ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कभी खुशी कभी गम (K3G) बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी

कभी खुशी कभी गम (K3G) बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी

‘चंदू के चाचाने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई’ हे टंग ट्वीस्टर म्हंटल्यावर हमखास आठवणारा चित्रपट म्हणजे K3G. जर तुम्ही बॉलीवूडचे चाहते आहात तर तुम्हाला K3G आवडत नाही, असं शक्यच नाही. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरची चित्रपटांमध्ये नेहमीच ड्रामा, भावना आणि प्रेमाच एकदम परफेक्ट मिश्रण असतं आणि K3G हे याचं उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे बघण्यासारखं आहे. ‘कुछ कुछ होता है’ ने करण जोहरला नाव दिलं आणि K3G ने त्याच्या कामावर शिक्कामोर्तब केलं, असं म्हणायला हरकत नाही. पण या चित्रपटाच्याबाबतीतल्या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नसतील.

k3g collage
प्रत्येक प्रसिद्ध चित्रपटाशी निगडीत अनेक मजेदार गोष्टी म्हणजे ट्रीव्हीया (trivia) असतातच. मग याला K3G तरी अपवाद कसा असेल.  K3G ला 17 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशाच काही मनोरंजक गोष्टी

K3G आणि बिग बी

37821264 249074189040845 7646256175998042112 n
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आलेला हा चित्रपट आहे. K3G आधी 1981 साली प्रदर्शित झालेला यशराजचा अजरामर ‘सिलसिला’ हा या दोघांचा एकत्र आलेला सिनेमा होता. या चित्रपटातील यश रायचंदच्या भूमिकेसाठी करण जोहरला अभिनेता अमिताभ बच्चनच हवे होते. त्यांच्याशिवाय कोणालाही या भूमिकेत तो बघू शकत नव्हता. त्याने एवढं ही ठरवलेलं की, बिग बी नी हा प्रस्ताव नाकारला तर हा चित्रपटा बनवणार नाही. यशवर्धन रायचंद या भूमिकेमागील करणची प्रेरणा होते ते त्याचे दिवंगत वडील निर्माते यश जोहर.

ADVERTISEMENT

K3G मधील एंट्रीज आणि एक्झिट्स
K3G चित्रपटात अभिषेक बच्चनचाही कॅमिओ रोल होता. पण या रोलला एडिटींगच्या वेळी करणने कात्री लावली. पण युट्यूबवर मात्र हा सीन पाहता येईल. तर दुसरीकडे ऋतिक रोशनला हा चित्रपट अगदी सहज मिळाला. त्यावेळी ऋतिकचा कहो ना प्यार है हा चित्रपट आला ही नव्हता. करणने फक्त कहो ना प्यार है चा रफ कट बघितला आणि त्याला साईन केलं. एवढंच नाहीतर बॉलीवूडमध्ये झळकण्याआधी जॉन अब्राहमला या चित्रपटातील रॉबीची भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, ज्याला जॉनने नकार दिला. हे होतं अभिनेत्याबद्दल तर या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रेहमान या अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका करणार होत्या, पण अचानक त्यांच्या पतीचं निधन झाल्यामुळे त्यांना हा चित्रपट सोडावा लागला.

K3G आधारीत पुस्तक आणि सीरियल

kjo-ekta-k3g

फोटो सौजन्य : Instagram

ADVERTISEMENT

K3G  हा भारतातील पहिला चित्रपट आहे, ज्यावर पुस्तक लिहण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर टेली क्वीन आणि करण जोहरची चांगली मैत्रीण एकता कपूरने तर या चित्रपटावर आधारित सीरीयल करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.  

K3G शूटींगदरम्यान करण झाला होता बेशुद्ध  

k3g-bole-chudiya
‘बोले चूडिया’ हे या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं. या गाणाच्या शूटींगदरम्यान करण जोहरवर इतका तणाव होता की, डीहायड्रेशनमुळे तो बेशुद्ध पडला.

 

ADVERTISEMENT

K3G मधून आर्यन खानचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

karan-srk-aryan-k3g
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे बॉलीवूडच्या किंग खानचा मुलगा आर्यन खान याने K3G मध्ये शाहरूखच्या लहानपणीची भूमिका करून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली होती.

तर अशी आहे K3G ची जादू. आजही दर वीकेंडला हा सिनेमा टीव्हीवर लागल्यावर आपला आवडता सीन किंवा आवडतं गाणं बघितल्याशिवाय चॅनल बदलणं कठीणच नाही का?

फोटो सौजन्य : Instagram

ADVERTISEMENT
14 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT