Advertisement

आरोग्य

रोज केवळ 10 मिनिट्स करा सूर्यनमस्कार आणि मिळवा अद्भुत फायदे

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 17, 2021
10-minutes-surya-namaskar-benefits

Advertisement

बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की, सूर्यनमस्कार हा केवळ योग व्यायामाचा एक प्रकार आहे ज्याने तुमची पाठ आणि सांधे मजबूत होतात. पण खरं तर सूर्यनमस्कार तुमच्या संपूर्ण शारीरिक फिटनेससाठी एक चांगला व्यायाम आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणाचीही आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन जीवनात अधिक थकवा येत असतो आणि आपल्या निरस रूटिनमधून मुक्त होण्यासाठीही याचा फायदा मिळतो. सूर्यनमस्कार रोज योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात केल्यास, आपले आयुष्य सकारात्मक होण्यास मदत मिळते. परिणाम दिसण्यास थोडा वेळ लागतो, पण तुम्हाला याचे नक्कीच अद्भुत फायदे मिळतात. नियमित स्वरूपात सूर्यनमस्कार करण्याने तुमच्या मानसिक आरोग्यालाही बळ मिळते. तसंच तुमच्यातील सहज क्षमता, निर्णय घेण्याचे बळ, नेतृत्व कौशल्य आणि आत्मविश्वास वाढण्यासही यामुळे मदत मिळते. त्यामुळेच रोज केवळ 10 मिनिट्स तुम्ही सूर्यनमस्कार करून त्याचे अद्भुत फायदे मिळवा. आपल्या आयुष्यातील रोज सकाळची 10 मिनिट्स तुम्ही नक्कीच तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणे फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया याचे फायदे – 

चमकदार त्वचा (Glowing Skin)

glowing-face

सूर्यनमस्कार आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढवते, ज्यामुळे आपली त्वचा आणि चेहरा अधिक उजळतो आणि त्यावर चमक कायम राहते. तसंच दिवसभर चेहरा प्रसन्न दिसतो. रोज तुम्ही सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येत नाहीत आणि त्याशिवाय तुम्ही अधिक काळ तरूण दिसता. याचा अधिक चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही रोज किमान 12 सूर्यनमस्कार तरी घालायला हवेत. तसंच हे सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने शिकून घ्या आणि मगच रोज त्याचा नियमित व्यायाम करा. 

मासिक पाळीच्या दिवसातही होते मदत (For Menstrual Cycle)

menstrual_periods

बऱ्याच महिलांना मासिक पाळीचा त्रास असतो. मासिक पाळीच्या वेगवेगळ्या समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. त्यापैकी पोटदुखी हा सर्वात मोठा त्रास आहे. पण रोज सूर्यनमस्कार घातल्याने तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळते. तसंच ज्यांना मासिक पाळी नियमित होत नसेल त्यांच्यासाठीही हे फायदेशीर ठरते. पोटांचे मसल्स मजबूत बनविण्यासाठी आणि मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही रोज सूर्यनमस्कार घालायला हवा. 

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त (Blood Level Control)

नियमित सूर्यनमस्कार घातल्यामुळे तुमच्या शरीराच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसंच यामुळे कोणताही हृदय रोग तुमच्यापर्यंत पोहचत नाही. हृदय रोग होऊ नये म्हणूनही तुम्ही याचा नियमित अभ्यास करायला हवा. मधुमेही व्यक्तींना सूर्यनमस्कार घातल्याचा फायदा मिळतो. त्यामुळे रोज सकाळी किमान 10 मिनिट्स स्वतःसाठी वेळ काढावा. 

मासिक आरोग्यासाठी उत्तम (Good for Mental Health)

तुम्ही नियमित स्वरूपात सूर्यनमस्कार करत असाल तर तुमच्या केवळ शरीरातच फरक पडतो असं नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यामध्येही यामुळे फरक पडतो. स्मरणशक्ती आणि नर्व्हस सिस्टिम सुधारण्यासाठी याची मदत मिळते. तसंच तुम्हाला मनःशांती मिळवून देण्यासाठी आणि चिंतापासून दूर राहण्यासाठी याचा उपयोग होतो. एंडोक्राईन ग्लॅंड्सच्या गतिविधींना शांत करण्याचे काम सूर्यनमस्कारामुळे होते. ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे अशा व्यक्तींनी तर रोज सूर्यनमस्कार घालायचा हवा. तसंच ज्या व्यक्तींचे मन थाऱ्यावर नाही त्यांनीही याचा आधार घ्यायला हवा. 

योग्य पचनक्रियेसाठी (For good digestive system)

सूर्यनमस्कार आपल्या पचनक्रियेसाठी उत्तम ठरतात. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टिममधील रक्ताचा प्रवाह वाढविण्यासाठी सूर्यनमस्काराची मदत मिळते. ज्यामुळे आतड्यांचे कार्य अधिक चांगले होते. सूर्यनमस्कार करताना पोट आत खेचले जाते आणि त्यामुळे पचनशक्तीक्रिया अधिक चांगली होण्यास मदत मिळते. तसंच पोटात असलेला गॅस निघून जाऊन चरबीदेखील साठत नाही आणि वजनावर नियंत्रण राहण्यासही मदत मिळते. 

शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत 

सूर्यनमस्कारामुळे तुमच्या श्वसनक्रियेलाही मदत मिळते. श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच यामुळे शरीरातील फुफ्फुसे चांगली होण्यासाठीही मदत मिळते. कार्बनडायऑक्साईड आणि अन्य विषारी गॅसपासून सुटका मिळवून शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी याची मदत मिळते आणि शरीर निरोगी राहाते. 

अनिद्रेपासून मिळते सुटका 

सूर्यनमस्कार तुमच्या अनिद्राची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तसंच तुमचे डोकं शांत राहण्यासाठीही याची मदत मिळते. तुम्हाला झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या खाण्यापर्यंत वेळ गेली असेल तर वेळीच सूर्यनमस्कार घालायला तुम्ही सुरूवात करा. 

सूर्यनमस्कार सकाळी उठल्यावर करणे जास्त चांगले. पण तुम्हाला सकाळीच जमत नसेल तर तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी करू शकता. सर्वात उपयुक्त वेळ ही सूर्योदयाच्या वेळी असते. यामुळे तुमचे डोकेही शांत राहते आणि मनही शांत राहाते. तुम्हीदेखील हे सर्व फायदे रोज 10 मिनिट्स सूर्यनमस्कार करून मिळवू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक