ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अंदाज अपना अपना’ चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण, तीन वर्ष सुरु होते शुटींग

अंदाज अपना अपना’ चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण, तीन वर्ष सुरु होते शुटींग

काही चित्रपट असे असतात की, ते कितीही जूने झाले तरी पाहावेसे वाटतात. त्यात कॉमेडी चित्रपटांच्या बाबतीत तर असे हमखास होते. मराठीतील ‘बनवाबनवी’ हा चित्रपट कितीही वर्षे उलटून गेली असली तरी तितकाच फ्रेश वाटतो. त्यातील प्रत्येक डायलॉग आजही अनेकांच्या लक्षात आहेत. अगदी तसाच हिंदीतील चित्रपट म्हणजे ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाला 4 नोव्हेंबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्ताने पुन्हा एकदा या चित्रपटातील गाणी आणि कॉमेडीची धम्माल पुन्हा एकदा लक्षात आली आहे.

इंडिगो एअरलाईन्सवर सोनाक्षी नाराज, शेअर केला व्हिडिओ

दोन खान दिसले होते चित्रपटात

Instragram

ADVERTISEMENT

आता जरी आपण  सलमानला दबंग रुपात पाहात असलो तरी सुरुवातीच्या काळात सलमानची कॉमेडीच लोकांना भावत होती. त्याचं लाजणं, त्याचं बोलणं लोकांना आवडायचं. तर दुसरीकडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानबद्दल तर काही सांगायलाच नको. त्याचा उत्तम अभिनय हे त्याच्यातील प्लस पॉईंट असल्यामुळे त्याची कलाकृती नेहमी उत्तम असते. आता हे दोन खान पहिल्यांदाच ज्या चित्रपटात दिसले तो चित्रपट म्हणजे ‘अंदाज अपना अपना’  या संपूर्ण चित्रपटात त्या दोघांनी इतकी कॉमेडी केली आहे की, ती विसरता येणे अजिबात शक्य नाही. दोन हिरो, दोन हिरोईन, एक व्हिलन अशी भली मोठी स्टारकास्ट या चित्रपटात होती. आमीर, सलमानसोबत या चित्रपटात करिश्मा कपूर, रवीना टंडन, शक्ती कपूर, परेश रावल अशी स्टारकास्ट होती. 

डायलॉग आणि गाणी आजही प्रसिद्ध

आता चित्रपट लक्षात कशामुळे राहतो. डायलॉग आणि त्यातील गाण्यांमुळे. ‘अंदाज अपना अपना’ मधील गाणीही खास होती. ‘है रात और ये दुरी’, ‘इलोजी सनम हम आ गये’ ही यातली गाणी फारच गाजली. या शिवाय ‘आप पुरुष नही महापुरुष है’, मै क्राईम मास्टर गोगो आँखे निकालकर गोटींया खेलूंगा’ असे काही डायलॉग चित्रपटातले आजही अनेकांच्या लक्षात आहे.

करोड’पती’ असलेल्या अभिनेत्री, जगतात ऐशोआरामात आयुष्य

शुटींगसाठी लागली 3 वर्ष

हा चित्रपट इतका प्रसिद्ध असला तरी या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी 3 वर्ष लागली. याचे कारण असे सांगितले जाते की, या चित्रपटात लीड रोलसाठी 90च्या दशकातील दोन मोठे कलाकार होते. त्यामुळे स्क्रिन टाईमिंगवरुन त्यांच्यामध्ये वाद होता. दोघांनाही एकमेकांपेक्षा जास्त दिसायचे होते. म्हणूनच निर्मात्याला त्यांच्या अटी मान्य कराव्या लागले. इतके करुनही सगळे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल 3 वर्षे लागली. 

ADVERTISEMENT

चित्रपटाची कमाई काहीच नाही

आजच्या घडीला हा चित्रपट आपल्याला evergreen  वाटत असला तरी त्या काळात मात्र .मुंबई वगळता या चित्रपटाने फार काही कमाई केली नाही. ज्या चित्रपटाने पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी घेतला त्या चित्रपटाकडून कोटींच्या घरात कमाईची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे. पण तसे झाले नाही. यासंदर्भात आमीर खानला एका मुलाखतीत प्रश्न करण्यात आल्याचा दाखला एका वृत्तपत्राने दिला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमीर खानने त्यावेळी असे सांगितले की, या चित्रपटाचे पोस्टर छापण्यात आले नव्हते. शिवाय चित्रपट रिलीज होण्याच्या तीन दिवस आधी याचे प्रमोशन सुरु झाले होते. त्यामुळेच हे अपयश आले. पण आज हे कोणाला सांगितले तर अजिबात विश्वास बसणार नाही. 

एकमेकांशी बोलणेही होते जड

या चित्रपटाला ज्यावेळी काही वर्ष पूर्ण  झाली त्यानंतर रवीना टंडनने एक ट्विट केले होते. त्यामध्ये ती म्हणाली होती. सेटवर एकमेकांशी ते एकदाही बोलत नव्हते.  पण असे असूनही हा चित्रपट इतका हिट झाला याचे आश्चर्य असल्याचे तिने म्हटले आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

04 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT