ADVERTISEMENT
home / Care
फक्त 15 दिवस लावा कांद्याचा रस आणि मिळवा दाट केस

फक्त 15 दिवस लावा कांद्याचा रस आणि मिळवा दाट केस

लांबसडक आणि घनदाट केस सगळ्यांनाच आवडतात. दाट केस हवे असतील तर आपण कितीतरी उपाय करतो. सध्या कांद्याचा रस हा चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्ही कांद्याचा रस कधीही लावला नसेल तर आताच कांद्याचा रस केसांना लावा. कांद्याच्या वापरामुळे केस घनदाट वाढतात हे तुम्ही आतापर्यंत नक्कीच ऐकले, वाचले असेल. पण कांद्याच्या रसाचा नेमका कसा वापर करायचा आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

असेल टिकलीची अलर्जी तर करा सोपे उपाय

कांद्यामध्ये काय असते आणि त्याचे फायदे

कांद्यामध्ये नेमकं असं काय असतं  असा प्रश्न पडला असेल तर कांद्यामध्ये सल्फर, व्हिटॅमिन C,व्हिटॅमिन B6 आणि पोटॅशिअम असते ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.  

  • केसांना येणारी खाज कमी करण्यासाठी कांद्याचा रस हा फारच फायदेशीर ठरतो. 
  • केसांच्या पोअर्समध्ये जाऊन केसांची वाढ होण्यास कांद्याचा रस मदत करते. 
  • कोंड्यामुळे केस पातळ होत असेल तर कोंडा कमी करुन केस जाड होण्यास मदत मिळते. 
  • केसांना आलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी कांद्याचा रसा हा फार फायदेशीर ठरतो.
  • केसांची वाढ जर थांबली असेल तर केसांची वाढ होण्यास मदत करते. 

घरीच करा लिप स्पा, फॉलो करा या सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

c

https://www.instagram.com/p/CPQrTQVL-FK/

Instagram

  • कांद्याचा रस तयार करण्यासाठी तुम्हाला लाल कांदे लागतील. कांद्याच्या साली काढून त्याच्या फोडी करुन घ्या. मिक्सरमध्ये थोडे पाणी आणि कांदा घालून कांद्याची पेस्ट करुन घ्या.
  • कांद्याचा रस गाळून घ्या. कांद्याचा रस काढून तो एका स्प्रे बॉटलमध्ये काढा. तुमचा कांदा रस तयार तुम्हाला ज्या ठिकाणी टक्कल पडले आहे असे दिसेल तिथे तुम्ही हा रस लावा.तुम्हाला नक्कीच तुमच्यात फरक जाणवेल.
  • कांद्याचा रस करण्यासाठी तुम्ही कांदा घेऊन तो किसून घ्या. किसून घेतलेल्या कांद्याच्या रसातून अर्क काढा. तुमचा कांदा रस तयार 

असा करा कांद्याच्या रसाचा वापर

कांद्याचा रस परिणामकारक आहे म्हणून त्याचा जास्त वापर करणे हे देखील चांगले नाही. कारण त्याच्या अतिवापराचा परिणामही तुमच्या केसांवर होऊ शकतो. शिवाय कांद्याच्या वासामुळे केसांना सतत दर्प येत राहतो. 

कांद्याच्या रसाचा वापर करताना केसांचे सेक्शन करा. त्यामध्ये कांद्याचा रस लावा. कांद्याचा रस नुसता पाण्याने धुता येणार नाही. त्यामुळे चांगला फ्रॅग्नसवाला शॅम्पू लावून तुम्ही केस स्वच्छ करुन घ्या. त्यामुळे तुमचे केस छान दिसतील. 

ADVERTISEMENT

लोणच्याला बुरशी येते, जाणून घ्या लोणचं टिकवण्याच्या टिप्स

हे ही असू द्या लक्षात

कांद्याचा अति वापर हा केसांसाठी हानिकारक ठरु शकतो. त्यामुळे केसांसाठी त्याचा खूप वापर टाळा. आठवड्यातून केवळ दोनदाच याचा प्रयोग करणे हे चांगले आहे त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 

01 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT