home / फॅशन
हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील (Latest Punjabi Suit Design In Marathi )

हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील (Latest Punjabi Suit Design In Marathi )

‘सलवार कमीज’ हा शब्द ऐकला की सर्वात आधी आपल्या नजरेसमोर येतो तो म्हणजे पंजाबी सूट. खरंतर पंजाबी सूट हा पंजाबी महिलांचा एक पारंपरिक पेहराव आहे. पण आजकाल सर्वच महिला पंजाबी सूट घालणं पसंत करतात. कारण एकतर पंजाबी सूट परिधान करणं हे खूप सोपं असतं. शिवाय पंजाबी ड्रेसमध्ये प्रवासदेखील आरामात करता येतो.

0

पंजाबी सूटमध्ये पटियाला, धोती, लाचा, पॅन्ट ,प्लाझो असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. शिवाय हे सर्व प्रकार आपण कोणत्याही सिझनमध्ये परिधान करु शकतो. आजकाल निरनिराळ्या समारंभासाठी निरनिराळे पंजाबी ड्रेस घालण्याचा ट्रेन्ड आहे. जर तुम्हाला ट्रेन्डींग आणि फैशनेबल राहायला आवडत असेल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये या 30 लेटेस्ट पंजाबी सूटचं हे कलेक्शन नक्कीच असायला हवं.

पिंक मिरर वर्क केलेला सिल्क पंजाबी सूट

पॅन्ट-कुर्ता वेलवेट दुपट्टा स्टाईल पंजाबी सूट

धोती-कुर्ता स्टाइल पंजाबी सूट

मल्टीकलर दुपट्टा आणि लेसवाला पंजाबी सूट

30 नवीनतम पंजाबी सूट डिझाइन (Latest Punjabi Suit Designs)

1. फुलकारी पंजाबी सूट (Phulkari Punjabi Suit)

fullkari-Punjabi-Suit marathi

फुलकारी एम्ब्रॉयडरी शिवाय इंडीयन फॅशन पूर्णच होऊ शकत नाही. फुलकारी चा अर्थ फुलांची डिझाईन. या डिझाईनमुळे एखाद्या साध्या पंजाबी सूटला देखील हटके लुक देता येऊ शकतो.आता हेच पहा ना…या रॅवेशिंग यलो फुलकारी पंजाबी सूटचा लुक तुम्हाला नक्कीच आवडेल. या  सूटवर सुंदर लेसचं वर्क केलं आहे. मॅचिंग बॉटम आणि फुलकारी डिझाईन केलेला दुपट्टा यामुळे हा सूट खूपच आकर्षक दिसत आहे.

टीप- हा फुलकारी पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.नाहीतर एखाद्या प्लेन पंजाबी सूटवर तुमच्या आवडीचा फुलकारी केलेला दुपट्टा घ्या आणि अगदी अशीच स्टाईल कॅरी करा.

2. पिंक मिरर वर्क केलेला सिल्क पंजाबी सूट (Mirror Work Silk Punjabi Suit)

mirror-Pink-Silk-punjabi-suit marathi

जर तुम्ही नववधू असाल तर तुमच्याकडे हा पंजाबी सूट असायलाच हवा. सिल्क कुर्तीवर केलेलं हे मिरर वर्क आणि प्लेन पटियाला पायजमा कसला सुंदर दिसतोय ना. या सूटवर एखादा साधा,हलका  दुपट्टादेखील तुम्हाला ग्लॅमरस लुक देऊ शकतो. तुम्ही हा पंजाबी सूट एखाद्या सणाला अथवा फंक्शनला देखील नक्कीच परिधान करू शकता.

टीप- हा मिरर वर्क केलेला पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता.मात्र या सूट सोबत जुतिया अथवा नागरा कॅरी करा म्हणजे तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसेल.

Also Read About नागपूर मधील खरेदीची ठिकाणे

3. कलरफुल ट्रेन्डी पटियाला सूट (Patiala Suit)

patiala-for-college-punjabi-suit marathi

पंजाबी सूटची खासियत हीच आहे की तुम्ही तो कुठेही कॅरी करू शकता. त्यामुळे तुम्ही घरातल्या एखाद्या फंक्शनसाठी,ऑफिससाठी,शॉपिंगसाठी किंवा अगदी कॉलेजला जातानादेखील हा पटियाला सूट वापरू शकता.यासाठी हा यलो, पिंक,व्हाईट आणि ब्लू कॉम्बिनेशनचा पंजाबी सूट अगदी ट्रेन्डी दिसेल

टीप- तमन्ना भाटियाने परिधान केलेला हा कलरफुल पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.तुम्ही असा पंजाबी सूट तुमच्या टेलरकडून कस्टमाईज करुन देखील घेऊ शकता.

4. पॅन्ट-कुर्ता वेलवेट दुपट्टा स्टाईल पंजाबी सूट (Velvet Dupatta)

velvet-punjabi-suit marathi

फिक्या गोल्डन रंगाचा आणि पंजाबी पॅन्ट असलेला हा बॉलीवूड डिझाईनर सूट कोणत्याही सण-समारंभांसाठी अगदी बेस्ट आहे. या सूटवर घेतलेला हा वेलवेटचा मरुन रंगाचा दुपट्टा या सूटला आणखी सुंदर करतोय.

टीप- हा वेलवेट दुपट्टा सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. तुम्ही या सूटसोबत झुमकेदेखील कॅरी करू शकता. परफेक्ट दिसण्यासाठी या फोटोत दाखविल्याप्रमाणे तुम्ही हा दुपट्टा गळ्याभोवती घेण्याऐवजी एकाच खांद्यावर कॅरी करा.

5. धोती-कुर्ता स्टाइल पंजाबी सूट (Dhoti Style Punjabi Suit)

Cotton-Mustard-Plain-Stitched-Dhoti-Style-suit marathi

दर तुम्हाला असं वाटतंय की तुमचं वजन जरा जास्त आहे आणि त्यामुळे तुम्ही टाईट फिटींग पंजाबी सूट वापरू शकत नाही. असं  असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण हा पंजाबी स्टाईट धोती कुर्ता तुम्हाला नक्कीच सूट करेल. एकतर या सूटमुळे तुमचा लुक परफेक्ट दिसेल. शिवाय तो तुमच्या अंगाला घट्टदेखील बसणार नाही. तुम्ही हा सूट ऑफीससाठी आणि एखाद्या साध्या फंक्शनमध्ये देखील घालू शकता. आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो की या ड्रेस सेंससाठी तुमची नक्कीच प्रशंसा केली जाईल.

टीप-हा पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.तुम्ही तुमच्या आवडीचे मटेरिअल घेऊन त्यावर अशी बुटीक डिझाईनपण करू शकता.

Latest Suit Designs

6. क्रेप सिल्क पंजाबी सूट (Crepe Silk Punjabi Suit)

party-punjabi-suit marathi

आजकाल क्रेप सिल्क पंजाबी सूटची फॅशनच आहे. त्यात अशा कॉम्बिनेशनचा पंजाबी सूट असेल तर मग काय आणखीनच मजा. तुमचं नुकतच लग्न झालं असेल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये हा निळ्या रंगाचा क्रेपचा पंजाबी सूट असायलाच हवा. या सूटच्या कुर्ती आणि दुपट्टयावर सुंदर वर्क केलंय तर बॉटम मात्र प्रिन्टेड आहे.

टीप-या क्रेप सिल्क पंजाबीसूट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचे कापड खरेदी करुन एखाद्या बुटीकमध्ये हा सूट डिझाईन देखील करुन घेऊ शकता.

7. थ्रेड वर्क पंजाबी सूट (Thread Work Punjabi Suit)

peach-black-punjabi-suit marathi

फिक्या रंगावर केलेला हा थ्रेडवर्क सूट तर जामच भारी वाटतोय. या पीच रंगाच्या सूटवर गळ्याभोवती आणि सलवारवर काळ्या रंगाचं थ्रेडवर्क केलंय. त्यामुळे हा सूट पारंपरिक तर दिसतोच आहे शिवाय स्टायलिश पण वाटतोय.

टीप- हा थ्रेडवर्कचा पंजाबीसूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.तुम्ही एखाद्या प्लेन रंगाच्या कापडावर गळ्याभोवती,सलवारवर अशी डिझाईन करुन घेऊ शकता. मात्र त्यावर अशीच डिझाईन केलेला दुपट्टा घ्या.

8. ऑरेंज एसिमेट्रिक जॉर्जेट एम्ब्रॉयडरी पंजाबी सूट (Punjabi Embroidery Suits)

Embroidered-Asymmetric-Georgette-Punjabi Suit marathi

केशरी रंगाचा हा जॉर्जेटचा एसिमेट्रिक डिझाईनर सूट पारंपरिक आणि मॉर्डन दोन्ही लुक साठी फायद्याचा ठरेल. केशरी रंगाच्या सूटवर फिकट पिवळ्या रंगाची एम्ब्रॉयडरी या सूटला अधिक आकर्षित करत आहे. तसंच या सूटसोबत घेतलेला हा हलका सिफॉन दुपट्टा सूटची रंगत आणखीच वाढवतोय. जर तुम्हाला पंजाबी सूट वापरण्याची आवड असेल तर हा सूट तर तुमच्याकडे हवाच.

टीप- हा ऑरेंज एसिमेट्रिक जॉर्जेट डिझाईनर सूट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता.

9. शुभ्र पांढऱ्या रंगाची धोती आणि लॉन्ग कोटीचा पंजाबी सूट (White Satin Dhoti Salwar Suit With Jacket)

White-Kurtaand-Dhoti-Pajama-with-Long-Koti marathi

आजकाल अशा इंडोवेस्टर्न ड्रेसची फैशन आहे. हा ड्रेस पार्टीमध्ये नक्कीच उठून दिसू शकतो. कारण तो इतर ड्रेसपेक्षा नक्काच हटके दिसतोय. ज्यामुळे तुमच्या लुकची फक्त स्तुतीच होईल. सणासुदीची पार्टी असो किंवा एखाद्याच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी कोणत्याही समारंभात तुम्हाला हा सूट परिधान करता येऊ शकतो. धोती आणि त्यावर हा लॉंग कोटीवाला पंजाबी सूट तुमच्या सौदर्यात अधिकच भर घालू शकतो.

टीप- हा पंजाबी सूट तुम्ही कोणत्याही बुटीकमधून कस्टमाईज करू शकता.

10. मल्टीकलर दुपट्टा आणि लेसवाला पंजाबी सूट (Multi-Coloured Dupatta & Lace Style Punjabi Suit)

Crepe-Patiala-punjabi-Suit marathi

केशरी रंगाचा या प्रकारातील पंजाबी सूटची सध्या फारच फैशन आहे. या पंजाबी सूटचे कापड प्लेन रंगाचे असून त्यावर मल्टीकलरच्या लेसचं वर्क केलं आहे. शिवाय मल्टीकलर दुपट्टा परिधान केल्याने हा सूट अधिकच आकर्षक वाटत आहे. दुपट्टयावर मिरर वर्कदेखील केलंय तर सलवार वर लेसची चेक्स डिझाईन केली आहे.

टीप- हा लेस लावलेला सिल्कचा पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. तुम्ही एखाद्या प्लेन रंगाच्या सलवार कमीजवर त्याला साजेसा मल्टीकलर दुपट्टा मॅच करुन स्वतः देखील असा ड्रेस तयार करू शकता.

11. कॉटन हायनेक पंजाबी सूट (Cotton High Neck Punjabi Suit)

Grey-Cotton-Straight-punjabi-suit marathi

कॉटनमधील हा हायनेक आणि पूर्ण बाह्यांचा स्लेटी रंगातील सूट तुम्हाला नक्कीच आवडेल. या सूटवर वरच्या भागात फुलकारी डिझाईन केली आहे. बॉटम आणि दुपट्टादेखील त्याला मॅचिंग आहे. अशा प्रकारच्या सूटमध्ये तुम्ही आणखी उंच दिसाल. ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसेल.

टीप- या हायनेक फुलस्लीव्हज पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. मात्र या सूटवर हाय हिल्स वापरा ज्यामुळे तुमचा लुक आणखी छान दिसेल.

12. बंटी-बबली कॉलर कुर्ता पंजाबी सूट (Bunty Babli Punjabi Suit)

bunty-babli-punjabi-suit marathi

बंटी और बबली या सिनेमामध्ये राणी मुखर्जीने परिधान केलेला हा कॉलरवाला पंजाबी सूट तुमच्या नक्कीच लक्षात असेल. आजही हा पंजाबी सूट ट्रेन्डमध्ये आहे. कॉलरवाला शॉर्ट कुर्ता आणि फंकी लुकमधील ही सलवार तुमच्या लुकला अधिक स्टाईलिश करेल. जर तुम्ही टॉम बॉय टाईपच्या असाल तर यात तुमचा लुक नक्कीच छान दिसेल.

टीप- बंटी-बबली सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. तुम्ही हा सूट तुमच्या टेलरकडून डिझाईन करुन देखील घेऊ शकता.

13. जरदोसी वर्क केलेला वॅम्पायर क्रेप जॅकेट पटियाला सूट (Zardosi Work Punjabi Suit)

navy-blue-fancy-patiala-suit-zardo marathi

गर्द निळ्या रंगाचा सिल्क आणि क्रेप कापडातील जरदोसी वर्कचा हा पटियाला अगदी हटके दिसतोय. पटियाला पायजम्यावरील कुर्ता आणि हे वॅम्पायर जॅकेटमुळे हा अगदी रॉयल लुक दिसत आहे. तुम्ही कोणत्याही इव्हेंटसाठी हा सूट परिधान करू शकता.

टीप- हा जरदोसी वर्कचा पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता.

14. गुजराती जॅकेट पंजाबी शिमर पटियाला सलवार सूट (Gujarati Jacket Punjabi Patiala Suit)

Traditional-punjabi-Jacket-Shalwar-Suit marathi

शिमर पटियाला वर गुजराती जॅकेट आजकाल फारच ट्रेन्डींग आहे.  हे एथनिक मिररवर्क असलेलं गुजराती जॅकेट तुमच्या एखाद्या साध्या पटियालादेखील कम्लीट लुक देऊ शकतं.

टीप- बॉलीवूड स्टाईल हा हटके पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

15. बोटनेक प्रिंटेड सिंपल पंजाबी सूट (Boat Neck Printed Punjabi Suit)

patiala-cotton-printted-punjabi-suit marathi

बोट नेक प्लेन कलर फुल स्लीव्ह्ज कुर्ता आणि प्रिंटेड पटियाला तुम्हाला अगदी शानदार लुक देऊ शकतो. कारण प्लेन आणि प्रिंटेडचं  कॉम्बिनेशन नेहमीच छानच दिसतं. त्यात जर तुमच्याकडे पायजम्याच्या रंगाचा मैचिंग दुपट्टादेखील असेल तर आणखीच मजा. या पंजाबी सूटमुळे तुम्ही चारचौघींमध्ये अगदी उठून दिसाल.

टीप-हा पंजाबी सूट तुम्ही खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

16. पटोला पंजाबी सूट (Patola Punjabi Suit)

punjabi-orange-suit marathi

पटोला सिल्क जगभरात त्याच्या युनिक डिझाईनमुळे प्रसिद्ध आहे. या डिझाईन्स हाताने तयार करण्यात येतात. ज्या रंगविण्यासाठी भाज्यांचे रंग वापरण्यात येतात. या टाईपमध्ये तयार करण्यात आलेला हा पटोला पंजाबी सूट तुमच्या व्यक्तिमत्वाला फारच सुरेख दिसेल. ब्राईट रंगसंगती आणि क्लासिक डिझाईनमुळे हा सूट अधिकच सुंदर दिसत आहे.

टीप- हा पटोला सिल्क पंजाबी सूट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

17. साऊथ कॉटन ब्लॅक-रेड पंजाबी सूट (South Cotton Black-Red Punjabi Suit)

cotten-black-red-punjabi-suit marathi

डिझाईनर गोल गळ्याचा हा कुर्ता आणि पायजमा तुमच्या कॅज्युअल लुकसाठी अगदी मस्त आहे. असे साऊथ कॉटन सूट बाजारात सहज उपलब्ध असतात. तुम्ही या सूटमध्ये पटियाला सलवार पॅटर्न देखील शिवून घेऊ शकता. साऊथ कॉटनचा साधेपणा आणि पंजाबी पटियालाचा एलिगंट लुक एक छान कॉम्बिनेशन असू शकतं.

टीप- हा सूट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

18. कोटीवाला एलिगंट पंजाबी सूट (Elegant Punjabi Suit)

black-and-orange-cotton-jacket-style-punjabi-suit marathi

जर तुम्हाला फार भरजरी पंजाबी सूट वापरणं आवडत नसेल तर हा साधा पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडू शकेल. एखाद्या साध्या पंजाबी सूटवर घातलेली ही जोधपूरी आणि स्टाईलिश कोटी तुम्हाला फारच आकर्षक करेल. कारण या लुकमध्ये तुम्ही अगदी हटके दिसाल.

टीप- हा पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकाल.

19. शॉर्ट अनारकली पंजाबी सूट (Short Anarkali Punjabi Suit)

Navy-royal-blue-georgette-short-anarkali-punjabi-suit marathi

आता हेच पहा.. हा अनारकली टॉप किती हटके दिसतो आहे. शिवाय हा टॉप तुम्ही एखाद्या स्कर्ट अथवा जीन्सवर देखील वापरू शकता.

टीप-हा पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

20. हेव्ही एम्ब्रॉयडरी वर्क पंजाबी सूट (Heavy Embroidery Work Suit)

Embroidery-punjabi-suit marathi

तुमच्या घरातील कोणत्याही फंक्शनमध्ये हा भरजरी पार्टी वेअर पंजाबी सूट नक्कीच छान दिसेल. या सूटवर अगदी भरजरी वर्क केलेलं आहे. सलवार आणि दुपट्टा देखील लेस आणि वर्क केलेलं आहे.

टीप- हा पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता.

21. गोल्डन रेड-शिमर पंजाबी सूट (Golden Red Punjabi Suit)

Punjabi-glitter-Suit marathi

एक असा काळ होता जेव्हा शिमर ड्रेस घालण्याची खूप फैशन होती. आता पुन्हा ही फैशन आली आहे. शिमर लुकचा हा पंजाबी ड्रेस तुमच्या लुकला अगदी हटके करेल. जर तुम्ही नववधू असाल तर तुम्ही लग्नानंतरच्या कार्यक्रमांमध्ये हा ड्रेस नक्कीच वापरू शकता.

टीप- हा गोल्डन शिमर ड्रेस तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता.

22. यलो ब्लॅक डिझाईनर पंजाबी सूट (Yellow Black Designer Punjabi Suit)

punjabi-suit-collection marathi

हा लेटेस्ट डिझाईनर पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच छान दिसेल.पिवळ्या आणि ब्लॅक रंगाच्या या सूटवर केलेल्या या  वर्कमुळे हा ड्रेस अधिकच लेटेस्ट वाटतोय.

टीप- हा पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

23. गोटा-पट्टी पंजाबी सूट (Gota Patti Punjabi Suits)

gota-patti-suit marathi

आजकाल बॉलीवूड अभिनेत्रीदेखील गोटा-पट्टी ट्रेडिशनल पंजाबी सूट परिधान करताना दिसतात. गोटा-पट्टी वर्क तुम्हाला क्लासिक आणि डिसेंट दोन्ही लुक देऊ शकेल. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात एथनिक आऊटफीट घालायचं असेल किंवा तुमचं लवकरच लग्न होणार असेल तर हा पंजाबी सूट तुमच्या वॉर्डरोबमध्ये हवाच. दिसायला जरी हेव्ही वाटत असला तरी तो फारच लाईटवेट आहे.

टीप-गोटा-पट्टी पंजाबी सूट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता.

24. व्हाईट रेड पटियाला पंजाबी सूट (White Red Patiala Suit)

white-red-patialas-suit marathi

पांढऱ्या आणि लाल रंगाचं हे कॉम्बिनेशन कोणालाही नक्कीच आकर्षित करेल. या पंजाबी सूटवर हेव्ही वर्क केलेलं आहे शिवाय त्याच्यावर मैचिंग मल्टीकलर दुपट्टा घेतल्याने तो अधिकच सुंदर दिसत आहे.

टीप-हा पटियाला सूट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

25. डिझाईनर प्लाझो पंजाबी सूट (Designer Palazzo Punjabi Suit)

Designer-Punjabi-Suit-With-Palazzos marathi

आजकाल लॉंग आणि शॉर्ट दोन्ही कुर्त्यावर प्लाझोची फैशन ट्रेडिंग आहे. जे कॉम्बिनेशन तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरू शकता. आता हेच पहा…ब्राईट कलरचा हा सूट जर तुम्ही परिधान केला तर तुमचा लुक अगदी हटके आणि स्टाईलिश दिसेल.

टीप- हा पंजाबी प्लाझो सूट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.लक्षात ठेवा या सूटवर हाय हिल्स जास्त चांगल्या दिसतील.

26. रॉयल ब्लू अॅन्ड मिंट पेप्लम पंजाबी सूट (Royal Blue And Mind Peplum Punjabi Suit)

royal-blue-punjabi-suit 7206788 marathi

जर तुम्हाला नेहमी काहीतरी हटके करण्यात रस असेल तर हा सूट तुम्ही ट्राय करायलाच हवा. शॉर्ट अनारकली कुर्ता आणि मिंट कलरच्या पेप्लम पायजम्यासोबत घेतलेला हा एम्ब्रायडरी दुपट्टा तुमच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लावू शकतो.

टीप- हा हटके पंजाबी सूट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

27. कोल्ड शोल्डर पंजाबी सूट (Cold Shoulder Punjabi Suit)

cold-shoulder-punjabi-suit marathi

कोल्ड शोल्डर पंजाबू सूट आजकाल खूपच ट्रेन्ड मध्ये आहेत. तुम्हाला पंजाबी सूटला मॉर्डन लुक द्यायचं असेल तर हा पीच कलरचा एलिंगट लुक सूट तुम्हाला नक्कीच आवडू शकेल.

टीप- या कोल्ड शोल्डर पंजाबी सूट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करा.

28. बनारसी सिल्क एम्ब्रॉडरी वर्क पंजाबी सूट (Banarsi Silk Embroidery Work Punjabi Suit)

bnarsi-silk-Patiala-Suit 460862 marathi

प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी बनाससी सिल्क असतेच. जसं दक्षिण भारतात कांजीवरमला आणि महाराष्ट्रात पैठणीला महत्वाचं स्थान आहे अगदी तसंच उत्तर भारतात बनारसी सिल्कला महत्व आहे. त्यामुळे हिरव्या रंगाचा हा बनारसी सिल्क पंजाबी सूट तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा.

टीप- हा हिरवा बनारसी सिल्क सूट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

29. लेहंगा स्टाईल पंजाबी सूट (Lehenga Style Punjabi Suit)

Lehenga-punjabi-Suit marathi

तुम्हाला पारंपरिक पण तरिही काहीसा हटके लुक हवा असेल तर हा पंजाबी लाचा सूट तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरेल.

टीप- हा पंजाबी लाचा सूट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

30. एम्बॉयडरी डॉटेड सेमी पटियाला पंजाबी सूट (Embroidered Dotted Semi-Patiala Suit)

Punjabi-Embroidered-Salwar-Suit marathi

सेमी पटियाला आणि त्यावर डॉटेड प्रिंट हे अगदी झकास कॉम्बिनेशन असू शकतं.प्लेन दुपट्टा घेतल्यास तुम्ही या लुकमध्ये अगदी हटके दिसाल यात शंकाच नाही. या ड्रेसमध्ये तुम्ही अगदी स्लीम देखील दिसाल. ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अगदी खुलून येईल.

टीप- हा आकर्षक पंजाबी सूट खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.तुम्ही या रंगसंगतीचे कापड खरेदी करुन हा ड्रेस कस्टमाईज देखील करू शकता.

18 Dec 2018

Read More

read more articles like this
good points logo

good points text