अनेक वेळा घरी किंवा ऑफिसमधल्या प्रोब्लेम्स किंवा कामाच्या ताणामुळे आपला मूड खराब आणि चिडचिड होते. टेन्शनमुळे एवढा परिणाम होतो की, आपल्या शारिरीक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर परिणाम होऊ लागतो.
लाईफस्टाईल (lifestyle) डिजीज, मायग्रेन आणि डिप्रेशन (depression) सारख्या समस्याही आजकाल कॉमन झाल्या आहेत. या समस्या कधी तणावामुळे जाणवतात तर कधी बदललेल्या लाईफस्टाईलमुळे. खरंतर, आपण सगळेच आपल्या दैनंदिन जीवनात एवढे बिझी झालो आहोत की, आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं दुर्लक्ष होतं. अशा आपण नको असूनही अनेकदा पॅक्ड फूड आयटम्स जसं मॅगी, चिप्स किंवा हॉटेलमधील खाणं खातो. पण तुम्ही जर या खाण्यापिण्याने वैतागला असाल आणि तणावामुळे मूड ऑफ असेल तर खा हे 5 सुपर फूड्स (super foods). हे सुपर फूड्स खाल्ल्यावर काही मिनिटांतच तुमचा तणाव दूर होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरील हास्यही परत येईल.
सुपर फूड्स जी तुमच्या वाईट मूडला करतील बायबाय – Food That Help With Depression In English
अक्रोड (Walnut)
युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिकोच्या एका अभ्यासानुसार दर दिवशी जवळपास अर्धा कप अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ताजंतवान वाटेल. वॉलनट म्हणजेच अक्रोडला बेस्ट हार्ट हेल्दी नट मानलं जातं. हा मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत आहे. मॅग्नेशिअमसारखे मिनरल्समुळे डिप्रेशनचा धोका कमी होतो. तसंच अक्रोडमुळे नैसर्गिकरित्या तुम्हाला चांगली झोपही लागते. जर तुम्हाला डिप्रेशनची लक्षण जाणवत असतील किंवा झोप लागत नसेल तर आजपासूनच तुमच्या डाएटमध्ये अक्रोड सामील करा. काही दिवसांतच तुमच्या आरोग्यात तुम्हाला बदल जाणवेल.
Also Read About संत्रा फळाची साल पावडर वापरते
डार्क चॉकलेट (Dark Chocolate)
डार्क चॉकलेट हे नेहमीच्या चॉकलेटप्रमाणे नसून त्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. हे चवीला थोडसं कडवट असतं पण सौंदर्य आणि आरोग्यासाठी युक्त असलेले अनेक गुण यात असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच तेज येतं.
डार्क चॉकलेटमध्ये अँंटीऑक्सीडेंट्स आणि फ्लैवनॉयईड्सची भरपूर मात्रा असते. ज्यामुळे मेंदूतील रक्ताचा प्रवाह चांगला होतो. त्यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो आणि डिप्रेशन व तणावाशी लढण्यात तुम्हाला मदत मिळते. पण कोणतंही डार्क चॉकलेट जर तुम्ही मूड ठीक करण्यासाठी खाणार असाल तर त्यात कोकोआची मात्रा 70 टक्केपेक्षा जास्त असावी.
Also Read Recipe Of Sweets In Marathi
अंजीर (Common Fig)
अंजीर म्हणजेच फिग हे एक असं फळ आहे, जे तुम्ही सुकवूनही खाऊ शकता. खरंतर ओलं अंजीर प्रत्येक मौसमात मिळत नाही. पण हे फळ सुकवून त्याचं सुकामेवा म्हणून सेवन केलं जाऊ शकतं. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स असतात. अंजीरमध्ये 90 टक्के पाणी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, सोडीयम, फॅट, प्रोटीन, फायबर, सल्फर, क्लोरीन, कॉपर आणि पोटॅशिअम आढळतं. हे फळ मेंदूतील गुड केमिकल्स रिलीज करण्यात मदत करतं आणि हाडंही मजबूत ठेवतं. याच्या सेवनाने तुम्हाला काही मिनिटांतच चांगलं वाटू लागतं.
तुपाचे आरोग्य सुविधांबद्दल देखील वाचा
बेरीज (Berry)
स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लूबेरीसारख्या अनेक बेरीजमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स आढळतात. यामध्ये ऐन्थोसियानिडीन नामक एक फ्लैवनॉईडही आढळतं. जे डिप्रेशनशी लढण्यात सहाय्य करतं. या बेरीजमध्ये व्हिटॅमीन सी ची मात्रा भरपूर असते. जे मेंदूसोबतच तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला अजून चांगलं बनवतात. शरीरामध्ये व्हिटॅमीन सी ची मात्रा कमी असल्यास तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवते. ज्यामुळे मूड खराब होतो. जर तुमचा मूड चांगला राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या डाएटमध्ये बेरीज समावेश नक्की करा.
Also Read About Benefits Of Jaggery In Marathi
हिरव्या पालेभाज्या (Green Vegetables)
लहानपणापासून तुम्ही मोठे होईपर्यंत तुम्हीच नेहमीच आईकडून अगदी शाळेतही हिरव्या पालेभाज्या खा. आरोग्यासाठी चांगल्या असतात, असा सल्ला ऐकला असेलच. पण तो सल्ला योग्यच आहे कारण या हिरव्या भाज्यांमध्ये तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याचे आणि डिप्रेशनशी लढण्याचे अनेक गुण आहेत. खरंतर पालक, मेथी आणि माठसारख्या भाज्यांमध्ये फोलेट हा घटक आढळतो. जर तुमच्या शरीरातील फोलेट हा घटक कमी झाला तर तुम्हाला डिप्रेशन जाणवू लागते. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह ही असतं. ज्याच्या मदतीने ऑक्सीजन तुमच्या मेंदूपर्यंत पोचण्यास मदत होते. त्यामुळे पालेभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात झालाच पाहिजे.
तर हे होतं सुपर फूड्सबाबत याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीच्या काही वस्तू खाऊ शकता. ज्यामुळेही तुमचा मूड चांगला होईल.