ADVERTISEMENT
home / भविष्य
2019 वार्षिक भविष्य मकर (Capricon)राशी : एका वेळी अनेक कामे आणि सर्व कामांमध्ये यश

2019 वार्षिक भविष्य मकर (Capricon)राशी : एका वेळी अनेक कामे आणि सर्व कामांमध्ये यश

2019 हे नववर्ष मकर राशीसाठी फारच लाभदायक आहे. एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊनही त्या सर्व कामांमध्ये यश प्राप्त करणं, हे या नववर्षाचं मकर राशीसाठी असणारं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. असं असलं तरी ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यामुळे वर्षाचा शेवट आपल्यासाठी कठीण असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया 2019 हे नववर्ष मकर राशीसाठी कसं असेल याविषयी सविस्तरपणे…

सर्वात आधी आपण मकर राशीचे गुण-दोष आणि स्वभाव वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया.

मकर या राशीला श्रमिक लोकांची राशी असं म्हटलं जातं. अपार कष्ट करण्याची यांची नेहमीच तयारी असते. तरीही या राशीचे स्वामी शनि महाराज असल्यामुळे वैराग्य, उदासीनता, नैराश्य, कोणतीही गोष्ट चटकन मनाला लावून घेणं आणि या सर्व गोष्टींमुळे निर्माण झालेली संकुचित वृत्ती हे या राशीचे प्रमुख दोष सांगता येतील. श्रमिक रास असल्यामुळे कोणतीही गोष्ट चिकाटीने पूर्ण करण्याची क्षमता या लोकांमध्ये असते. कष्टांचे आणि मेहनतीचे तेज त्यांच्या चेह-यावर सदैव असते. अति महत्त्वाकांक्षा आणि जबरदस्त कष्ट यांचा सुरेख संगम या राशीच्या लोकामंध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्या बळावर ते कोणतंही अवघड काम पूर्ण करु शकतात. श्रम करण्याची मानसिक तयारी असल्यामुळे स्वावलंबीपणा या लोकांमध्ये असतो. कोणावरही विसंबून राहणे त्यांना जमत नाही. कार्याला महत्त्व देणारे असल्यामुळे हे लोक कमी बोलतात. त्याचं बोलणं हळूवार आणि मुद्देसूद असतं. सर्वांना आनंद देत नम्रपणे वागणं त्यांना आवडतं. या राशीच्या लोकांना महागड्या वस्तू आवडत नाही. श्रमाचं मोल अधिक कळत असल्यामुळे मकर राशीचे लोक अत्यंत व्यवहारी आणि हिशोबी असतात. ते कुठल्याही मोहात अडकत नाहीत आणि चुकले तर भोगावे, प्रायश्चित घ्यावे अशी त्यांची वृत्ती असते.

2019 वार्षिक भविष्य वृश्चिक (Scorpio) राशी : सर्व ग्रहांच्या तोंडी फक्त एकच शब्द… तथास्तु|

ADVERTISEMENT

करिअरमध्ये प्रगती होणार

मकर राशीसाठी 2019 या नववर्षाची सुरुवात होत आहे ती लाभातल्या गुरु आणि शुक्र या ग्रहांच्या युतीने. या मातब्बर ग्रहांची ही युती तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधणारी आहे. याशिवाय तुम्ही व्यावसायिक, नोकरदार, उत्पादक, सर्व्हिस इंडस्ट्री, बँकिग आदी कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी यश तुमचंच आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातील शक्य तेवढे प्रयत्न करायला चुकू नका. तुमच्या प्रयत्नांनुसारच फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपण आधी बघितले तसे मकर रास ही श्रमिक लोकांची रास आहे. या श्रमिक लोकांनी अधिक श्रम करावे, अशी व्ययात असलेले शनि महाराज तुम्हाला सूचना करीत आहेत.

वार्षिक भविष्य तूळ (Libra) राशी : फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचंच

आर्थिक नियोजन नीट करा

ADVERTISEMENT

तुमचे राशीस्वामी आणि धनेश असलेले शनि महाराज तुमच्यासाठी अनेक खर्चाचे दरवाजेही उघडत आहेत. त्यामुळे आपलं आर्थिक नियोजन व्यवस्थित असावं. विविध अनपेक्षित खर्च आणि एखादं फक्त 3 दिवसात पूर्ण होणा-या कामाला 13 दिवस लागणं यामुळे तुम्ही थोडं विचलित होऊ शकता. कामाला उशीर होणार असला तरी काम पूर्ण होईल हे नक्की! तृतीय स्थानात विराजमान असलेला मंगळ तुम्हाला अधिक जोमाने श्रम करण्यासाठी हिंमत आणि ऊर्जा प्रदान करणार आहे.

दि. 6 फेब्रुवारी ते 21 मार्च 2019 या कालखंडात मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानात स्वराशीत विचाराजमान होऊन रुचक योग निर्माण करीत आहे. या योगाच्या प्रभावामुळे उत्साह, नवचैतन्य, कामाचा उरक, वास्तू आणि वाहन लाभ या काळात संभवण्याचे योग आहेत.

दि. 6 मार्च 2019 ला केतू व्ययस्थानात येईल . व्ययातील शनि आणि केतू यांची युती आध्यात्मिक प्रगती घडवून आणणारी आहे. परंतू जडत्व दोष निर्माण करणारी आहे. म्हणजे मनशांती, समाधान मिळेल मात्र  त्या तुलनेत यश कमी मिळणार आहे.

दि. 15 एप्रिल 2019 ला मीनेत येणारा शुक्र प्रेमसंबंधाला अधिक मजबूत करणारा आहे. त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी राहू शकाल.

ADVERTISEMENT

2019 वार्षिक भविष्य कन्या (Virgo) राशी : थोडी सावधगिरी मग वर्षभर आनंदी आनंदच

दि. 7 मे 2019 ला तुमच्या षष्ठ स्थानात मंगळ आणि राहू या ग्रहांच्या युतीमुळे अंगारक दोष निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून कर्ज, शत्रू निर्माण होणं, आरोग्याच्या विविध तक्रारी या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय पोट, यकृतसंबंधित आजारही डोकं वर काढू शकतात.

दि. 22 जून ते 7 ऑगस्ट 2019 या कालखंडात तुमच्या सप्तमात निचीचा होणारा मंगळ जोडीदाराशी विसंवाद, आर्थिक व वास्तूविषयक अडचणी, लाभात कमी, नोकरी किंवा व्यवसायात वादविवाद, पैसे फसणं यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

असं असलं तरी लगेचच दि. 9 सप्टेंबर 2019 ला तुमच्या भाग्यस्थानाचा भाग्येश बुध उच्चीचा व पंचमेश निचिचा असा शानदार निचभंग राजयोग घडून येतोय. भाग्यात निचभंग राजयोग आणि लाभात गुरु यामुळे भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. या ग्रह योगाचा जास्तीतजास्त लाभ आपण घ्यायचा आहे.

ADVERTISEMENT

इथून पुढे मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण दि. 5 नोव्हेंबर 2019 रोजी व्ययात जाणारे गुरु महाराज आपल्या समस्या, अडचणी वाढवणार आहेत. 

वर्षभर कठोर श्रम करुन योग्य फळ प्राप्त करुन घ्या आणि वर्षाच्या शेवटी स्वत:ची काळजी घ्या, तेच तुमच्यासाठी सुयोग्य राहील.

शुभं भवतू|

लेखिका : श्री ज्योतिष संशोधन केंद्र

ADVERTISEMENT
10 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT