हल्ली बऱ्याचदा लग्न तुटण्याचं महत्त्वाचं कारण जे समोर येतं ते म्हणजे असंतुष्ट वैवाहिक जीवन अर्थात खराब सेक्स लाईफ. ही समस्या न सोडवल्यास, तुमचं नातं टिकणं कठीण होऊ जातं. पण अजूनही आपल्याकडे या गोष्टी सर्रासपणे बोलल्या जात नाहीत. जे चुकीचं आहे. यासंदर्भात आम्ही सेक्सोलॉजिस्ट डॉ. कमल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या समस्येवरील नक्की समाधान काय आहे याची माहिती सांगितली आहे. ही समस्या अतिशय कॉमन असल्याचं त्यांनी सांगितलं. सेक्स करताना समाधान न मिळणं हे लग्नानंतर बऱ्याच महिला आणि पुरुषांच्या बाबतीत घडत असतं. पुरुषांमध्ये पेनिसमध्ये तणाव असणं, महिलांमध्ये योनिमध्ये कोरडेपणा येणं अशा अनेक समस्या असतात. पण या समस्यांबद्दल पुरुष आणि महिला या दोघांनाही बोलायचं नसतं. अशा समस्यांमध्ये योग्य सल्ला अथवा उपचार न घेणं तुमच्यासाठी वाईट ठरू शकतं. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही डिप्रेशन अर्थात नैराश्यात जाण्याची शक्यता असते. अशी सेक्सची समस्या असल्यास, याचे परिणाम लग्न तुटण्यापासून ते नैराश्याने ग्रासून आत्महत्या करण्यापर्यंत होतात. आम्ही तुम्हाला इथे 10 सेक्स समस्यांबद्दल आणि त्यांच्या समाधानाबद्दल सांगणार आहोत.
1. पुरुषांमध्ये लवकर होणारं इजेक्युलेशन
सेक्स करताना, वेळेआधी जर पुरूषांचं सिमेन बाहेर आलं तर याला इजेक्युशन असं म्हटलं जातं. पण यामुळे तुमची सेक्स लाईफ खराब होतं. पण हा कोणत्याही प्रकारचा आजार नाही तर ही मनाची अवस्था आहे ज्याचं समाधान करणं अतिशय सोपं आहे.
समाधान
जेव्हा एखादी व्यक्ती सेक्स करायला लाकते तेव्हा अति उत्साहाने प्री मॅच्युअर इजेक्युलेशन होणं ही कॉमन बाब आहे. हा आजार नसून ही मानसिक अवस्था आहे. याचं नक्की कारण काय आहे हे सर्वात पहिले शोधून काढायला हवं. यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही सायकॉलॉजिस्टची मदत घ्या. कोणत्याही अन्य डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा सेक्स स्पेशालिस्ट डॉक्टरांकडूनच याचा उपचार करून घ्या.
2. इरेक्टाईल डिस्फंक्शन
सेक्स करत असताना पेनीसवर तणाव न येणं अथवा तणाव आल्यास, पेनिस सैलसर पडल्यास, इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. याचंदेखील प्रमुख कारण शारीरिक नसून मानसिक आहे. कोणत्याही गोष्टीचा ताण मनावर घेणं अथवा योग्यरित्या आहार न घेणं हे याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे सेक्स करताना तुम्ही तुमच्या मनावर ताण येऊ देऊ नका.
समाधान
ही समस्याच मुळात मानसिक असल्याने याचा उपचारदेखील आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्स करण्याआधी तुम्ही आनंदी असायला हवं. तुमच्या मनावर कोणताही ताण अथवा तणाव असल्यास, तो बाजूला करा. त्यासाठी तुम्ही आधी मानसिक तयारी करा. जर तसं होत नसेल तर तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊन त्यांच्याशी बोलून आपलं मन मोकळं करा आणि जर त्यानेही फरक पडत नसेल तर तुम्ही सेक्सॉलिजिस्टकडे जायला हवं.
3. सेक्सुअल इंटरकोर्समध्ये होणारी दुखापत
महिलांमध्ये ही समस्या अतिशय कॉमन आहे. इंटरकोर्सदरम्यान होणारा त्रास हा बऱ्याच महिलांना सेक्स करण्यापासून दूर करतो. तसंच काही महिलांमध्ये व्हजायनामध्ये असणारा कोरडेपणा, सूज अथवा इन्फेक्शन या कारणांमुळे त्यांना त्रास होत असतो.
समाधान
जोडीदाराला कधी त्रास होत आणि आपली जोडीदार आपल्याला कधी सहयोग देत आहे हे समोरच्याला व्यवस्थित माहीत करून घ्यायला हवं. त्यामुळे त्याला आणि त्या महिलेलादेखील सेक्सचा व्यवस्थित आनंद घेता येतो. ही समस्या उद्भवणार नाही अशा पोझिशनमध्ये सेक्स करा. तसंच सेक्ससाठी एक चांगलं ल्युब्रिकंटदेखील तुम्ही वापरू शकता. यानेदेखीर जर तुम्हाला सेक्स करताना त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4. गुप्तांगातील इन्फेक्शन
गुप्तांगातील खाज हीदेखील एक समस्या असते. इन्फेक्शन व्हजायनाची नीट काळजी न घेतल्यास होतं. त्यामुळे सतत व्हजायनामध्ये खाज येत राहाते.
समाधान
ही समस्या व्यवस्थित साफसफाई ठेवल्याने आणि सेक्सदरम्यान कंडोम वापरल्याने ही समस्या उद्भवत नाही. पण त्यानंतरही ही समस्या तशीच राहिली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5. सेक्सची इच्छा नसणं
ही समस्या साधारण महिलांमध्ये जास्त दिसून येते. महिलांमध्ये डिप्रेशन, थकवा यामुळे सेक्सची इच्छा कमी होते. काही महिलांना शरीराच्या काही भागात हातात लावला तर त्यांना त्रास होतो. तसंच असं केल्यास, त्यांना आवडतही नसतं. त्यामुळे त्यांना सेक्स करायला आवडत नसतं.
समाधान
याचा इलाज कोणत्याही डॉक्टराकडे नसून त्याचं समाधान हे तुमच्या जोडीदाराकडेच आहे. कौटुंबिक भांडणं आणि नात्यामध्ये कोणतंही भांडण होऊ देऊ नका. लहानसहान गोष्टीची नकारात्मकता काढून टाका. जोडीदाराला नक्की काय हवंय याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. तुमचा जोडीदार जर तुमच्याबरोबर कम्फर्टेबल असेल तर तुमचं सेक्स लाईफ चांगलं होतं.
6. ल्युब्रिकेशनची कमतरता
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये ल्युब्रिकेशनची समस्या ही सामान्य आहे. पण त्यावर इलाजही व्हायला हवा. ल्युब्रिकेशन कमी असल्यास, सेक्स करण्यास त्रास होतो.
समाधान
याचा इलाज सायकॉलिजिकल आहे. तसंच तर जोडीदाराचा स्पर्शही ल्युब्रिकेशनसाठी फायदेशीर ठरतो. बऱ्याचदा महिलांना आपल्या जोडीदाराच्या स्पर्शाने कधीतरी ल्युब्रिकेशन होत नाही. जर तुमच्या जोडीदाराच्या स्पर्शाने हे होत नसेल तर बाजारामध्ये अनेक ल्युब्रिकंट्सदेखील उपलब्ध आहेत. त्याचा वापर तुम्ही करू शकता.
7. Orgsm न होणं अथवा उशीरा होणं
GIPHY
इंटरकोर्सदरम्यान बऱ्याच महिलांना ही समस्या उद्भवते. Orgsm न होणं अथवा उशीरा होणं हीदेखील एक समस्या आहे. ही समस्या मानसिक तणावामुळे निर्माण रहोते. तसंच सेक्स करताना त्रास होतो त्यामुळेही हे होऊ शकतं. महिलांना व्यवस्थित Orgsm मिळण्यासाठी मानसिक ताणापासून दूर राहणं आवश्यक आहे.
समाधान
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सेक्स करताना महिलांनी एक्सायटेड न होणं. यापासून वाचण्यासाठी तुम्ही सेक्स करताना सर्वात आधी फोरप्लेवर जास्त लक्ष द्यायला हवं आणि सेक्स दरम्यान आपल्या मनात अन्य कोणतेही विचार आणू नका.
8. व्हयाजनल त्रास
कधी कधी महिलांच्या बेंबीच्या खाली आणि प्युबिक एरियाच्या आजूबाजूला त्रास होत असतो. अशा स्थितीत ल्युब्रिकेशन झाल्यास, Orgsm होत नाही. त्यामुळे या एरियामध्ये रक्त कमी होतं आणि जास्त दुखायला लागतं.
समाधान
यासाठी सेक्सच्या वेळी पोझिशन आणि आपल्या जोडीदाराच्या मनस्थितीची काळजी घेणं गरजेचं आहे. इतकं करूनही असं झालं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
9. नपुंसकता
नपुंसकता अर्थात इंपोटन्सीसाठी मधुमेह, उच्च रक्तदाब, चरबी हे महत्त्वाची कारणं आहेत. सिगरेट, तंबाखू आणि दारूच्या सेवनाने इरेक्शनचीदेखील समस्या उद्भवू शकते.
समाधान
या समस्येचं समाधान करण्यासाठी साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंणात ठेवा. तसंच नियमित स्वरूपात व्यायाम करा. यानंतरही ही समस्या सुटत नसेल तर तुम्ही एखाद्या सायकॉलॉजिस्टशी संपर्क साधा.
10. पसंत आणि नापसंत
दोन्ही जोडीदारांची सेक्सच्या बाबतीत पसंत आणि नापसंती वेगवेगळी असते. त्यामुळे सेक्स करताना समस्या उद्भवू शकतात.
समाधान
यासाठी तुमच्या जोडीदाराशी तुम्ही भावनिकरित्या जोडले जाणं गरेजचं आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की काय आवडतं आणि काय नाही हे आपल्या जोडीदाराशी व्यवस्थित बोलू शकता. सेक्सच्या बाबतीत तुम्ही एकमेकांशी बोललात तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.
हेदेखील वाचा
तुमचा ‘सेक्स मूड’ तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!
पहिल्या सेक्सचा अनुभव होता खास …वाचा महिलांना नेमकं काय वाटलं
एकदा तरी करून पाहायलाच हवेत हे 10 *फोरप्ले मूव्हस*