मनोरंजन

असं काय झालं की रेस्टॉरंटमध्ये अचानक प्लेट फोडू लागली अर्पिता खान

Trupti Paradkar  |  Dec 7, 2020
असं काय झालं की रेस्टॉरंटमध्ये अचानक प्लेट फोडू लागली अर्पिता खान

सलमान खानची बहीण अर्पिता खान नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती अभिनेत्री नसूनही तिचा थाटमाट एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणेच असतो. शिवाय बॉलीवूडचा भाईजान सलमान खानची ती सर्वात लाडकी बहीण आहे हे विसरून चालणार नाही. सलमान खानचं बहीण अर्पिता, तिची दोन्ही मुलं आहिल आणि आयत यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. अर्पिता लाईमटाईट पासून दूर असली तरी कॅमेराची नजर तिच्यावर नेहमीच असते. नुकताच अर्पिताचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती दुबईतील एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये चक्क प्लेट तोडताना दिसत आहे.

काय आहे हा व्हिडिओ

या व्हिडिओत क्लिअर दिसत आहे की अर्पिता आणि तिच्या  काही मैत्रिणी दुबईतील एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेलेल्या आहेत. डिनरसाठी टेबलवर बसल्यावर अर्पिता मात्र एका पाठोपाठ एक अशा सर्व प्लेट्स धडाधड जमिनीवर टाकत आहे. आश्चर्य म्हणजे असं करताना ती मुळीच रागावलेली नाही. उलट ती आणि तिच्या मैत्रिणी आनंद घेत या प्लेट्स फोडण्याचं काम करत आहेत. अर्पिताचा नवरा आयुष शर्माच्या चोगाडा या गाण्याचा तालावर डान्स करतही ती या प्लेट फोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ जितका व्हायरल होत आहे तितका चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की अर्पिता खान आणि तिच्या मैत्रिणी रेस्टॉरंटमध्ये एवढं नुकसान नेमकं का करत आहेत. 

प्लेट फोडणे का मानले जाते शुभ –

वास्तविक अशा प्रकारे प्लेट फोडणं हे ग्रीकमध्ये शुभ मानलं जातं. ग्रीक प्रथेनुसार असं केल्यामुळे वाईट गोष्टींचा अंत होतो आणि चांगल्या गोष्टी तुमच्या जवळ येतात. असंही मानलं जातं की अशा प्रकारे प्लेट्स फोडल्यामुळे तुम्ही सुरू करत असलेल्या नवीन कामात तुम्हाला यश मिळतं आणि कोणतीही अडचण येत नाही. जीवन सुखासमाधानात घालवण्यासाठी दरवर्षी ग्रीकमध्ये ही प्रथा पाळली जाते. दुबईच्या या रेस्टॉरंटमध्येही हे ट्रेडिशन फॉलो केलं जात आहे. यासाठीच दुबईत वेकेशनवर गेलेली अर्पिता या रेस्टॉरंटमधील प्लेट्स अशा भराभर फोडत आहे.

अर्पिता आणि आयुषच्या लग्नाला झाली सहा वर्षे

18 नोव्हेंबरला अर्पिता आणि आयुषच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अर्पिताने पतीसोबतचा रोमॅंटिक फोटो आणि एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. तिने शेअर केलं होतं की, “माझा  मित्र ते पती होण्यापर्यंतचा प्रवास. मी या प्रवासाच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत जेव्हा तु आणि मी हा प्रवास एकत्र करण्याचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की आपण सहा वर्षापूर्वी आपलं  आयुष्य एकमेकांसोबत जोडलं. लग्नाच्या वाढदिवसाच्या  शुभेच्छा! ही पहिलीच वेळ आहे जेव्हा आपण लग्नाच्या वाढदिवस एकत्र साजरा नाही करत आहोत. मात्र मला या  गोष्टीचा आनंद आहे की तु ते करत आहेस जे करायला तुला खूप आवडतं. अजून अनेक वर्षे आपल्याला एकत्र राहायचं आहे. आनंद, गॉसिप, भांडणं आणि चढ-उतार शेअर करायचे आहेत. मी तुला खूप मिस करत आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम करते आयुष शर्मा” अर्पिता खान कुटुंबाचं शेंडेफळ आहे. त्यामुळे ती घरात सर्वांची खूप लाडकी आहे. आयुष सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या एका चित्रपटात तो कैतरिनाची बहीण इसाबेलसोबत स्क्रिन शेअर करत आहे. ज्यामुळे त्याच्या लग्नाच्या सहाव्या वाढदिवशी तो अर्पितासोबत नव्हता. मात्र आता अर्पिताही डिसेंबर वेकेशनचा आनंद लुटण्यासाठी दुबईला गेलेली आहे. थोडक्यात दोघंही त्यांच्या आयुष्यात खूश आहेत आणि जगण्याचा आनंद लुटत आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात

हिरोंपेक्षाही हँडसम आहेत हे ऑनस्क्रिन व्हिलन

या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख

Read More From मनोरंजन