दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक फोटग्राफी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एक काळ असाही होता जेव्हा आपण एखादा फोटो काढण्यासाठी खास स्टुडिओत जात होतो. मात्र आता काळ बदलला आहे. आधूनिक युगात तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे आज प्रत्येकाच्या घरी कॅमेरा, मोबाईल असतोच. ज्यामुळे आपण घरच्या घरी फोटो काढू शकतो. एवढंच नाही तर आपण जरी एकटे असलो तरी सेल्फीतून आपला आनंद व्यक्त करू शकतो. फोटो काढणे हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे यासाठीच जाणून घेऊ या जागतिक फोटोग्राफी दिनाचा इतिहास आणि महत्त्व
जागतिक फोटोग्राफी दिन का सुरू करण्यात आला
जागतिक फोटोग्राफी दिन सुरू होण्यामागची घटना फार जुनी आणि प्रेरणादायी आहे. 1800 साली छायाचित्र घेणाऱ्या कॅमेराची संकल्पना विकसित झाली. 1839 साली फ्रान्स सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेतले. त्यावेळी डॉगोरोटाईप प्रक्रियेची घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेला जगातील पहिली फोटोग्राफीची प्रक्रिया असं मानलं जातं. सर्वात आधी फ्रान्सने या प्रक्रियेची घोषणा करत पेंटट घेतल्यामुळे या घटनेची आठवण म्हणून जगभरात 19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो.
फोटो येतील एकदम परफेक्ट, पोझ देताना असू द्या या गोष्टी लक्षात
जागतिक फोटोग्राफी दिनाचे महत्त्व
जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. कारण त्यातून या विषयाबद्दल जागरुकता निर्माण होते, फोटोग्राफी बद्दलच्या ज्ञानाचा प्रसार करणे आणि या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करणे हा त्या मागचा मूळ उद्देश आहे. शिवाय या क्षेत्रात आजवर अनेक मोठमोठ्या लोकांनी योगदान दिलेले आहे. त्यांच्या कार्याला सलाम आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा केला जातो.
उंच दिसायचं असेल तर असे काढा फोटो, सोप्या टिप्स
फोटो एक आनंदाचा ठेवा
फोटो हा आज प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. फोटो काढायला आवडत नाही अशी व्यक्ती एखादीच असू शकते. आता तर सेल्फीचा जमाना आहे. त्यामुळे हातातील मोबाईलचा वापर करत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण सतत फोटो काढत असतात. फोटोंच्या माध्यमातून अनेक आठवणी, प्रसंग, क्षण टिपून ठेवता येतात. जे तुमच्यासोबत आयुष्यभर एक आठवणींचा खजिन्याप्रमाणे कायम राहतात. आज तंत्रज्ञानात अनेक बदल झाले आहेत. फोटो काढणे आणि विकसित करणे पूर्वीपेक्षा सहज आणि सोपे झाले आहे. आज तर फोटोग्राफी करणं हे अनेकांचे करिअरच आहे. मात्र यासाठी आधी घेण्यात आलेले कष्ट, मेहनत विसरता येणार नाही. यासाठीच फोटोग्राफीचा इतिहास आणि महत्त्व प्रत्येकाला माहीत असायला हवं.
तुमच्या छंदातूनही मिळवू शकता पैसा जाणून घ्या कसा (Hobbies That Make Money In Marathi)
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade