सब्यसाची म्हंटल्यावर डोळ्यासमोर येतात त्या भरजरी साड्या, पारंपारिक कलाकुसर केलेले लेहंगा-चोली, सुंदर आणि विविध डिझाईन्सचे दागिने आणि पुरुषांचे पारंपारिक कपडे. प्रत्येक मुलीचं हे स्वप्न नक्कीच असतं की, आपल्या लग्नात आपण सब्यासाचीने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने घालावे. आपलंही नावं सब्यसाची ब्रायडल म्हणून घेतलं जावं असं कोणालाही वाटणं साहजिक आहे.
हायप्रोफाईल वेडिंग आणि इंडियन ब्रायडल वेअर म्हंटलं की, आज सब्यसाची हेच नाव डोळ्यासमोर येतं. Bridalwear साठी सध्या सगळ्या celebrities चं ठरलेला फर्स्ट चॉईस म्हणजे Sabyasachi. मग ती दीपिका पदुकोण, अनुष्का चोप्रा, प्रियांका चोप्रा असो वा ईशा अंबानी असो वा
दक्षिणेतील सौंदर्या रजनीकांत किंवा अगदी सातासमुद्रा पार हॉलीवूड सेलिब्रिटी ऑप्रा विन्फ्रे. सगळ्यांनीच सब्यसाची नावाला प्रथम पसंती दिली आहे. या सब्यसाची पर्वाबाबत सांगत आहे स्टाईलिस्ट आणि फॅशन डिझाईनर कल्याणी शाह.
सब्यासाचीच्या जादूची 20 वर्षं
Also Read Best Necklace Designs Online In Marathi
आज सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) हे भारतीय आणि जागतिक Fashion जगतातील एक प्रथितयश नाव आहे. 1999 पासून सब्यसाची याच नावाने या डिझायनर ब्रँडचे आउटफिट्स विकले जातात. खरं वाटतं नाही ना, पण या ब्रँडला तब्बल 20 वर्ष झाली.
गेल्या 20 वर्षांत जगभरात या लेबलखाली तब्बल 250 हजार साड्यांची विक्री झालेली आहे. सब्यसाची लेबलमुळे संपूर्ण देशातील विणकाम, भरतकाम तसंच dyeing चं काम करणाऱ्या कारागीरांसाठी फार मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांनी नुकत्याच ट्रेंडमधे आणलेल्या patchwork pallu या प्रकारास बाजारात बरीच चलती आहे. त्यातून ही अजून बरेच प्रकार निर्माण होत गेले, ज्यातून सब्याच्या कामातील वेगळेपणाची खास अशी ओळख पटवून देण्यास ते अधिकच समर्थ झाले. त्यांच्या कामाविषयी बोलताना सब्या त्यांचं ब्रीद सांगायला विसरत नाहीत- डिझाईन करताना कधीही हार मानू नये, कलेमध्ये प्रत्येकवेळी उत्क्रांतीच होत असते.
या खास 20 वर्षांच्या सेलिब्रेशच्या क्षणी त्यांनी देशातील टॉप फॅशन एडिटर्सना आपल्या कोलकत्यातील घरी आमंत्रित केलं होतं. ज्यामध्ये POPxo च्या फाऊंडर आणि सीईओ प्रियांका गिल यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.
यावेळी सब्यसाची यांनी सगळ्यासोबत लंच आणि कलेबाबतही चर्चा केली. यानिमित्ताने सब्यसाचीच्या उत्तम डिझाईन्सप्रमाणे त्यांचं घरही किती सुंदर आहे, त्याचा अनुभव आला.
तसंच सब्यसाचीने यावेळी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स, पारंपारिक भारतीय वस्त्रकलेवरचं प्रेम आणि इतर गोष्टींबद्दल गप्पा मारल्या.
सब्यसाचीच्या डिझाईन्सची खासियत
‘PERSONALIZED IMPERFECTION OF THE HUMAN HAND’ हीच सब्यसाचीच्या Designs ची PHILOSOPHY आहे. वाळवंट, बंजारे, पुरातन वस्त्र, कळलात्ता येथील सांस्कृतिक परंपरा अशा ठराविक गोष्टींतून त्यांना एक DESIGNER म्हणून कायम प्रेरणा मिळत गेली. व्यक्तीच्या पेहरावबाबत बोलताना सब्यसाची म्हणतात की, पेहराव हा त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेचा विस्तार दाखवणारा असावा. सब्यसाची नेहमीच ड्रेस डिझाईन करताना असामान्य अशा कापडांचा वापर करतात, त्यावरील डिटेलिंगकडे खास लक्ष देतात. विविध शैलीची प्रभावशाली संरचना करणं ही त्यांच्या कामाची खासियत. त्यांच्या कामातील वेगळेपण आणि जीवंतपणा टिकून राहतो तो पॅचवर्क आणि डिटेल्ड एम्बॅलिशमेंटमुळेच. सब्यसाचीच्या कामात पुरातन आणि मध्ययुगीन काळाचा प्रभाव ही बऱ्याचवेळा आढळतो. स्वतःच्या कामाचं वर्णन करताना तो म्हणतो की,- “AN INTERNATIONAL STYLING WITH AN INDIAN SOUL”.
सब्यसाचीनेच प्रथमतः पारंपरिक भारतीय कपड्यांचा वापर नव्याने आणि आधुनिक पद्धतीचे तयार कपडे बनवताना केला. बांधणी, गोटापट्टी,ब्लॉक प्रिटींग, हँड डायिंग अशा भारतीय वस्त्रोद्योगातील पारंपरिक पद्धती वापरून त्यांनी आधुनिक कपडे तयार केले आणि स्वतःच्या कामातील वेगळेपणाची छाप पाडली.
बॉलीवूड सेलेब्सचे आवडते ‘सब्यसाची’
जिथे सगळेजण बॉलीवूडचे सेलिब्रिटीजचे फॅन्स असतात, त्या बॉलीवूडमधले 90% सेलेब्स हे सब्यसाचीचे फॅन्स आहेत. सब्यसाची स्वतः Fashion Designer Council Of India चे Associate Member असून फारच कमी वयात त्यांनी National Museum of Indian Cinema चं सभासदत्व घेऊन फार मोठी कामगिरी बजावली. त्यांनी गुजारिश, बाबुल, लागा चूनरी में दाग, रावण आणि इंग्लिश-विंग्लीश यासारख्या अनेक Bollywood चित्रपटांसाठी costume designs केले. तसंच Black, Paa, No one killed Jessica ही आपल्याला माहीत असलेल्या अजून काही चित्रपटांची नावं ज्यासाठी सब्यसाची यांनी काम केलं.
2018 सालातील सर्व हाय-प्रोफाईल लग्नांसाठी सब्यसाचीने कॉश्चुम्स आणि ज्वेलरी डिझाईनिंग केलं होतं.
सर्वांना माहीत असलेला सब्यसाची यांच्या कामाचा उत्तम नमुना म्हणजे इंडियन ब्रायडल वेअर. बॉलीवूडची उलाला गर्ल दिवा विद्या बालन हिच्या लग्नासाठी सब्यसाची यांनी तब्बल 18 हँडक्राफ्टेड साड्या डिझाईन केल्या होत्या. या कलेक्शनसाठी वापरलं गेलेलं रेशीम (silk) हे खास चेन्नईहून मागवण्यात आलं होतं. तसंच विद्या बालन हिने तिच्या आतापर्यंतच्या सर्व पब्लिक अपिअरन्समध्ये नेसलेल्या साड्यांपैकी बहुतांश साड्या या सब्यासाचीद्वारे डिझाईन केलेल्या आहेत.
हाय-प्रोफाईल लग्नांचा विषय निघाल्यावर काही ठराविक नावं त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटोज् लगेच नजरेसमोर येतात.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाचा वॉर्डरोब सब्यसाचीनेच डिझाईन केला होता (2017).
तसंच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा wardrobe सब्यसाचीनेच डिझाईन केला होता (2018).
एवढंच नाहीतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या पारंपारिक भारतीय लग्नाचा लाल लेहंगाही सब्यसाचीने डिझाईन केला होता.
ईशा अंबानीच्या प्रि-वेडींगपासून लग्नापर्यंत सर्व वॉर्डरोब हा सब्यसाचीने डिझाईन केला होता.
अगदी नीता अंबानींचे कपडेही सब्यसाचीने डिझाईन केले होते.
सब्यसाची यांच्या clientele मध्ये जसे बॉलीवूड सेलेब्स आहेत,
त्याचबरोबरच international स्तरावर प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री Renee Zellweger आणि Reese Witherspoon यांचादेखील समावेश आहे.
फॅशन दुनियेत येण्यासाठी करावा लागला संघर्ष
आज सब्यसाचीला मिळत असलेलं यश आणि प्रसिद्धीसाठी घरच्या पातळीवर मात्र लढा द्यावा होता. कारण फॅशन डिझाईनर होण्याचा निर्णय सब्यसाची यांच्या कुटुंबाला मान्य नव्हता. त्यामुळे फॅशनची डिग्री घेण्यासाठी त्यांना संघर्षही करावा लागला. मध्यमवर्गीय कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या सब्यसाची यांची आई संध्या (Sondhya) मुखर्जी Government Art college साठी काम करत. त्यांना हस्तकलेची खूप आवड होती. त्यांच्या वडिलांचं नाव सुकुमार मुखर्जी यांना सब्यसाची 15 वर्षाचे असताना नोकरी सोडावी लागली. सब्यसाचीला NIFT मधून फॅशन डिझाईनिंग शिकायचे होते. पण घरातून मात्र याला विरोध असल्याने त्यांनी स्वतःची पुस्तकं विकून अॅडमिशनसाठी फॉर्म भरला आणि परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले. पदवी घेतल्यानंतर स्वतः चं वर्कशॉप काढलं आणि तिथून पुढे सुरूवात झाली सब्यसाची पर्वाला.
2001 : सब्यसाचीला Femina British Council तर्फे Most Outstanding Young Designer Of India या पुरस्काराने गौरवण्यात आलं. ज्यामुळे सब्यसाचीला लंडन येथील प्रख्यात आणि निवडक डिझाईनर Georgina Von Etzdorf यांच्या अंतर्गत Salisbury येथे इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. ही इंटर्नशिप करून झाल्यावर मायदेशी परतताना भरपूर नव्या कल्पनांचे भांडार जणू सब्यसाची घेऊन आले. तेव्हाच त्यांनी भारतातील मोठमोठ्या स्टोअर्ससोबत रिटेलिंगमध्येही पदार्पण केलं.
2002 : सब्यसाचीने India Fashion Week मध्ये भाग घेतला आणि त्याच्या कलात्मकतेला खूप सकारात्मक प्रतिसादही मिळाला.
2003 : सब्यसाचीने पहिली आंतरराष्ट्रीय झेप घेत Singapore मध्ये झालेल्या THE MERCEDES BENZ, NEW ASIA FASHION WEEK मध्ये GRAND WINNER AWARD पटकावलं. या संधीतून त्याला अजून एक संधी उपलब्ध झाली, ती म्हणजे JEAN PAUL GAUTIER आणि AZZEDINE ALAIA अशा दिग्गज डिझाईनर्सनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत (workshop) सहभागी होण्याची.
2004 : ‘भारतीय पाऊल पडते पुढे’चा अनुभव घेत कामाप्रती असलेली निष्ठाच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहचवते, हे सब्यसाचीबाबत खरं झालं. KUALA LAMPUR FASHION WEEK आणि THE MIAMI FASHION WEEK मध्ये सब्यसाचीने भारतीय वस्त्रोद्योगात क्रांती घडवली, ती रुढीमुक्त (Bohemain) कलेक्शन प्रदर्शित करून-The Frog Princess. ध्येयाच्या परिसीमा विस्तारत असतानाच लंडनमधील प्रतिष्ठीत, The Best Shopping Destination in the World अशा रीतीने संबोधल्या जाणाऱ्या, Vogue पुरस्कृत ब्राऊन्स स्टोरमध्ये सब्यसाचीला भविष्यातील एक कर्तृत्ववान डिझाईनर म्हणून ओळख निर्माण करायची संधी मिळाली.
2005 : सब्यसाचीच्या Spring Summer collection-The Nair Sisters या Hand block printing, Bagru prints, विणकाम, भरतकाम यांसारख्या भारतीय कलांमधून प्रेरित collection मध्ये जास्तीत जास्त भर होता तो सुती आणि हातमागावर विणल्या गेलेल्या कापडावर. हे collection लंडन मधील Browns आणि Selfridges अशा नामांकित स्टोअर्स मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सब्यसाचीला आपल्या कामाचं प्रदर्शन करण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या. त्यापैकी महत्त्वाची संधी म्हणजे प्रतिष्ठित Oxford University च्या Annual Black Tie Charity Dinner Fashion Show मध्ये त्यांचे collection showcase करण्यासाठी विनंती केली गेली.
2006 : प्रथमच सब्यसाची यांनी New York Fashion Week मध्ये Spring Summer Collection-07 चं प्रदर्शन केलं आणि तिथे ही त्यांची भरपूर प्रशंसा झाली. तसंच सब्यसाची लेबलसाठी जगभरातून खरेदी विक्रीसाठी संधी उपलब्ध झाल्या. त्यांच्या या कलेक्शनची मूळ प्रेरणा होती ती folklore ( लोककथा), glamour, simplicity, modern architecture intricate detailing. तसंच या कलेक्शनवर 17 व्या आणि 18 व्या शतकातील Brueghel, Cloude Monet अशा चित्रकारांच्या कलाकृतीचा ही प्रभाव दिसला.
सब्यसाची हे एकमेव designer आहेत, ज्यांनी तिन्ही महत्त्वाच्या fashion weeks मध्ये भाग घेतला आहे. सब्यसाची यांना विश्वास आहे की, भारतीय designers च्या कामातील वेगळेपण हे त्यांच्या वैविध्यपूर्ण, सांस्कृतिक, ऐतिहासिक तसेच पारंपरिक वारसा असलेल्या समृद्ध अशा मातृभूमीमुळेच. त्यांच्यामते भारतीय कलाकार त्यांच्या कलाकृतीमध्ये वैयक्तिकता आणि संवेदनशीलतेचा असा काही मेळ घडवून आणतात की ज्यामुळे ती कलाकृती पाहताना पाश्चात्यांना आश्चर्यकारक आनंद होतो.
2007 : सब्यसाचीने THE NEW YORK, THE LONDON FASHION WEEK PLUS BRIDAL ASIA-2007 तसंच लॅक्मे इंडिया फॅशन वीक आणि THE VOGUE LAUNCH EVENT IN INDIA मध्येही भाग घेतला होता. त्यांच्या लॅक्मे इंडिया फॅशन वीक फॉल विंटर -08 मधील सादर केलेल्या SANCTUARY COLLECTION ला द न्यूयॉर्क टाईम्सच्या फॅशन एडिटर SUZY MENKES यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.
2008 : सब्यसाची मुखर्जीने Gaja नावाच्या brand सोबत स्वतः design केलेल्या jewelry collection ला सुरुवात केली. पुढे त्यांचे Jewellery collection – THE VOGUE WEDDING SHOW -2016 मध्ये showcase केले गेले. त्याच दरम्यान त्यांनी पुरुषांसाठी खास अशा MENSWEAR COLLECTION ला ही सुरुवात केली आणि LAKME INDIA FASHION WEEK SPRING SUMMER-09 GRAND FINALE SHOW दरम्यान showcase केले. स. मु. यांनी लहान मुलांसाठी CHHOTA SABHYA लेबल खाली KIDS WEAR LINE ही सुरू केली.
FRENCH LUXURY FOOTWEAR आणि fashion designer- CHRISTIAN LOUBOUTIN सोबत स .मु. नी AICW – AMAZON INDIA COUTURE WEEK साठी AUTUMN WINTER 2015 collection सादर केले. ज्यात महिला आणि पुरुषांसाठी मिळून FOOTWEAR च्या तब्बल ८० जोड्या design केल्या. ह्या footwear collection मध्ये सब्यसाची यांच्या designing ची तसेच भरतकाम विणकामाची सर्वोत्कष्ट झलक दिसली. हे designs करताना त्यात acid dyed burnt zardosi आणि vintage parasi gara work चा खास करून वापर केला होता.
सब्यसाचीचा ‘Save the saree’ प्रोजेक्ट
या सब्यसाची यांच्या प्रोजेक्टमध्ये भारतीय पारंपरिक पद्धतीने हातमागावर विणलेल्या साड्या ना नफा ना तोटा तत्वावर किरकोळ किंमतीत (₹3500/-) विकल्या जातात. त्यातून मिळालेली मिळकत संपूर्णतः मुर्शिदाबाद येथील विणकाम करणाऱ्या कारागिरांच्या विकासासाठी वापरली जाते. त्यांच्या या प्रकल्पाला विद्या बालन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं समर्थन आहे. अशाच प्रकारे त्यांनी आंध्रप्रदेश येथील दस्तकरिन (dastkarin), बिहार- Berozghar Mahili Samiti, Tantubay Samiti-Fulia आणि ओरिसा -Kotpadin येथील वस्त्रोद्योगास चालना दिली आणि त्यांना नवी दिशा देऊन नावारूपास आणले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत ते उच्च प्रतीचं पारंपारिक कापड वापरतात. त्यामुळे सब्यसाची यांच्या डिझाईन्समध्ये उत्कृष्ट प्रतीच्या आणि पारंपरिकदृष्ट्या समृद्ध अशा बनारसी कापड्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो.
खादी मिळवून दिली आंतरराष्ट्रीय ओळख
सब्यासाची मुखर्जीने संपूर्णतः भारतीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खादीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. सब्यसाची यांनी खादी modern styles आणि patterns मध्ये आकर्षकरित्या वापरून Contemporary designs चे कलेक्शन Sotheby’s London द्वारे आयोजित केलेल्या प्रदर्शनात शोकेस केलं.
‘Inspired by India’ हा सुद्धा अशाच प्रकारच्या प्रयोगातून निर्माण झालेल्या कामाचा उत्कृष्ट नमुना जो Sabyasachi’s Collection of Winter – Festive LAKME Fashion Week- 2011 मध्ये दिसला.
सब्यसाची लेबलमुळे मिळाला अनेकांना रोजगार
भारतीय वस्त्राला आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळवून देण्याचं काम आज सब्यसाची लेबलने केलं आहे. अनेक भारतीय कारागिरांना, त्यांच्या कलेला जीवनदान मिळालं आहे ते सब्यसाचीमुळे. आज इंडियन ब्रायडल वेअरला जागतिक आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने अनेक कारागिरांना रोजगार मिळाला आहे.
सब्यसाची आणि वादविवाद (Sabyasachi & Controversies)
प्रत्येक यशस्वी माणसामागे शुक्लकाष्ठंही असतातच. तसंच काहीसं सब्यसाची आणि सब्यसाची लेबलचही आहे. सब्यसाची या लेबलची भारतभरात सर्वात जास्त कॉपी केली जाते. या मागील कारण म्हणजे अर्थातच या लेबलची प्रसिद्धी आणि याला असलेली मागणी आहे. त्यामुळे सब्यसाची यांच्या डिझाईन्सच्या अनेक सेकंड कॉपीज तुम्हाला सर्रास पाहायला मिळतील. एकीकडे त्यांच्या डिझाईन्सची कॉपी केली जाते तर दुसरीकडे सब्यसाचीवर हाही आरोप आहे की, ते स्थानिक कारांगिरांची डिझाईन्स चोरून त्यांना स्वतःच्या लेबल म्हणून विकतात.
तसंच सब्यसाचीच्या डिझाईन्स प्रचंड मागणी असूनही त्यांच्या डिझाईन्समध्ये काहीच नाविन्य नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 2018 साली नॅशनल इंटलेक्युअल प्रॉपर्टी (IP) हा सन्मान मिळाल्याची माहिती त्यांनी सब्यसाची सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. याबाबत अनेकांनी त्यांचं कौतुक केलं तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
हे झालं सब्यसाची लेबलबाबत. सब्यसाची मुखर्जी हे स्वतःही अनेकदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी वक्तव्य केलं होतं की, त्यांना बारीक मॉडेल्स आवडत नाहीत तर ते फिगरचे चाहते आहेत. असंच काहीसं व्यक्तव्य त्यांनी साडीबाबत ही केलं होतं. सब्यसाचीच्या मते, प्रत्येक भारतीय महिलेला साडी नेसता आलीच पाहिजे, कारण साडी हा पारंपारिक पेहराव आहे. ज्या महिलेला साडी नेसता येत नसेल तिला लाज वाटली पाहिजे.
काहीही असो, सब्यसाची मुखर्जी आणि सब्यसाची लेबलची 20 वर्ष खरंच आश्चर्यकारक आणि सुंदर आहेत, यात शंका नाही.
फोटो सौजन्य : Instagram
सब्यसाची यांची माहिती : Wikipedia
हेही वाचा –
जुन्या साड्यांपासून शिवा ड्रेसचे असे हटके पॅटर्न्स
दीपिका पदुकोण की प्रियांका चोप्रा, जाणून घ्या कोण ठरली बाॅलीवूडची सर्वात सुंदर नववधू