आपल्याकडे अजूनही अनेक महिला आपल्या अंडरवेअर अथवा अंडरगारमेंट्स आणि ब्रा बाबत खुलेपणाने बोलत नाहीत. हळूहळू गोष्टी बदलू लागल्या आहेत. मात्र अजूनही घरात मात्र या गोष्टींवर चर्चा नक्कीच होत नाही. इतकंच नाही अनेक घरांमध्ये इतरांपासून अंडरगारमेंट्स लपवून सुकायला घातले जातात. ज्या गोष्टी इतक्या लपवून वाळत घातल्या जातात त्याबाबत चर्चा ती काय घडणार म्हणा. हेच कारण आहे ज्यामुळे अनेक महिला अगदी बाजारात जाऊन खुलेपणाने अंडरगारमेंट्सची खरेदीदेखील करत नाहीत. ब्रा आणि अंडरवेअरच्या बाबतीत बऱ्याचदा महिला फिटिंग न बघताच खरेदी करतात. पण हे अत्यंत चुकीचे आहे. हे जितके तुमच्या फिटिंगसाठी चुकीचे आहे तितकेच तुमच्या व्हजायनल आरोग्यासाठीही हानीकारक ठरते. अंडरवेअर निवडताना नक्की कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी हे आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही या गोष्टींची नक्की काळजी घ्या.
तुमच्या पार्श्वभागाच्या (hips) आकाराकडे द्या लक्ष
केवळ ब्रा ची साईज योग्य हवी असं नाही तर तुमच्या पँटीची अर्थात अंडरगारमेंटची खरेदी करताना त्याची साईजही योग्य असायला हवी. पँटी (Panty) खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पार्श्वभागाचा आकार योग्य प्रमाणात मापून घ्या. यामागे केवळ एकच कारण ते म्हणजे आपली जुनी पँटी धुतल्यामुळे आणि वापरून सैलसर होते आणि या काळात जर आपला पार्श्वभाग वाढला तर आपल्याला याचा अंदाज येत नाही. त्यामुळे जुन्या पँटीच्या आकाराप्रमाणे खरेदी केल्यास, कदाचित तुम्हाला कपडे अधिक घट्ट होतील आणि त्यामुळे व्हजायनल आरोग्याला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका शोधानुसार, जास्त घट्ट अंडरवेअर घातल्यामुळे व्हजायनल मसल्सवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे व्हजायनल इन्फेक्शन अथवा यीस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, तुम्ही अधिक घट्ट पँटी घालू नये आणि आपला योग्य आकार लक्षात ठेवा.
कपडे आणि आराम या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या
दुसऱ्या कोणीतरी खरेदी केलेली पँटी आवडली म्हणून ती आपण खरेदी केली असं अजिबात करू नका. कारण असं करणं कधीही योग्य नाही. आपली प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. तसंच कपडे आणि त्यातील आराम हे दोन्ही तुमच्या त्वचेनुसारच असायला हवे. अनेक ब्रँड्स मिक्स्ड कॉटन पँटी ठेवतात तर काही ब्रँड्स हे कपडे शुद्ध कॉटन असण्याचा दावा करतात. सॅटिन आणि ग्लॉसी कपड्यांमध्ये बरंच अंतर असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसारच कपडे आणि आराम याचा योग्य विचार करून पँटीची खरेदी करा.
- सर्वात पहिले तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कपड्याची अलर्जी नाही ना याबाबत योग्य विचार करा
- अंडरगारमेंट्स हे बजेट बघून नाही तर व्हजायनल आरोग्याची काळजी घेत मगच निवडा
- तुम्हाला जर सतत व्हजायनल इन्फेक्शन अथवा युटीआयचा त्रास होत असेल तर तुम्ही कॉटनची पँटी नियमित वापरा. नायलॉन अथवा सॅटीनच्या पँटीचा वापर तुम्ही करू नका
पँटीचा टाईप स्वतःच तुम्ही निवडा
सीमलेस पँटी (seamless panty) सध्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून ती आपल्याला वापरायलाच हवी असं अजिबात नाही. कारण सीमलेस पँटी ही सिंथेटिक असते आणि यामध्ये अनेक महिलांना आरामदायी वाटत नाही.
- तुमचा पार्श्वभाग हा कर्व्ही असेल तर फुल कव्हरेज अथवा कट शेप पँटीचा वापर करावा
- तुम्हाला हवा येणारी पँटी हवी असेल तर तुम्ही बॉक्सरचा वापर करा
- तुम्हाला लोअर बॅलीचा आधार हवा असेल तर तुम्ही हायवेस्ट पँटी (High Waist Panty) निवडा
- मिड लेंथ पँटी ही लोअर बॅली फॅट विभागते त्यामुळे तुमचे पोट मोठे असेल तर तुम्ही योग्य अंडरवेअरची निवड करायला हवी
टाईट पँटसाठी वापरा सीमलेस पँटी
तुम्हाला जर टाईट जीन्स अथवा टाईट पँट घालयची असेल अथवा तुम्हाला असा ड्रेस घालायचा असेल जो बॉडी हगिंग आहे अथवा बॉडीकॉन आहे तर तुम्ही त्यासाठी सीमलेस पँटीचा वापर करायला हवा. मात्र रोज सीमलेस पँटी घालणं योग्य नाही. पण तुम्ही एखाद्या दिवशी खास ड्रेस घालणार असाल तर मात्र तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता. सीमलेस पँटी घातल्यास, त्याचा आकार कपड्यांमधून दिसत नाही. त्यामुळे याचा वापर केला जातो.
पिअर शेप आकाराच्या शरीरासाठी कव्हरेजवर लक्ष द्या
तुमचे शरीर जर पिअर शेप्ड असेल आणि मागील भाग हा जास्त मोठा असेल तर नेहमी कव्हरेज देणारी पँटीच निवडा. हे तुमच्यासाठी अधिक आरामदायी ठरते. तुम्ही थाँग अथवा कट शेप्ड पँटीदेखील निवडू शकता. मात्र यामुळे मागचा आकार अधिक उठून दिसतो. आरामाचा प्रश्न जिथे येतो तिथे फुल कव्हरेज मिळते. अशावेळी बॉय शॉर्ट्स पँटी तुमच्यासाठी अधिक चांगल्या ठरतात. वास्तविक हे प्रत्येक महिलेच्या आवडीनिवडीनुसार ठरते. तुम्हाला जर थाँग अथवा कट शेप्ड पँटी आवडत असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता.
या लहानसहान टिप्स तुम्ही कधीच दुर्लक्षित करू नका. या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही व्हजायनल आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकता आणि परफेक्ट अंडरवेअरचा वापर करून आरामदायी राहू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक