्व असलेले शक्तिशाली, ध्येयाने झपाटलेले पुरुष आकर्षक वाटतात. या स्त्रियांना गूढ स्वभाव असलेले सेन्शुअल पुरुष आवडतात. तसेच जे पजेसिव्ह असतात त्यांच्याकडे या स्त्रिया आकर्षिल्या जातात.
धनु राशीतील मंगळ – जेव्हा स्त्रीचा मंगळ धनु राशीमध्ये असतो तेव्हा तिला खेळकर, मजेदार स्वभावाचा पण बुद्धिमान आणि प्रामाणिक पुरुष पार्टनर म्हणून आवडतो. त्यांना विनोदी स्वभावाचे बुद्धिमान पुरुष आकर्षक वाटतात.त्या अशा प्रामाणिक पुरुषांच्या शोधात असतात जे स्वतःच्या दिसण्याविषयी किंवा पैश्यांविषयी अहंकार बाळगत नाहीत.
मकर राशीतील मंगळ – जर एखाद्या स्त्रीचा मंगळ मकर राशीत असेल तर तिला सक्षम, सुस्थापित, कामात कुशल असा पुरुष पार्टनर म्हणून आवडतो. तिला त्याचे स्टेटस नको असते पण तिला असा माणूस हवा असतो जो तिच्या योग्यतेचा असेल. अस्थिर, चंचल , बेजबाबदार पुरुष तिला अजिबात आवडत नाही. ज्याच्या जीवनात काहीतरी महत्वाचे ध्येय असते असा जबाबदार आणि आयुष्याबाबत गंभीर असलेला पुरुष तिला स्वतःच्या योग्यतेचा वाटतो.
कुंभेचा मंगळ- जर एखाद्या स्त्रीचा मंगळ कुंभ राशीत असेल तर तिला काहीसा अपारंपरिक, देखणा , बुद्धिमान, ज्ञानी पुरुष पार्टनर म्हणून आवडतो. तो अलिप्त असला तरी त्यांना चालते. पण या स्त्रियांना कठोर व कंटाळवाणे गंभीर पुरुष आवडत नाहीत.
मीन राशीतील मंगळ- जर एखाद्या स्त्रीचा मंगळ मीन राशीत असेल तर ती सहसा संवेदनशील, दयाळू आणि कॉम्प्लिकेटेड स्वभावाच्या पुरुषाकडे आकर्षित होते. या स्त्रियांना कलात्मक ,हळवे, संवेदनशील पुरुष आवडतात. कठोर ,गंभीर पुरुष त्यांना आवडत नाहीत.
मेष ते कन्या राशीतील मंगळाविषयी जाणून घ्यायचे असल्यास अधिक वाचा –
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक