Fitness

युवा डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाडचा फिटनेस फंडा

Aaditi Datar  |  Feb 23, 2020
युवा डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाडचा फिटनेस फंडा

बॉलीवूड सेलेब्स असो मराठी सेलेब्स असो. फिटनेसबाबत आजकाल सगळेच जागरूक झाले आहेत आणि आपापल्या बॉडी टाईपप्रमाणे प्रत्येक जण फिटनेस राखत आहे. या फिट राहणाऱ्या सेलेब्सपैकीच एक म्हणजे युवा डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाड. जी आहे योगाची फॅन. चला जाणून घेऊया कृतिकाचा फिटनेस फंडा.

योगाने करा दिवसाची सुरूवात

वजन घटवणं, लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यापैकी जी गोष्ट तुम्हाला हवी असेल ती देण्यासाठी योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे, असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो. कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोश्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो आणि म्हणूनच युवा डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाड तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून दररोज योगा करते.

नियमित योगा करण्याबद्दल कृतिका सांगते की, “युवा डान्सिंग क्वीनमुळे मी सध्या खूप बिझी असते आणि सतत मनावर स्पर्धेत टिकण्याचा ताण ही असतो. त्यामुळे दररोज योगा हाच माझा फिटनेस फंडा आहे. नुसतं शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताणतणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विषारी घटक आणि ताणतणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो.”

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं (Yoga For Weight Loss In Marathi)

मेहनती युवा डान्सिंग क्वीन कृतिका

युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम झी युवावर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता पहायला मिळतो. या कार्यक्रमाचे जज लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य हे आहेत. यात सुरूवातीला 14 सेलिब्रिटी डान्सर स्पर्धक होत्या. मात्र स्पर्धेच्या स्वरूपातील या कार्यक्रमात आता त्यातील केवळ ९ डान्सर स्पर्धक राहिल्या आहेत. कृतिका गायकवाड सुद्धा या 14 सेलेब्रिटींपैकी एक पण त्यातही तिने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. अतिशय सौंदर्यवान अभिनेत्री सध्या तिच्या नृत्यकौशल्यावर प्रेक्षकांना स्वतःच्या प्रेमात पाडत आहे. सौंदर्यवान आणि फीट दिसणं यासाठी कृतिका खूप मेहनत घेते. ती दिवसाची सुरुवात योगाने करते. ही प्रसिद्ध युवा डान्सिंग क्वीन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते. ती नियमितपणे अष्ठांग योगही करते. तिचे योगाचे काही फोटोज इंटरनेटवर भरपूर व्हायरल झाले होते. अतिशय टॅलेंटेड अभिनेत्री आणि उत्तम नर्तिका म्हणून कृतिका गायकवाडने युवा डान्सिंग क्वीनच्या व्यासपीठामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे.

पावर योगा आणि त्याचे फायदे

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

हेही वाचा –

काय आहे स्पृहा जोशीचा डाएट फंडा

‘तान्हाजी’मध्ये सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या इलाक्षी गुप्ताच्या सौंदर्याचं गुपित

Read More From Fitness