नैसर्गिक गुलाबी ओठ आपल्या सौंदर्यात अधिक भर घालतात. पण प्रत्येकाचे ओठ नैसर्गिक गुलाबी राहत नाहीत. त्वचेचा रंग आणि एखाद्या वक्तीच्या ओठांचा रंग हा वेगवेगळा असू शकतो. कधी कधी ओठांच्या रंगातील बदल आपल्याला संकेत देत असतो की, आपल्याला आता ओठांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. पण ओठ नक्की काळे का पडतात याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? हायपरपिमेंटेशन अथवा अतिरिक्त मेलेनिनमुळे ओठांना काळेपणा येतो. पण तुम्हाला जर आम्ही सांगत असल्याप्रमाणे काही सवयी असतील तर तुम्ही या सवयी वेळीच सोडा अथवा बदला. अन्यथा तुमचे ओठ काळे होतील आणि तुम्हालाच याचा त्रास होईल. तुमच्या सौंदर्यात यामुळे खोट येऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या सवयी.
ओठांना मॉईस्चराईज न करणे
कोरडे आणि फाटलेले ओठ हे ओठांचा रंग अधिक बिघडवतात. ओठांना निरोगी ठेवण्यासाठी ओठ हायड्रेट करणं अत्यंत गरजेचे आहे. ओठांना पोषण देण्यासाठी तुम्ही एक चांगला लिप बाम (MyGlamm LIT PH Lip Balm-Bite Me-2gm) नेहमी वापरा. यामध्ये कोको अथवा शिया बटरचा समावेश असेल असा लिप बाम तुमच्या ओठांसाठी अधिक फायदेशीर ठरतो.
आपल्या त्वचेमध्ये 70% टक्के पाणी असते आणि त्वचा सतत हायड्रेट करणे गरजेचे आहे. ओठांची त्वचा सर्वात जास्त पातळ असते त्यामुळे ओठ लवकर कोरडे पडतात. त्यामुळे ओठांना मॉईस्चराईज करणे अत्यंत गरजेचे आहे. लिप बाम ओठांना मॉईस्चराईज करून मऊ ठेवण्यास मदत करतात.
डेड स्किन न काढणे
फाटलेल्या आणि कोरड्या ओठांपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही ओठांवरील डेड स्किन काढणे आवश्यक आहे आणि ओठांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित स्वरूपात एक्सफोलिएट करणेही गरजेचे आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे. केवळ चेहऱ्याला एक्सफोलिएट करणे आवश्यक नाही तर ओठांसाठीही त्याची गरज भासते. तुमच्या चेहऱ्याप्रमाणेच ओठांची त्वचा ही नेहमी डेड स्किन सेल्स निर्माण करत असते. ही डेड स्किन तुम्ही लावलेल्या उत्पादनांना तसंच ओठांवर अडकवून ठेवते. त्यामुळे ओठ अधिक निस्तेज आणि सुरकुत्या आलेले दिसतात. हा अशुद्ध लेअर आपल्याला काढून टाकायला हवा. तर ओठ काळे पडणार नाहीत आणि कायम तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी राहतील.
स्मोकिंग करणे
धुम्रपान करणे अर्थात स्मोकिंग करणे हे ओठ काळे पडण्याचे अजून एक कारण आहे. तंबाखूच्या धुरामध्ये निकोटिन आणि बेंजोपायरीन असल्याने शरीरात मेलेनिनचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे ओठ काळे पडतात आणि धुम्रपानाची सवय एकदा लागली की सोडणे कठीण होते. त्यामुळे सर्वात पहिला परिणाम हा ओठांवर होतो. ओठ जर गुलाबी ठेवायचे असतील ही सवय सोडणे अथवा लाऊन न घेणेच उत्तम. ओठांचा काळेपणा घालविण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्सही उपयोगी ठरतात.
ओठांची कमी काळजी घेणे
आपण शरीराची अथवा चेहऱ्याची जशी काळजी घेतो तशी अथवा तितकी काळजी ओठांची घेत नाही. ओठ काळे पडत आहेत असं वाटू लागल्यावर अथवा अगदी त्याआधीही तुम्ही नियमित रात्री ओठांना झोपण्याआधी बदामाचे तेल लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. नियमित मालिश केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि ओठ निरोगी राहतात. त्यामुळे नैसर्गिक गुलाबीपणा टिकून राहातो. मॉईस्चराईजिंगपासून ते एक्सफोलिएशनपर्यंत ओठांची काळजी ही आपल्या नियमित स्किन केअर रूटिनमध्ये समाविष्ट करून घ्यायला हवी.
सनब्लॉकपासून वाचा
त्वचेप्रमाणेच ओठांनाही सनबर्नचा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही ओठांना अशा कठोर युव्ही किरणांपासून वाचवणे गरजेचे आहे. तुम्ही असाचा लिपबाम वापरा ज्यामध्ये एसपीएफ 30 असेल. तसंच पाणीही योग्य प्रमाणात तुम्ही प्यायला हवे. जेणेकरून ओठांची त्वचा चांगली राहील.
तुम्हालाही आम्ही सांगितलेल्या या 5 सवयी असतील तर तुम्ही वेळीच यावर मात करा आणि आपल्या सवयी बदलून मिळवा सुंदर आणि आकर्षक नैसर्गिक गुलाबी ओठ!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक