आरोग्य

पांढरं की पिवळं कोणते तूप आरोग्यासाठी असते लाभदायक

Trupti Paradkar  |  Dec 22, 2021
yellow or white which ghee is healthy in marathi

तूप खाणं आरोग्यासाठी हितकारक आहे हे आता जवळजवळ सर्वांना माहीत झालंच आहे. कारण हेल्द कॉन्शिअस लोकांनी आधी लठ्ठपणा वाढेल म्हणून तूप खाणं बंद केलं होतं. मात्र आता तूप खाण्याचे महत्त्व पटल्यामुळे पुन्हा आहारात तुपाचा समावेश होऊ लागला आहे. तूप खाण्यामुळे तुमचे खाद्यपदार्थ स्वादिष्ट तर होतातच शिवाय अन्न शुद्ध देखील होते. मात्र यासाठी शुद्ध म्हणजेच साजूक तूप खाणे गरजेचं आहे. तूप नेहमी एकतंर पिवळं अथवा पांढऱ्या रंगाचे असते. तुपाला हा रंग कसा मिळतो आणि पिवळं की पांढरं तूप आरोग्यासाठी हितकारक हे तुम्हाला माहीत आहे का ?

पांढरं तूप कशापासून बनते

पांढऱ्या रंगाचे तूप म्हणजे म्हशीच्या दूधापासून काढलेले तूप. या तुपात फॅट इतर तुपाच्या तुलनेत कमी असतात. त्यामुळे म्हशीच्या गाईचे तूप जास्त काळ टिकते आणि आरोग्यासाठी हितकारक असते. म्हशीच्या दुधातील तूपात तुमची हाडे मजबूत करणारी, वजन वाढवण्यास मदत करणारी, ह्रदयाचे कार्य सुरळीत करणारी गुणधर्म असतात. मांसपेशी आणि शरीराच्या वाढीसाठी म्हशीच्या दुधाचे तूप आहारात असणं गरजेचं आहे. शिवाय यात म्हशीच्या दुधात असलेले मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरसदेखील असतात. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो.

पिवळे तूप कशापासून बनते

yellow or white which ghee is healthy in marathi

पिवळं तूप गाईच्या दुधापासून निघते. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला देशी गाईचं तूप खाण्याची गरज आहे. लहान मुलं,आजारी माणसं, वृद्ध, गरोदर महिला यांना गाईचे तूप द्यावे कारण ते पचण्यास हलके असते. गाईच्या दुधातील प्रोटीन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स या तुपातून तुमच्या शरीराला मिळतात. ह्रदयाच्या कार्यासाठी गाईच्या दुधाचे तूप अतिशय फायदेशीर ठरतं. 

गरोदरपणात तूप खाण्याचे काय होतात फायदे

पिवळं की पांढरं कोणतं तूप जास्त लाभदायक असतं

शरीराच्या स्वास्थासाठी आणि मानसिक शांततेसाठी आहारात तूप असणं गरजेचं आहे. वास्तविक गाईचं असो वा म्हशीच्या दुधापासून बनवलेलं तूप कोणत्याही प्रकारच्या तूपामध्ये चांगलेच गुणधर्म असतात. फक्त गाईचं अथवा म्हशीचं दूध हे देसी असेल त्यापासून बनवलेल्या तूपाने शरीरावर चांगला फायदा होतो. असं असलं तरी अनेक वर्षांपासून गाईच्या दुधापासून काढलेल्या तुपाला जास्त मान्यता आणि लोकप्रियता देण्यात येते. असं म्हणतात की गाईच्या दुधातील तूपात जास्त व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे ते लहान मुलांसाठी, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी पोषक असते. यात जास्त प्रमाणात अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि फंगल आणि अॅंटि ऑक्सिडंट असतात. शिवाय म्हशीच्या दुधातील तुपात जास्त फॅटदेखील असतात. ज्यामुळे ते पचायला गाईच्या दुधातील तुपाच्या तुलनेत जड असते. शरीरयष्टी सुधारण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी म्हशीच्या दुधाचे तूप फायद्याचे असते. त्यामुळे तुमच्या शरीर आणि आरोग्यानुसार कोणते तूप खायचे हा निर्णय तुम्हीच करू शकता. 

सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्याला तूप लावण्याचे फायदे (Benefits Of Ghee For Skin In Marathi)

Read More From आरोग्य