व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) हा महिलांसाठी नक्कीच अनुभवाचा विषय आहे. अनेक महिलांना याचा अनुभव एका विशिष्ट वयानंतर येतोच. व्हजायनामधून किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे हे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत कॉमन विषय आहे. पण बरेचदा हे नेहमीचे आहे असं समजून अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात अथवा काही महिलांना याविषयी नक्की माहितीही नसते. पण व्हाईट डिस्चार्जविषयी काही गोष्टी या माहीत असायलाच हव्यात. नियमित अशी समस्येला तुम्ही जर सामोरे जात असाल तर तुम्हाला यासाठी काही घरगुती उपायदेखील माहीत असायला हवेत. व्हाईट डिस्चार्जपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. याविषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या.
व्हाईट डिस्चार्च ही समस्या मानसिकही असू शकते
तुम्हाला माहीत आहे का? महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्ज ही समस्या पती-पत्नीच्या मतभेदामुळे निर्माण झालेल्या तणावामुळेही होऊ शकते. हो खरं आहे. तुमचा तुमच्या जोडीदारासह जर योग्य संबंध नसेल आणि तणावमुक्त आयुष्य असेल तर महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात मानसिक असण्याची शक्यता जास्त असते. पण या समस्येतून कशी सुटका मिळवावी यासाठी काही घरगुती उपचारही आहेत, कारण अनेक महिला या समस्येबाबत कोणाशीही बोलायला लाजतात आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत. त्यामुळे अशा महिलांसाठी ही समस्या त्रासदायक ठरू शकते. असे पटकन करता येण्याजोगे घरगुती उपाय जाणून घ्या. यासाठी तुम्ही इंटिमेट वॉशचाही उपयोग करून घेऊ शकता.
व्हाईट डिस्चार्जसाठी घरगुती उपाय
- रोज दिवसाला तुम्ही दोन ते तीन केळी खाल्लीत तर व्हाईट डिस्चार्जची समस्या दूर होऊ शकते
- 3 ग्रॅम आवळ्याच्या पावडरमध्ये तुम्ही मध मिक्स करा आणि हे चाटण तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही खा. यामुळे तुमची ही समस्या दूर होण्यास मदत मिळते
- बेरीचे फूल घेऊन ते वाटा आणि त्यात तुम्ही खडीसाखर आणि मध मिक्स करून चाटण तयार करा. याचे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. यामुळे तुम्हाला व्हाईट डिस्चार्जपासून मुक्ती मिळण्याचा फायदा होतो
- पांढरी मुसली पावडर अथवा ईसबगोल तुम्ही सकाळ – संध्याकाळ सरबतमधून मिक्स करून प्यायल्यास, तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होत नाही
- आवळा वाटून घ्या आणि याची पावडर गव्हाच्या पिठात अथवा तुम्ही जी पोळी करणार असाल त्यामध्ये मिक्स करून साधारण एक महिना खा. यामुळे तुम्हाला व्हाईट डिस्चार्जपासून सुटका मिळेल
- टॉमेटोचे रोज सेवन केल्यासही तुम्हाला फायदा मिळू शकतो. मात्र टॉमेटोचे सेवन प्रमाणापेक्षा अधिक करू नये
- करवंदाचे सरबत तुम्ही नियमित प्यायल्यास, तुम्हाला याचा फायदा व्हाईट डिस्चार्जसाठी होतो
- 10 ग्रॅम मुलहठी, 20 ग्रॅम खडीसाखर, 5 ग्रॅम जिरे, अशोक झाडाचे साल साधारण 10 ग्रॅम एकत्र करून त्याचे चूर्ण करावे. दिवसातून 3-4 ग्रॅम चूर्ण हे तीन वेळा खावे. याचा योग्य परिणाम होतो
- कच्चे केळे पूर्णपणे सुकवा आणि मग त्याचे चूर्ण करून घ्या. यामध्ये समान प्रमाणात गूळ मिक्स करा आणि हे चाटण व्हाईट डिस्चार्जपासून सुटका मिळेपर्यंत खावे
- शिंगाडा, गोखरू, मोठी वेलची, बबूलचा गम, साखर, सेमलचा गम हे सर्व एक समान प्रमाणात घ्या आणि एकत्र करून सकाळी आणि संध्याकाळी हे चाटण खा. यामुळे व्हाईट डिस्चार्ज होत नाही आणि तुम्हाला त्रासही होत नाही
विशेष सूचना – आम्ही तुम्हाला वर दिलेले घरगुती उपाय अगदी योग्य आहेत असा आमचा दावा नाही. मात्र तुम्ही याचा वापर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच करू शकता. व्हाईट डिस्चार्जची समस्या ही दुर्लक्ष करण्यासाठी समस्या नाही. त्यामुळे यावर वेळीच इलाज करावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक