आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते. अनेकांकडे बडीशेपचा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणूनही केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप (Fennel Seeds In Marathi) किंवा सौंफमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेपेचं सेवन आवश्यक आहे. कारण बडीशेपमुळे फक्त एक नाहीतर अनेक समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत बडीशेप खाण्याचे फायदे (Badishep Benefits In Marathi)
Table of Contents
- तोंडाची दुर्गंधी कमी होते (Good For Bad Breath)
- रक्तदाब नियंत्रित होतो (Helps Regulate Blood Pressure)
- शरीरातील पाण्याचा होतो योग्य निचरा (Reduce Water Retention)
- रक्त शुद्ध होण्यास होते मदत (Helps Purify Blood)
- बद्धकोष्ठता आणि अपचन कमी होते (Reduce Constipation, Indigestion)
- दृष्टी सुधारते (Improves Eyesight)
- वजन कमी होण्यास मदत होते (Promotes weight loss)
- अस्थमाची लक्षणे कमी होतात (Reduce Asthma Symptoms)
- अॅक्ने साठी उत्तम (Good for Acne)
- स्तनपान करण्याऱ्या मातेसाठी फायदेशीर (Promotes Lactation)
- तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
तोंडाची दुर्गंधी कमी होते (Good For Bad Breath)
बडिशेपमध्ये सुंगध आणि अॅंटि बॅक्टिरिअल गुणधर्म दोन्ही असतात. ज्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी तर याने कमी होतेच शिवाय तोंडाला इनफेक्शन होण्याचा धोकाही कमी होतो. बडिशेप चावून खाण्यामुळे ती तोंडातील लाळेमध्ये मिक्स होते आणि तोंडामधील जीवजंतूचा नाश होतो. यासाठी फार पूर्वीपासून भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी बडिशेप खाण्यास देण्याची पद्धत आहे. जर तुम्हाला सतत तोंडातून घाणेरडा वास येण्याचा त्रास जाणवत असेल तर बडिशेप चावून खाण्यामुळे तुमच्या तोंडातून येणारा वास नक्कीच कमी होतो आणिबडिशेपच्या सुंगधामुळे तुम्हाला फ्रेश वाटू लागते. घराबाहेर जाताना लोकांसमोर बोलण्याचा संकोच वाटू नये यासाठी तुम्ही पर्स अथवा खिशामध्ये बडिशेपची डबी अथवा पाकीट ठेवू शकता. यासोबतच जाणून घ्या बडीशेप खाण्याचे फायदे आणि तोटे आणखी काय काय आहेत.
तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे उपाय (How To Get Rid Of Bad Breath)
रक्तदाब नियंत्रित होतो (Helps Regulate Blood Pressure)
बडिशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. बडिशेपमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमच्या रक्तदाबावर चांगले नियंत्रण राहते. बडिशेप खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके आणि रक्तदाब सुरळीत राहतो. एका संशोधनानुसार बडिशेप खाण्यामुळे लाळेचे प्रमाण वाढते. तुमच्या लाळेमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. यासाठी जरल रक्तदाबाची समस्या असेल तर नियमित बडिशेप खा (badishep che fayde)
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उच्च रक्तदाब आहार (High Blood Pressure Diet In Marathi)
शरीरातील पाण्याचा होतो योग्य निचरा (Reduce Water Retention)
बडिशेपप्रमाणेच बडिशेपचे पाणी पिणेही आरोग्यासाठी लाभदायक ठरते. बडिशेप पाण्यात भिजत घालून तुम्ही त्यापासून बडिशेपचे पाणी तयार करू शकता. या पाण्यामध्ये बडिशेपचे सर्व गुणधर्म उतरतात. ज्यामुळे हे पाणी पिणे फायदेशीर ठरते. जर तुमच्या शरीरात अती प्रमाणात पाणी साचले तर तुम्हाला त्यामुळे अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र बडिशेपमुळे तुमच्या शरीरातील विषारी पाणी मूत्रावाटे बाहेर टाकले जाते. शिवाय घामावाटेही शरीर योग्य प्रमाणात डिटॉक्स होते. याचे कारण बडिशेपमध्ये डायफोरेटिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे पाण्याचा योग्य निचरा केला जातो.
रक्त शुद्ध होण्यास होते मदत (Helps Purify Blood)
अनेक आजार आणि आरोग्य समस्या या रक्त शुद्ध नसल्यामुळे निर्माण होत असतात. यासाठी शरीरात शुद्ध रक्त असणं खूप गरजेचं आहे. बडिशेप खाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होतं. बडिशेपमधील इसेंशिअल ऑईल आणि फायबर्स रक्तामधील विशद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. ज्यामुळे शरीराला शुद्ध रक्ताचा पूरवठा होतो आणि शरीर निरोगी आणि सशक्त राहते.
जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)
बद्धकोष्ठता आणि अपचन कमी होते (Reduce Constipation, Indigestion)
आजकाल चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास जाणवताना दिसतो. मात्र तुम्ही बडिशेपने हा त्रास कमी करू शकता. यासाठी नियमित चहामध्ये बडिशेपचा वापर करा. बडिशेपचे पाणी अथवा चहा घेतल्यामुळे तुमचा बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास कमी होईल. कारण यामध्ये अनेक असे पोषक घटक आहेत. ज्यामुळे पोटातील गॅस कमी होऊन पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
गरोदरपणात बद्धकोष्ठता साठी घरगुती उपाय (Pregnancy Madhe Pot Saf Honyasathi Upay)
दृष्टी सुधारते (Improves Eyesight)
बडिशेप खाणे (Badishep Che Fayde In Marathi) तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरू शकते. यासाठी दररोज जेवल्यानंतर बडिशेप खा. कारण बडिशेपमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. जे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर मोतीबिंदू, काचबिंदू अशा डोळ्यांच्या समस्या नको असतील तर आहारात बडिशेपचा समावेश करा ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारेल आणि डोळ्यांना चांगले आरोग्य मिळेल.
वजन कमी होण्यास मदत होते (Promotes weight loss)
बडिशेप (Fennel Seeds In Marathi) मध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमचे पोट सतत भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. बडिशेप खाण्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते ज्यामुळे तुमच्या वजनावर चांगले नियंत्रण राहते. पचनशक्ती सुधारल्यामुळे शरीरात फॅट्स साठून राहण्याचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर जर तुम्ही नियमित भाजलेली बडिशेप खाल्ली अथवा दररोज सकाळी उपाशीपोटी बडिशेपचे पाणी घेतले तर चांगला फायदा जाणवू शकतो.
अस्थमाची लक्षणे कमी होतात (Reduce Asthma Symptoms)
बडिशेप खाण्यामुळे तुमच्या तोंडाला चांगला सुंगध येतो आणि तुमच्या श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात. चेहऱ्याच्या पोकळीत सायनस अडकून राहिल्यास अस्थमा रूग्णांना त्रासदायक ठरतो. मात्र जर तुम्हाला अस्थमा अथवा दम्याचा त्रास असेल तर बडिशेप खाण्यामुळे तुमचा हा त्रास नक्कीच कमी होतो. त्यामुळे अशा लोकांनी कफ आणि सायनसपासून दूर राहण्यासाठी बडिशेपचे पाणी अथवा चहा दररोज घ्यावा.
अॅक्ने साठी उत्तम (Good for Acne)
बडिशेप (Fennel Seeds In Marathi)नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेवरही याचा चांगला परिणाम दिसून येतो. कारण बडिशेपमध्ये व्हिटॅमिन्स, सेलेनियम, झिंक, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे अॅक्ने, पिंपल्सपासून संरक्षण होते. याशिवाय बडिशेपमुळे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहतात, शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळाल्यामुळे त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचेच्या समस्या कमी होतात.
स्तनपान करण्याऱ्या मातेसाठी फायदेशीर (Promotes Lactation)
बडिशेपमध्ये अनेक गुमधर्म असतात जे नवमातांसाठीदेखील खूप फायदेशीर ठरू शकता. बाळाच्या जन्मानंतर मातेचे दूध हे त्याच्या वरदान असते. मात्र आजकाल अनेक महिलांना स्तनपान करताना दूधाची निर्मिती पुरेशी होत नसल्याची समस्या जाणवते. अशा महिलांसाठी बडिशेप फायदेशीर ठरू शकते. कारण बडिशेपमध्ये अॅनेथॉल नावाचा घटक असतो. ज्यामुळे स्तनामधील दूध निर्मितीला चांगली चालना मिळते.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
बडिशेप तुमच्या त्वचेसाठी उत्तम असते का ?
बडिशेप खाण्यामुळे तुमचे रक्त शुद्ध होते. ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. बडिशेपमुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही त्वचा स्वच्छ करण्यासाठीदेखील बडिशेपच्या पाण्याचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात बडिशेप भिजवा आणि त्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
बडिशेपच्या पाण्याचे काय फायदे आहेत ?
सकाळी उपाशीपोटी बडिशेपचे पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. या पाण्यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे शरीर आणि रक्त शुद्ध होते. वजन कमी करण्यासाठीदेखील बडिशेपचे पाणी फायदेशीर ठरू शकते.
बडिशेप खाण्याचे तोटे कोणते ?
बडीशेप खाण्याचे फायदे आणि तोटे (fennel seeds in marathi) आहेत. कारण कोणतीही गोष्ट अतीप्रमाणात सेवन केली तर त्याचे काही तोटेही सहन करावे लागू शकतात. त्याचप्रमाणे अती प्रमाणात बडिशेप खाल्यास हॉर्मोन्स असंतुलित होणे, त्वचेच्या समस्या, यकृताच्या समस्या जाणवू शकतात. विशेषतः गरोदर महिलांनी आणि लहान मुलांनी अती प्रमाणात बडिशेप खाऊ नये. कधी कधी यामुळे लहान पणीच मुलींचे स्तन मोठे होण्याचा धोका असतो. यासाठी दररोज एक चमचा बडिशेप खाणे योग्य राहिल मात्र त्याव्यतिरिक्त बडिशेपचे सेवन करू नये.