ADVERTISEMENT
home / पालकत्व
5th month of pregnancy and care tips

गरोदरपणाच्या 5 व्या महिन्यात कशी घ्याल काळजी (5th Month Pregnancy Care Tips)

 

गर्भावस्थेमध्ये अर्थात गरोदरपणाच्या नऊ महिन्यांचे नक्की काय महत्त्व आहे हे प्रत्येक महिलेला माहीत असायला हवे. खरं तर या महिन्यांमध्ये प्रत्येक महिलेचा अनुभव हा वेगळा असतो. आतापर्यंत आपण गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यातील आणि तिसऱ्या महिन्यातील अवस्था काय असते जाणून घेतले आहे. आपण या लेखातून गरोदरपणाचा पाचवा महिना अर्थात 20 व्या आठवड्याबद्दल जाणून घेणार आहोत. या महिन्यात आल्यावर गर्भवती महिलेची त्वचा अधिक चमकदार होते आणि गर्भावस्थेचे रूप तिच्या चेहऱ्यावर दिसू लागतं. गरोदरपणाचे महिने जसजसे वाढत जातात तसंतसं तिच्या शरीरात आणि अगदी स्वभावातही वेगवेगळे बदल होत असतात. गर्भामध्ये बाळाच्या विकासाच्या वाढीमुळे पोटाची वाढ झटपट होऊ लागते. त्यामुळे अनेक शारीरिक समस्यांनाही या काळात सामोरं जावं लागतं. नक्की गरोदरपणाच्या 5 व्या महिन्यात गरोदर महिलांनी कशी काळजी घ्यायला हवी आणि गरोदरपणामध्ये काय काय खाता येईल (5th month of pregnancy and care tips) याच्या काही टिप्स आणि माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत. तुमचा अथवा तुमच्या मैत्रिणीचा पाचवा महिना सुरू असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. तसंच ज्यांना गरोदरपणाच्या पाचव्या महिन्याची माहिती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठीही हा लेख उपयुक्त ठरेल. 

5 व्या महिन्यात दिसून येणारे लक्षणे (Symptoms Of 5th Month)

5 व्या महिन्यात दिसून येणारे लक्षणे

Shutterstock

 

गरोदरपणाच्या प्रत्येक महिन्यात काही लक्षणे ही समान असतात. पण काही लक्षणे नवीनही असू शकतात. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि पोटातील बाळानुसार ही लक्षणे प्रत्येकाला जाणवत असतात. 

थकवा येणे – गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात थकवा येणे हे अत्यंत सामान्य लक्षण आहे. बाळाचं वजन जसेजसे वाढत जाते तसतसा आईचा थकवा अधिक होत जातो. 

ADVERTISEMENT

पाठदुखी – गर्भाशयामध्ये बाळाचा आकार वाढत असल्यामुळे पाठीच्या मागच्या भागामध्ये त्रास होणं हे साहजिक आहे. अधिकाधिक महिलांना संपूर्ण नऊ महिने हा त्रास सहन करावा लागतो. उंची कमी असलेल्या महिलांना हा त्रास जास्त सहन करावा लागतो. 

डोकेदुखी – गरोदर असताना गॅस आणि बद्धकोष्ठता या दोन्ही समस्या अत्यंत कॉमन आहेत. यामुळेच सतत डोकेदुखीचा त्रासही पाचव्या महिन्यात महिलांना जाणवत राहतो. 

नखं तुटणे – या दरम्यान नखांवरही परिणाम होत असतो. साधारण पाचव्या महिन्यापासून गरोदर महिलांची नखं ही कमजोर होतात आणि सतत तुटू लागतात. काही जणींच्या बाबतीत मात्र हे उलटंही होऊ शकतं. हे बरेचदा दुसऱ्या तिमाहीदरम्यान अनेक महिलांना जाणवतं. 

हिरड्यांमधून रक्त येणे – गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात जास्त महिलांना हा त्रास सहन करावा लागतो. हिरड्यांमधून रक्त आल्यास, घाबरून जाण्याची गरज नाही. हार्मोन्स बदलामुळे आणि विटामिन के च्या कमतरतेमुळे ही समस्या निर्माण होते. 

ADVERTISEMENT

श्वास घेण्यास त्रास होणे – प्रोजेस्टरोन हार्मोन्स वाढल्याामुळे अधिक गरोदर महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय वजन वाढल्यामुळेही श्वासाची समस्या उद्भवते. गर्भाशयात जर एकापेक्षा अधिक बाळ असतील तर ही समस्या आधीच सुरू होते. 

योनीतून सफेद पाणी येणे – योनीमधून सफेद स्राव येऊ शकतो. दुर्गंधी नसणारा सफेद आणि अगदी मध्यम स्वरूपाचा स्राव येऊ शकतो. यामुळे जळजळ अथवा खाज येत असेल तर हे अतिशय सामान्य आहे. पण तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

विसरण्याची समस्या – गर्भावस्थामध्ये हार्मोनल बदलामुळे डोक्यावर अर्थात स्मरणशक्तीवरही परिणाम होत असतो. यामुळे बरेचदा बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात. 

पायला सूज येणे – पाचव्या महिन्यापासून साधारण पायाला सूज येणे आणि पाय दुखण्याची समस्या सुरू होते. गर्भावस्थेदरम्यान बाळाच्या पोषणासाठी शरीरात रक्त जास्त तयार होत असते आणि साधारणतः यामुळे पायांमधील नसा ब्लॉक होतात. त्यामुळे पायापासून रक्त हृदयापर्यंत पोहचू शकत नाही. हे लक्षण दिसल्यास, काळजी घ्यावी. 

ADVERTISEMENT

कधीतरी चक्कर आल्यासारखे वाटणे – बाळाचा विकास जसजसा होऊ लागतो. तेव्हा त्याला योग्य प्रमाणात पौष्टिक तत्वांची गरज भासते. त्यामुळे गरोदर असलेल्या महिलेला थकवा येऊन तिला मध्येच चक्कर आल्यासारखेही वाटू शकते. मळमळण्यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

शरीरात होणारे बदल (Changes In Body)

 

गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात बेबी बंप अर्थात पोट वाढलेले दिसायला सुरूवात होते. पण तुम्ही ही गोष्ट सांभाळणे गरजचे आहे. कारण गर्भाचा आकार वाढण्यासह तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात. याशिवाय कोणते बदल दिसतात हे जाणून घेऊया – 

गर्भाशयाचा आकार – आपल्या गर्भाशयाचा आकार वाढून साधारण एखाद्या फुटबॉलच्या आकाराइतका होतो. हीच वेळ असते जेव्हा तुम्हाला जुने कपडे सोडून नव्या स्वरूपातील गर्भावस्थेतील कपडे घालावे लागतात. तसंच पाचव्या महिन्यानंतर तुम्हाला सैलसर कपडे घालावे लागतात. 

पोट खेचले जाणे – पोट वाढल्यामुळे लिगामेंटमध्ये खेचल्यासारखे वाटू लागते. पोट खेचले गेल्यामुळे पोटावर स्ट्रेचमार्क्सही येतात. यासाठी तुम्ही स्ट्रेचमार्क्सचे क्रिम वापरू शकता. पण हे अत्यंत सामान्य आहे. 

ADVERTISEMENT

हातामध्ये उष्णता निर्माण होणे – तुम्हाला अचानक आपल्या हातामध्ये सतत उष्णता जाणवत असेल तर शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे हे जाणवते. त्यामुळे काही महिलांच्या हातावर लाल रेषा येतात. 

केसांमध्येही होतो बदल – गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात केसांमध्येही बदल होतो. अचानक केस जाड होतात आणि केसगळतीही कमी होते. गरोदरपणात नक्की केस का गळतात याचीही काही कारणं आहेत. 

खूप भूक लागणे – या महिन्यात गरोदर असणाऱ्या महिलांना पहिल्या काही महिन्यांच्या तुलनेत अधिक भूक लागते. एका बाजूला काही महिलांना खूप भूक लागते तर काही जणींना मात्र काहीच खावंसं वाटत नाही. ज्याना उलट्यांचा त्रास होतो त्यांना काहीही खावंसं वाटत नाही.

वाचा – वडिलांनी घ्यायची काळजी (Care 7th Month Of Pregnancy In Marathi)

ADVERTISEMENT

बाळाची वाढ (Child’s Growth)

 

पाचव्या महिन्यात पोट साधारण फुटबॉलच्या आकाराचे होते. याचा अर्थ बाळाची वाढ अत्यंत योग्यरित्या होत आहे. पाचव्या महिन्यात नक्की बाळाचा विकास कसा होतो आणि कशी वाढ होते ते आपण जाणून घेऊया.

गर्भातील मुलाचा आकार आणि वजन

गर्भातील मुलाचा आकार आणि वजन

Shutterstock

 

  • पाचव्या महिन्याच्या शेवटापर्यंत गर्भातील बाळ हे साधारण साडेसहा इंचाचे होते 
  • एका निरोगी बाळाचे गर्भातील पाचव्या महिन्यातील वजन हे 226 ग्रॅम इतके असते

वाचा – गरोदरपणात काय खाऊ नये हे पदार्थ

गर्भातील बाळाचा विकास

 

  • पाचव्या महिन्यातील बाळाच्या त्वचेवरील रक्तवाहिन्या दिसणं सुरू होतं 
  • हाडे आणि मांसपेशी पूर्णतः विकसित होतात 
  • तसंच बाळ आता जांभई घेऊ शकतं आणि हलल्यामुळे आळसंही देते 
  • बाळ मुलगा असेल तर पाचव्या महिन्यापर्यंत त्याचे अंडकोष विकसित होतात
  • बाळ जरी मुलगी असेल तर तिचे गर्भाशय विकसित होते आणि त्यामध्ये अंडी तयार होतात 
  • बाळाचे निप्पल दिसतात 
  • फिंगरप्रिंट दिसू लागतात 
  • तसंच हिरड्या तयार होऊ लागतात 
  • किडनी संपूर्ण तयार होऊन काम करू लागते

कशी घ्यावी काळजी (How To Care)

 

गरोदरपणाचा पाचवा महिना हा गर्भवती महिलांसाठी अत्यंत खास असतो. यामध्ये जीवनशैलीपासून ते अगदी खाण्यापिण्यापर्यंत विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही जे काही खाणार आहात, त्याचा संपूर्ण परिणाम हा केवळ तुमच्यावर नाही तर तुमच्या बाळावर होत असतो. या काळात काय काळजी घ्यायची आणि काय खायचे अथवा काय नाही खायचे हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत. 

ADVERTISEMENT

पाचव्या महिन्यात काय खावे (What To eat)

पाचव्या महिन्यात काय खावे (What To Eat)

Shutterstock

 

जास्तीत जास्त पातळ पदार्थ – लक्षात ठेवा की, तुम्हाला दोन जीवांची काळजी घ्यायची आहे. स्वतःची आणि बाळाची. त्यामुळे स्वतःला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. तसंच सूप, कढी अशा स्वरूपाचे पातळ पदार्थही खा 

प्रोटीनयुक्त पदार्थ – बाळाच्या विकासासाठी प्रोटीन अत्यंत गरजेचे आहे. एक निरोगी गर्भावस्थेसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये 21 ग्रॅम अतिरिक्त प्रोटीन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे जेवणात प्रोटीनयुक्त जेवणाचा समावेश करा. त्यासाठी डाळ, पनीर, सोयाबीन, अंडे इत्यादी पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात करा. 

सलाडचे सेवन करा – आपल्या रोजच्या जेवणात सलाडचा समावेश करून घ्या. यामुळे तुम्हाला फायबर मिळते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही. सलाडमध्ये तुम्ही गाजर, टॉमेटो, काकडी या भाज्यांचा समावेश करून घेऊ शकता. तसंच सलाड खाण्यापूर्वी व्यवस्थित धुऊन घ्या. 

ADVERTISEMENT

फळं खा – गर्भावस्थेदरम्यान हे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये भरपूर स्वरूपात विटामिन, खनिजे आणि फायबर असते. जे गर्भवती महिलांसाठी अत्यंत गुणकारी ठरते. तुम्ही सफरचंद, केळे, संत्रे आणि किवी अशी फळे नियमित खावीत 

हिरव्या भाज्या खाण्याची गरज – गर्भावस्थेमध्ये बऱ्याचदा जेवण जात नाही. रोज भाज्या खाऊन तुम्हाला जरी कंटाळा आला तरीही बाळासाठी तुम्हाला हिरव्या भाज्या खाव्याच लागतील. लोह मिळविण्यासाठी पालक आणि ब्रोकोलीचे सेवन करा. तर काही हिरव्या भाज्यांची तुम्ही स्मूदीही बनवू शकता. 

धान्य – गर्भावस्थेमध्ये गहू, तांदूळ, मका आणि ओट्स याचाही समावेश करून घ्यावा. 

काय खाऊ नये (What Not To Eat)

काय खाऊ नये

Shutterstock

ADVERTISEMENT

 

पाचव्या महिन्यात गरोदर महिलांनी काय खायला नको हेदेखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कारण असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. पाचव्या महिन्यात काय खाऊ नये जाणून घ्या. 

कोल्डड्रिंक पिऊ नका – गर्भावस्थेमध्ये कोल्डड्रिंकचे सेवन करू नका. यामध्ये कॅफेन, साखर अशा कॅलरी असतात जे गर्भवती महिला आणि बाळाला नुकसानदायी ठरतात. त्यापेक्षा तुम्ही त्याजागी ताज्या फलांचा रस पिऊ शकता. 

ही फळं खाऊ नका – डाळिंब, कच्ची पपई, अननस या फळांचे अजिबात सेवन करू नका. यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. या फळांमध्ये अति प्रमाणात असलेली उष्णता ही बाळाच्या विकासासाठी घातक ठरते.  

कॅफिन म्हणा नको – पाचव्या महिन्यात चहा, कॉफी, चॉकलेट या सगळ्यापासून दूर राहा. यामुळे जन्मानंतर बाळाला अनिद्रेचा त्रास होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

जंक फूड खाऊ नका – बाहेरील जंक फूड अर्थात पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खाणे टाळा. याशिवाय बाहेरील चाट, भजी असे पदार्थही खाणे टाळा. घरात हवं तर कधीतरी करून खा. पण सहसा मैद्याचे पदार्थ खाऊच नका

दारू आणि तंबाखू – दारू, तंबाखू अथवा सिगरेट याचे सेवन अजिबात करू नका. गर्भवती महिलेच्या मुलाला यामुळे नुकसान पोहचू शकते. 

कच्चे अंडे अथवा कच्चे मांस – तुम्ही अंडे अथवा मांसाहार करत असाल तर व्यवस्थित शिजवूनच खा. कच्च्या अंड्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे फूड पॉईझनिंग होऊ शकते. त्यामुळे कच्चे अंडे वा कच्चे मांस खाणे टाळा. 

पाचव्या महिन्यात करायचा व्यायाम (Exercise)

पाचव्या महिन्यात करायचा व्यायाम

Shutterstock

ADVERTISEMENT

 

निरोगी आणि चांगल्या शरीरासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे आणि गरोदर असतानाही तुम्ही व्यायाम करू शकता. नियमित स्वरूपात श्वासाचा व्यायाम आणि काही महत्वाचे व्यायाम प्रकार तुम्ही पाचव्या महिन्यात करू शकता. 

तितली आसन – या आसनामुळे मांसपेशी मजबूत होतात आणि हे आसन केल्याने नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत मिळते. तसंच संपूर्ण नऊ महिने तुम्ही हे आसन व्यवस्थित करू शकता

पर्वतासन – यामुळे पाय आणि गुडघ्यामध्ये मजबूती मिळते आणि गर्भाशयाशी संबंधित त्रास असतील तर ते कमी होण्यास मदत मिळते 

सुखासन – हे आसन गर्भवती असल्यामुळे होणाऱ्या शरीराच्या त्रासापासून सुटका मिळवून देते. तसंच यामुळे मन आणि डोकं शांत राहण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

वक्रासन – या आसनामुळे बद्धकोष्ठ, कंबरदुखी आणि शरीर आखडत असल्याचा त्रास असल्यास, दूर होण्यास मदत मिळते. गर्भवती महिलांना या समस्या होतातच. 

उत्कटासन – पाठीच्या मागच्या बाजूला मजबूती देण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. याशिवाय हाडांसाठीही हे आसन उपयुक्त ठरते. 

5 व्या महिन्यात करायचे स्कॅनिंग (5th Month Scanning)

5 व्या महिन्यात करायचे स्कॅनिंग

Shutterstock

 

नियमित स्वरूपात बाळाचा जन्म होणार आहे हे कळल्यापासून वेगवेगळ्या चाचण्या आणि स्कॅनिंग करून घ्यावे लगाते. यामध्ये बाळाचा विकास योग्यरित्या होत आहे की नाही हे कळते. पाचव्या महिन्यात नक्की कोणते स्कॅनिंग करायचे ते जाणून घ्या. 

ADVERTISEMENT

कॉर्डोसेंटेसिस टेस्ट – एखाद्या महिलेच्या बाळामध्ये काही समस्या असल्याचे लक्षात आल्यास, डॉक्टर ही टेस्ट करण्याचा सल्ला देतात. या चाचणीमुळे बाळामध्ये क्रोमोसोम असमानता आहे की नाही हे कळून येते. 

एम्नियोसेंटेसिस टेस्ट –  विशेष परिस्थितीमध्ये गर्भावस्थेदरम्यान एम्नियोसेंटेसिस टेस्टदेखील केली जाते. यामध्ये बाळामध्ये स्पाईन बिफिडा, डाऊन सिंड्रोमसारखे दोष तर नाही ना हे पाहिले जाते. 

अल्ट्रासाऊंड टेस्ट – पाचव्या महिन्यात ही सर्वात महत्वाची टेस्ट मानली जाते. अल्ट्रासाऊंडमध्ये बाळाच्या आरोग्याची तपासणी केली जाते. तसंच बाळाच्या शारीरिक वाढीत कोणतीही समस्या नाही ना हे यातून कळते. या टेस्टमधून बाळाचे लिंग कोणते आहे तेदेखील कळते. पण बाळाचे लिंग कोणते हे सांगण्याची परवानगी आपल्याकडे नाही. हा दंडनीय अपराध मानला जातो. 

याशिवाय रक्तदाब, वजन, गर्भाशयाचा आकार मोजणी, युरीन तपासणी, हिमोग्लोबिन पातळीची तपासणी, बाळाच्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज या सगळ्याचीही चाचणी पाचव्या महिन्यात केली जाते. 

ADVERTISEMENT

5 व्या महिन्यात घ्यायची काळजी आणि काय करावे (What To Do In 5th Month)

5 व्या महिन्यात घ्यायची काळजी आणि काय करावे

Shutterstock

 

रॅशेसची घ्या काळजी – गर्भावस्थेमध्ये उष्णतेमुळे काख आणि स्तनांच्या आसपास रॅश येऊ शकतात. यापासून सुटका मिळविण्यासाठी नियमित दिवसातून दोनदा आंघोळ करावी. तसंच रॅशेस येत नाहीत ना याकडेही लक्ष द्यावे. 

डाव्या बाजूला झोपावे – पाचव्या महिन्यात तुमचे पोट बऱ्यापैकी वाढलेले असते. त्यामुळे सामान्य अवस्थेत झोपणे कठीण होते. तुम्ही डाव्या बाजूला अथवा डाव्या कुशीवर झोपावे. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी योग्य आहे. 

सैलसर कपडे घालावेत – वाढत्या पोटामुळे घट्ट कपडे न घालता सैलसर कपडे घालावेत. जेणेकरून श्वास घ्यायला त्रास होणार नाही

ADVERTISEMENT

फायबरयुक्त जेवण खा – या महिन्यात बऱ्याच महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. त्यामुळे यातून सुटण्यासाठी फायबरयुक्त जेवण खा

पोश्चर नीट ठेवा – जेव्हा घरात असाल तेव्हा उठताना आणि बसताना पोश्चरची काळजी घ्या. जास्ती वेळ उभे राहू नका. काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि आराम करा. तसंच जास्त वेळ झोपण्याचा प्रयत्न करा 

बाळाशी बोला – गर्भात वाढणाऱ्या बाळाशी बोला. तुमचा आवाज ऐकून बाळ लाथ मारायला आणि प्रतिसाद द्यायला याच काळात सुरूवात करते. गर्भसंस्काराबद्दल तुम्ही ऐकले आहे. त्यामुळे गर्भसंस्कार पुस्तके वाचून त्याप्रमाणे बाळाशी बोलण्याचा आणि त्याच्याशी अधिक प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. 

काय करू नये (What Not To Do In 5th Month)

काय करू नये

Shutterstock

ADVERTISEMENT

 

  • दारू, कॅफीन आणि सिगरेटचे सेवन अजिबात करू नये. यामुळे होणाऱ्या बाळावर अत्यंत वाईट परिणाम होतो
  • गर्भवती महिलेला आधी एखादं मूल असेल तर तिने त्या मुलाला अजिबात उचलू नये. असे केल्याने तुमच्या पोटावर दबाव पडू शकतो. कोणतीही जड वस्तू उचलणे टाळा. 
  • कोणत्याही प्रकारचे रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळा 

वडिलांसाठी नक्की काय काळजी घ्यायची याच्या टिप्स (Care Tips For Father)

 

आईप्रमाणेच वडिलांच्याही जबाबदाऱ्या असतात. हे बाळ तुमच्या दोघांचेही आहे. त्यामुळे दोघांनीही याची जबाबदारी योग्यरित्या उचलावी. यासाठी वडिलांना काही टिप्स – 

आपल्या जोडीदाराला समजून घ्या – गर्भावस्थेदरम्यान तुम्ही तुमच्या पत्नीला समजून घ्या. तिच्या स्वभावात होणारे चढउतार समजून घेणे गरजेचे आहे. तसंच तिला या काळात जास्तीत जास्त प्रेम द्या आणि भावनिक आधार द्या. 
वेळोवेळी डॉक्टरांकडे घेऊन जा – गर्भवती असल्याने पत्नीला रूटीन चेकअपला घेऊन जायची जबाबदारी तुम्ही उचला. तसंच तुम्हाला असलेले प्रश्न डॉक्टरांना विचारा. 
पोटातील बाळासह बोला – ज्याप्रमाणे आई म्हणून बाळाशी पत्नी बोलते, हात लावते तसंच त्या बाळाच्या वडिलांनीही त्याच्याशी बोलणे आणि पोटाला हात लावून आपला स्पर्श जाणवून देणे गरजेचे आहे. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. पाचव्या महिन्यात साधारण किती खायला हवे?

पाचव्या महिन्यात महिलांना रोज 340 अतिरिक्त कॅलरी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. तसंच तुम्ही कॅलरी मिळविण्यासाठी जे खाल ते पौष्टिक असायला हवे याची नक्की काळजी घ्या.

2. पाचव्या महिन्यात किती वजन वाढायला हवे?

पाचव्या महिन्यात साधारण दोन किलो वजन वाढायला हवे. तसंच संपूर्ण 9 महिन्यात महिलांचे वजन साधारण 11 ते 16 किलो इतके वाढते. दुसऱ्या तिमाहीमध्ये किमान दोन किलो तरी वाढायलाच हवे.

3. पाचव्या महिन्यातही चक्कर येण्याचा त्रास असू शकतो का?

हा त्रास कोणत्याही महिन्यात होऊ शकतो. प्रत्येक महिलेच्या हार्मोन्स बदलानुसार हा त्रास होतो. काही महिलांना हा त्रास अजिबात होत नाही. पण चक्कर ही कोणत्याही महिन्यात येऊ शकते.

20 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT