मनोरंजन

नव्या कथानकासह ओह माय गॉड 2, अक्षयकुमारसोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत

Trupti Paradkar  |  Jun 7, 2021
नव्या कथानकासह ओह माय गॉड 2, अक्षयकुमारसोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत

अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतात. ज्यामुळे त्याच्या गाजलेल्या चित्रपटांचा काही वर्षांनी सीक्वल तयार केला जातो. अक्षयच्या खिलाडी सिरिजचे असेच सीक्वल तयार करण्यात आले. 2012 मध्ये अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ चित्रपट आला होता. हटके कथानक आणि जबरदस्त कॉमेडीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावला होता. धार्मिक विषयामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. मात्र चाहत्यांनी या चित्रपटाला नेहमीप्रमाणेच डोक्यावर घेतलं होतं.  आता लवकरच या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यात नवी कथा आणि नवीन कलाकार असणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असणार आहेत. या संपूर्ण चित्रपटाचे कथानक निराळं असल्यामुळे आणि स्टार कास्टही फ्रेश असल्यामुळे चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच  उत्सुक आहेत.

ओएमजी 2 मध्ये अक्षय आणि यामी पहिल्यांदाच एकत्र

अभिनेत्री यामी गौतमने कमी वेळात बॉलीवूडमध्ये स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले आहे. मोठमोठ्या कलाकार आणि बॅनरसोबत काम केल्यामुळे तिच्या वाट्याला नेहमीच चांगले चित्रपट आलेले आहेत. सध्या ती चर्चेत आहे उरी फेम  दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी विवाह केल्यामुळे…. पण एवढंच नाही लग्न तिला चांगलंच शुभ ठरलं आहे. कारण तिच्या वाटयाला पुन्हा एक चांगला चित्रपट येत आहे. ओएमजी 2 मध्ये यामी गौतम पहिल्यांदाच अक्षयकुमारसोबत झळकणार आहे. त्यामुळे यामीदेखील या चित्रपटाच्या शूटिंगची आतूरतेने वाट पाहत आहे.

काय असणार ओएमजी 2 चे कथानक

ओह माय गॉडचे दिग्दर्शन उमेश शुक्लाने केले होते. तर आता या चित्रपटाच्या सीक्वलचे दिग्दर्शन अमित राय करणार आहे. अमित रायने याआधी रोड टू संगमचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्याने सॅनेटरी नॅपकिन्स, आयपॅड सारख्या शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत. ज्यांचे सगळीकडे खूप कौतुक झालेले आहे. ओएमजी 2 च्या निर्मात्यांच्या मते या चित्रपटात अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. पहिल्या भागात माणूस आणि भगवंताची लढाई दाखवण्यात आली होती. मात्र या भागात निर्मात्यांनी चित्रपटाला थोडा ट्विस्ट देण्याचे ठरवले आहे. यासाठीच या चित्रपटातील हे तीनही कलाकार मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाचे कथानक नेमके कसे असेल हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच  आहे. 

अक्षयने या चित्रपटाला दाखवला आहे हिरवा झेंडा

अक्षय कुमार सध्या नेहमीप्रमाणे एकाचवेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याचे सूर्यवंशी, बेल बॉटम,  अतरंगी रे, पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षा बंधन, रामसेतू प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. याशिवाय त्याच्याकडे आणखी 10 चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स आहेत. ज्यामध्ये भगनानी प्रॉडक्शनचे तीन चित्रपट, करन जौहरचे दोन चित्रपट आणि  एकता कपूरचे तीन चित्रपट आहेत. सहाजिकच त्याने भरपूर विचार करून आणि कथानकाचा विचार करूनच ओएमजी 2 ला हिरवा झेंडा दाखवला आहे. या चित्रपटाच्या शूटिंहसाठी तो सप्टेंबरमध्ये वेळ देणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी अक्षयचा हा सीक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

गायिका नीती मोहनने दिला गोंडस मुलाला जन्म, केले शेअर

अभिनेत्री अश्विनी भावे यांचे व्हिडिओ चाहत्यांना सुखावणारे

वीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार गोविंदा आणि नीलमची जोडी

Read More From मनोरंजन