ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
#AssamFlood : आसामला आहे तुमच्या मदतीची गरज

#AssamFlood : आसामला आहे तुमच्या मदतीची गरज

भारतातील काही राज्य पाण्यासाठी तहानली असताना आसाम मात्र पूरग्रस्त झालंय. खरंतर जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा आपण त्याचा सोहळा साजरा करतो. मात्र याच पावसाने आसाममध्ये हाहाकार उडाला आहे. आत्तापर्यंत आसाममध्ये आलेल्या पुराने 46 लाख लोकांना फटका बसला आहे. मागच्या वर्षी पुरामुळे केरळवर संकट आलं होतं आणि संपूर्ण देशाने मदतीचा हात दिला होता. आता आपल्या मदतीची गरज आहे आसामला. 

आसाममधील जलसंकट

सतत कोसळणाऱ्या पावसाने आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ही पूरस्थिती ओढवली आहे. ब्रम्हपुत्रा नदीतील पाण्याची पातळी दर तासाला वाढत आहे. अनेक जणांनी या पूरात जीव गमावला असून युद्धपातळीवर बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत 30 जिल्हे 4,175 गावं आणि जवळजवळ 46.28 लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. आसाममधील पुरासोबतच बिहारमध्ये पूरस्थिती ओढवली आहे.

आसामसाठी मदतीचा ओघ

सरकारकडून युद्धपातळीवर बचावकार्य तर सुरू आहेच. पण आसाममधील पूरस्थिती पाहून अनेक जणांनी मदतीचा दिला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण यश मिळवलेली धावपटू हिमा दासने आपल्या पगारातील अर्धी रक्कम आसाम पूरग्रस्तांना देऊ केली आहे. तसंच इतरांनीही आसामला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. 

ADVERTISEMENT

तर बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमारने आसामला 2 कोटींची मदत देऊ केली आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीजनी याबाबत ट्विट करून याबाबत काळजी व्यक्त केली आहे. 

अनेक क्रिकेटपटूंनीही या पूरपरिस्थितीबाबत दुःख व्यक्त करत तेथील लोकांसाठी आणि कांझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यातील प्राण्यांबद्दल काळजी व्यक्त करत ट्विट केलं आहे. 

तुम्हीही करू शकता मदत

तुमच्यापैकीही कोणाला आसाममधील पूरग्रस्तांना मदत करायची असल्यास तुम्ही CM’s Relief Fund त रक्कम देऊ शकता. यासाठी PayTM नेही खास पेज तयार केलं आहे. त्यावरून तुम्ही आसाममधील पूरग्रस्तांना मदतीची रक्कम देऊ शकता. Milaap नावाच्या वेबसाईटनेही पूरग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी देऊ केला आहे.

तुम्हीही आजच करा आसामला मदत. 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

अडखळणाऱ्या इंग्रजीमध्ये मागितली मदत, सुषमा स्वराजच्या उत्तरांने जिकलं मन

काम मिळवण्यासाठी त्यांना करावा लागतोय गर्भाशयाचा त्याग

#sareetwitter हॅशटॅगला मागे टाकून मुंबई पोलिसांचा ‘हा’ हॅशटॅग होतोय ट्रेंड

ADVERTISEMENT
18 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT