Fitness

घरीच रहा पण फिट रहा…घरून काम करताना या टिप्स वापरा

Dipali Naphade  |  Apr 6, 2021
घरीच रहा पण फिट रहा...घरून काम करताना या टिप्स वापरा

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाव्हायरस संसर्गासोबतची लढाई आजही सुरुच आहे. आता भारतात दुसरी लाट पसरली असून पुन्हा एकदा संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या काळात सगळ्याना घरी आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे. आपल्या कामाचे अनियमित वेळापत्रक आणि वाढीव तास आपल्याला त्रासदायक ठरत आहेत. घरून सुरु असलेल्या कामांमधून वेळ काढून स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लवकर उठून ऑफिसकरिता बस-ट्रेनचा धवपळीचा प्रवास, तासनतास सुरु राहणा-या मिटींग्स अशा अनेक कारणांमुळे अनेकांना सुरुवातील वर्क फ्रॉम होम कल्चर अतिशय आवडले. पण मात्र जसजसा काळ उलटत गेला तसतसे हे काम कंटाळवाणेही वाटू लागले. घरबसल्या कामाने शारीरिक हलचाली कमी झाल्या असून लोकं अजूनच आळशी होत असल्याचे दिसून येतेय. तर अनेकांना घरबसल्या तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झालेले हे बदल धोकादायकही ठरू शकतात. याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले डॉ. तुषार राणे, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून. 

चुकीच्या पद्धतीने काम करण्यामुळे होतोय त्रास

Freepik

स्नायुंमध्ये होणा-या वेदना: वर्क फ्रॉम होम करतेवेळी अयोग्य पध्दतीने बसणे, टेबल अथवा खुर्चीचा अभाव  आणि तासनतास एकाच स्थितीत बसल्याने अनेकांना स्नायुंमध्ये वेदना होणे, पाठदुखी, कंबर दुखणे, हात-पायांचे दुखणे अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. हे टाळण्यासाठी सर्वात आधी योग्य पद्धतीने बसण्याची सवय लावा तसेच पलंगावर बसू नका. योग्य आकार व उंचीची खुर्ची वापरा जेणेकरून तुमच्या पाठीचा कणा ताठ राहील आणि बसण्याच्या स्थितीत अडचणी येणार नाहीत.

डोळ्यांवरील ताण: आपण सतत आपल्या लॅपटॉपवर किंवा संगणकावर काम करत आहात म्हणून आपल्याला डोळ्यांची समस्या जसे की अंधुक दृष्टी, डोळ्यांची जळजळ इतर समस्या उद्भवत आहेत. गॅझेट्सच्या सतत वापरामुळे आपल्याला डोकेदुखी देखील होऊ शकते. गॅझेट्समधून बाहेर पडण निळ्या रंगाचा प्रकाश देखील आपल्या डोळ्यांना त्रासदायक ठरु शकते. मुलांनादेखील यामुळे डोळ्यांवरील ताण वाढून त्रास होत आहे. 

कानाचे आरोग्य: आपल्याला व्हिडिओ कॉल्सद्वारे किंवा फोन कॉलद्वारे ऑनलाईन मिटींगमध्ये उपस्थित रहावे लागत असेल तर इअर फोनचा वापर करावा.  आवाजाची पातळी कमी ठेऊन कानांच्या पडद्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

तणाव: वर्क फ्रॉम होममुळे नैराश्य, तणाव, चिंता आणि दु: खाच्या भावना उद्भवू शकतात. जास्त तास काम केल्यामुळे थकवा देखील जाणवू शकतो.

वजन वाढणे: बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे आपल्याला आरोग्याला घातक ठरू शकतो. व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा, हृदयरोग तसेच मधुमेहासारखा आजार बळावण्याची शक्यता असते.  

अपुरी झोप: व्यस्त वेळापत्रक आणि गॅजेट्सचा अतिवापर आरोग्यास हानीकारक ठरतो. अपुर्‍या झोपेमुळे तुमचे मानसिक स्वास्थ बिघडू शकते तसेच मन एकाग्र करणे देखील कठीण होऊ शकते. मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यसाठी उपाय असतातच. 

 

घरून काम करताना या टिप्स वापरा

Freepik

काम आणि वैयक्तिक आयुष्यात असा साधा समतोल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Fitness