आपल्या घरात आनंद आणि सुखशांती राहावी यासाठी आपण अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतो. वास्तुदोष निवारण करणे, घरात सकारात्मक लहरी तयार व्हाव्या म्हणून झाडे लावणे, कापूर लावणे, दाराला तोरण लावणे, घराच्या कोपऱ्यांत खडेमीठ ठेवणे इत्यादी. तसेच घरात सकारात्मकता टिकून राहावी म्हणून आपण अनेक फेंगशुई आधारित वस्तू देखील घरात ठेवतो. लाफिंग बुद्धा, बांबू प्लांट, विंड चाइम वगैरे आपण घरात ठेवतो जेणे करून घरातील नकारात्मक लहरी दूर व्हाव्यात. साधारणपणे असे दिसून येते की लोक आपल्या घरात सजावट म्हणून विंड चाइम लावतात. असे म्हणतात की विंड चाइम नकारात्मकतेला दूर ठेवते. फेंगशुईमध्ये आनंद आणि समृद्धीसाठी विंड चाइम एक फायदेशीर वस्तू मानली जाते. असे मानले जाते की ते लावल्याने घरामध्ये सौभाग्य प्राप्त होते. पण विंड चाइम जर योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवले नाही तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.
विंड चाइमबाबत या चुका करू नका
विंड चाइम विकत घेताना, सर्वप्रथम तुम्ही ते कोणत्या खोलीत ठेवणार आहात हे लक्षात घ्या. जर तुम्ही हे तुमच्या बेडरूममध्ये ठेवणार असाल तर 9 रॉड विंड चाइम घ्या ज्याने तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि शांती येईल.
स्वयंपाकघर आणि देवघरात विंड चाइम लावणे टाळा.पूजेच्या खोलीत देवतांचे वास्तव्य असते, त्यामुळे तेथे आधीपासूनच सकारात्मक ऊर्जा असते. स्वयंपाकघरात विंड चाइम लावल्याने घरातील महिलांना शारीरिक त्रास होऊ शकतो. जर तुम्ही लाकडी विंड चाइम आणले आले तर ते पूर्व आणि दक्षिण दिशेला ठेवा.
जर तुमच्या घरातील खोल्या मोठ्या असतील तर त्यानुसार मोठे विंड चाइम खरेदी करा. तर लहान खोलीत लहान विंड चाइम लावा. फेंगशुईनुसार जर घराच्या नैऋत्य दिशेला स्टोअर रूम, किचन, बाथरूम असेल तर येथे धातूचे विंड चाइम लावणे फायदेशीर ठरते. विंड चाइम हे घरामध्ये अशा ठिकाणी लावणे शुभ असते, जिथे कोणी बसत नाही. हे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. घरातील सदस्य ज्या ठिकाणी बसतात अशा ठिकाणी ते लावल्यास त्यांचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच घरामध्ये कोणत्या प्रकारचे विंड चाइम्स लावावेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते.
विंड चाइम्सचे प्रकार
असे मानले जाते की घरामध्ये पाच रॉडचे विंड चाइम वापरल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तर वायव्य दिशेला 6 रॉड्स असलेले पिवळ्या रंगाचे विंड चाइम लावल्यास प्रसिद्धी आणि पैसा या दोन्हीमध्ये कधीही कमतरता भासत नाही. 7 रॉडचे चांदीचे आणि पांढऱ्या रंगाचे विंड चाइम पश्चिम दिशेला लावल्याने तुमचे कौटुंबिक संबंध मधुर होतात.विंड चाइम खरेदी करताना त्याचा आवाज कर्कश नाही गोड असावा याकडे लक्ष द्या. जर तुम्ही घरामध्ये लटकवण्यासाठी विंड चाइम विकत घेत असाल तर ते खूप मोठे नसावे. जर ते घराच्या बाहेर किंवा मोठ्या खोलीत टांगायचे असेल तर त्याचा आकार खूप लहान देखील नसावा. तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये एकाच ओळीत तीन दरवाजे असतील तर त्यांच्यामध्ये 5-रॉडचा विंड चाइम लावावा. हे रोग किंवा कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण करते.
क्ले विंड चाइम्स, ज्यात 2 किंवा 9 रॉड असतात, ते घरातील सदस्यांचे नातेसंबंध चांगले ठेवण्यास मदत करतात. घराच्या नैऋत्य भागात हे विंड चाइम लावल्याने परस्पर संबंधांमध्ये मजबूती आणि गोडवा येतो. आणि ज्यांना नोकरीत प्रमोशन मिळवायचे आहे त्यांनी पिवळ्या रंगाचा विंड चाइम वायव्य दिशेला लटकवावा. सिरॅमिकचे विंड चाइम बसवल्यास, हे लक्षात ठेवा की ते नैऋत्य किंवा ईशान्य दिशेला ठेवणे चांगले. जर तुम्हाला मुलांच्या खोलीत विंड चाइम लावायचे असेल तर त्या खोलीत धातूचे विंड चाइम लावा.
अशा प्रकारे घरात विंड चाइम लावा.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक