आपली त्वचा चांगली असेल तर चेहरा अधिक चमकदार आणि सुंदर दिसतो. त्यासाठी आपण रोज व्यवस्थित आहार घ्यायला हवा ही खरं असलं तरी त्यासाठी उत्तम झोपही हवी. जेव्हा उत्तम झोप मिळते तेव्हा चेहरा अधिक ताजातवाना दिसतो. त्यामुळे त्वचेला वेळेआधी म्हातारे होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही आम्ही सांगत असलेल्या सोप्या 5 टिप्स झोपण्याआधी नक्की फॉलो करा. तुम्हाला तुमची त्वचा नेहमी चमकदार दिसायला हवी असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. या सगळ्या टिप्स तुम्ही नियमित वापरल्या तर तुमच्या त्वचेचे टेक्स्चर सुधारेल. तसंच तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम, चमकदार दिसेल. सध्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या शरीरावर आणि त्वचेवरीही खूपच परिणाम होत आहे. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी यापैकी एक अथवा दोन स्टेप्स जरी केल्यात तरी तुम्हाला तुमच्या त्वचेवरील चांगला परिणाम दिसून येईल. पण पूर्ण रूटीन आठवड्यातून तुम्ही एकदा जरी योग्यरित्या फॉलो केले तरीही तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.
झोपण्यापूर्वी करा फेशियल स्टिम
Shutterstock
बऱ्याच जणींना सध्या लॉकडाऊन आणि घरच्या आणि ऑफिसच्या जबाबदारीमुळे खूपच लोड आलं आहे आणि घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे. अशावेळी चेहऱ्यावरील पोअर्स ओपन करून त्यातील जमलेली धूळ काढणंही कठीण झालं आहे त्यामुळे चेहरा कामाने आणि या सगळ्या गोष्टींनी निस्तेज होऊन गेला असेल तर तुम्ही घरच्या घरी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला अधिक रिलॅक्स करण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी वाफ घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याजवळ स्टीमर नसेल तर तुम्ही आंघोळ करताना पहिले सर्व शरीर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. यामुळे बाथरूमलाच एक स्टीम बाथ फिल येतो आणि तुमचे पोअर्स ओपन होतात त्यानंतर पुन्हा चेहरा स्वच्छ करा. त्याशिवाय तुम्ही हॉट टॉवेल थेरपीही वापरू शकता. गरम अथवा दमट टॉवेल आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि वाफ घ्या. चेहरा कधीही रगडून पुसू नका तर अगदी हलक्या हाताने पुसा आणि मग मॉईस्चराईज करा.
दिवसातून कमीत कमी दोन वेळा चेहरा धुवा
Shutterstock
थंडीत चेहरा दोन वेळा धुवायचा नाही असं काहीही नाही. थंडी सुरू झाली की आपण त्वचेची काळजी घेणं कमी करतो आणि हीच खरी चूक आहे. हंगाम कोणताही असो तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी ही योग्यरित्या घ्यायलाच हवी. कमीत कमी दोन वेळा दिवसातून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही ज्या क्लिंन्झरची अथवा फेसवॉशची निवड केली आहे त्याने तुमचा चेहरा कोरडा तर पडत नाही ना याची काळजी घ्या. जास्त अथवा कमी वेळा चेहरा धुणं चुकीचे आहे. यामुळे म्हातारपण चेहऱ्यावर पटकन दिसू लागतं. त्यामुळे योग्य वयातच ही काळजी घेणं सुरु करा. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी डबल क्लिंन्झिंगचाही वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही पहिले ऑईल बेस्ड क्लिंन्झरने आपला मेकअप काढून टाका आणि मग एक वॉटर बेस्ड क्लिंन्झर वापरून चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमची डेड स्किन पूर्ण निघून जाण्यास मदत मिळते आणि चेहऱ्यावरील घाणही निघून जाते.
सॅलिसिलिक अॅसिड असणारा क्लिंन्झर वापरा
सॅलिसिलिक अॅसिड असणारा क्लिंन्झर हा तेलकट आणि मुरूमं असणाऱ्या त्वचेसाठी सर्वात उत्तम क्लिंन्झर आहे. यामुळे त्वचा अधिक चमकदार तर होतेच. पण त्यावर लवकर सुरकुत्या पडून लवकर म्हातारपण दिसून येत नाही. तुमच्या चेहऱ्यावर जर काही लहान प्रमाणात पुळ्या असतील तर हे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. तसंच कधी तुम्हाला चेहऱ्यावर मुरूमांचा त्रास झाला तर त्याचीही समस्या दूर करू शकते. त्वचेवर पॅच असतील तर त्यासाठीही हा योग्य पर्याय आहे. तुम्हाला सॅलिसिलिक अॅसिडचे योग्य क्लिन्झिंग उत्पादन नक्कीच त्वचा चांगली राहण्यासाठी मदत करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी याचा उपयोग करा.
चेहरा मॉईस्चराईज करायला विसरू नका
Shutterstock
रात्री आपली त्वचा ही दुरूस्त होत असते. आपल्या पहिल्या टेक्स्चरमध्ये त्वचा येत असते. त्यामुळे अशावेळी चेहरा मॉईस्चराईज नसेल तर त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना चेहरा व्यवस्थित मॉईस्चराईज आहे की नाही ते पाहूनच झोपा. रात्री झोपण्यापूर्वी नियमित चेहरा मॉईस्चराईज करा. आपला चेहरा तेलकट अथवा कोरडा ठेऊ नका. यामुळे त्वचा टाईटही होते आणि चमकदार होण्यासही याचा फायदा मिळतो.
झोपेत सतत कूस बदलू नका
Shutterstock
तुम्हाला जर सतत कूस बदलायची सवय असेल तर ती वेळीच बदला. यामुळे पोट आणि चेहऱ्यावर परिणाम होतो. काही रिसर्चनुसार तुम्ही जर पोटाच्या बाजूला झोपलात तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर जास्त होतो आणि वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे पाठीवर झोपायची सवयच ठेवा. तर काहींना सतत झोपेत कूस बदलायची सवय असते. ही सवय पण चांगली नाही. यामुळे डोळ्यांवर सूज आणि डोळ्यांखाली काळे डाग येण्याची शक्यता असते. त्यामुळे याची काळजी घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक