ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 अॅप

तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 अॅप

हल्ली 99 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन आला की, फोनमध्ये वेगवेगळे अॅप येतात. म्युझिक, व्हिडिओ, गेम्स आणि माहिती देणारे असे कितीतरी अॅप आपल्याकडे असतात. पण त्या सगळ्याच अॅपचा आपण उपयोग करतोच असे नाही. काही अॅप तर आपण उघडूनही पाहात नाहीत. पण तरीही आपल्या फोनमध्ये ते घर करुन असतात. तुम्ही तुमचा फोन कधीही नीट पाहिला नसेल तर आता पाहा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे तुमच्या फोनमध्ये अनावश्यक अॅपच सगळ्यात जास्त आहेत. पण आज आम्ही तुम्हाला असे 5 अॅप सांगणार आहोत जे तुमच्या स्मार्टफोनमध्ये असायलाच हवे.

असे स्वच्छ करा फोन कव्हर्स, इअरफोन आणि चार्जिंग कॉड

हेल्थ ट्रॅकर (Helath Tracker)

 हल्ली आपल्या सगळ्यांनाच आरोग्याची फार काळजी आहे. विशेषत: कोरोनानंतर अनेकांनी त्यांच्या इतर आरोग्यविषयक समस्यांकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. फिटनेस ही सगळ्या महत्वाची गोष्ट आहे म्हणून तुम्ही परिपूर्ण असे फिटनेस ट्रॅकर घ्या. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅलरीज, स्टेप्स आणि पाणी पिण्याचे प्रमाण कळू शकेल. असे बरेच अॅप सध्या प्ले स्टोरमध्ये आहे. त्यातील एखादे अॅप तुम्ही निवडा. 

उदा. हेल्दीफायमी, होम वर्कआऊट, गोल्डस जीम अॅप वगैरे 

ADVERTISEMENT

या पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी

पिरेड ट्रॅकर (Period Tracker)

पिरेड ट्रॅकर

Instagram

 मुलींसाठी अत्यंत  उपयुक्त असे हे अॅप आहे. घाईगडबडीत अनेकदा पिरेड्सच्या तारखा लक्षात राहात नाही. जर तुमच्या फोनमध्ये पिरेड ट्रॅकर असेल तर तुम्हाला तुमची पुढील मासिक पाळी कधी येईल याचा अंदाज येईल. शिवाय हे अॅप तुम्हाला त्याची आठवण करुन दिली. अनेकदा पिरेड्सच्या तारखा आपल्याला माहीत नसतात. मग काय आपण बॅगमध्ये सॅनिटरी पॅड घेऊन जायला विसरतो. मग काय सगळी फसगत होऊन बसते. अगदी कमीतकमी साईजचे हे अॅप तुमच्या फोनमधील जास्त जागा देखील घेत नाही. 

ADVERTISEMENT

उदा. पिरेड्स ट्रॅकर, POPxo अॅप ( जिथे तुम्हाला यासंदर्भातील अधिक माहितीही मिळते) 

युपीआय अॅप (UPI App)

सध्याचा काळ हा  कॅशलेस व्यवहारांचा आहे. पुढेही काही दिवस हे व्यवहार असेच राहणार आहेत. तुम्हाला मोबाईल अॅपच्या साहाय्याने पैसे ट्रान्सफर करणारे अनेक अॅप माहीत असतीलच. तुम्हाला विश्वास असेल अशा चांगल्या अॅपची निवड करुन तुम्ही हे व्यवहार करु शकता. हल्ली अगदी चहाच्या टपरीवरसुद्धा अशा पद्धतीने पैसे घेतले जातात. हल्लीचे काही फ्रॉड पाहता जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्हाला घाबरण्याची फारशी गरज नाही. याचे कारण असे की, तुमच्या संमतीशिवाय तुमचे पैसे कुठेही जात नाही. तुम्हाला कोणत्याही मेसेज किंवा फ्रॉड कॉल्सना भुलायचे नाही. तरच तुम्हाला हे अॅप अगदी आरामात वापरता येईल. 

उदा. फोन पे, गुगल पे, भीम अॅप, पेटीएम इ.

प्रत्येक मुली गॅजेटबाबत करतात या चुका

ADVERTISEMENT

एखादे गेम अॅप (Game App)

फोनमध्ये गेम अॅप असणे काहीच वाईट नाही. कंटाळा आला तर फोनमध्ये एखादे गेम अॅप असायला काहीच हरकत नाही. पण हे गेम अॅप क्राईम, मारामारी किंवा स्पीडशी निगडीत नसले तर जास्त बरे. याचे कारण असे की, त्यामुळे तुम्ही सतत त्यामध्ये गुंतून राहता कामा नये. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबतच काही खेळायचे असतील तर तुम्ही लुडो, सापसिडीसारखे सोपे खेळही खेळू शकता. 

एंटरटेन्मेंट अॅप (Entertainment App)

तुमच्याकडे हवे हे अॅप

Instagram

सध्या अनेकांना टीव्हीपेक्षाही जास्त सीरिज पाहायला आवडतात. त्यामुळे जर तुम्हाला प्रवासात किंवा एकांतात अशा काही सीरिज पाहायच्या असतील तर तुम्ही असे काही अॅप डाऊनलोड करु शकता. आता हे अॅप डाऊनलोड फ्री करु शकता. पण यामध्ये काही पॅकेजही असतात. हल्ली अनेकांना मोबाईलच्या बिलिंग पॅकेजमध्ये या अॅपचे सब्स्क्रिब्शन मिळते. पण यासाठी पैसे खर्च करणे नक्कीच चांगले असेल. 

ADVERTISEMENT

मग आता तुमच्या मोबाईलमधील नको असलेले अॅप काढून टाका आणि हे चांगले अॅप तुमच्या फोनमध्ये नक्की असू द्या. 

10 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT