आपल्याकडे लोकांना भूतांच्या गोष्टी खूपच आवडतात. अशा ठिकाणांबद्दल बोलणं आणि त्याच्या गोष्टी मित्रांमध्ये सांगणं याची मजाच काही वेगळी असते. देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे रात्री जाणं खूपच भयावह वाटतं. अशा haunted जागांची चर्चा नेहमीच होत असते. दिल्लीतील भानगढ किल्ला तर यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तर त्या ठिकाणची माहिती नक्कीच काढता. एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना ही जागा haunted तर नाही ना असाही प्रश्न बरेच जण विचारतात. आम्ही तुम्हाला भारतातील अशी 7 ठिकाणं सांगणार आहोत, जी haunted असल्याचं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही रात्री एकटं न जाणंच चांगलं असंही म्हटलं जातं. पण तुम्हाला यामध्ये साहसी आणि मजा येणार असेल तर तुम्ही याचा अनुभव घेण्यासाठी नक्की जा.
1. अग्रसेन बावडी – दिल्ली
अग्रसेन बावडी ही दिवसाढवळ्या अशी जागा आहे जिथे प्रचंड प्रमाणात तुम्हाला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. बावडी अर्थात विहीर. ही अतिशय खोल असणारी विहीर म्हणजे पुरातन काळातील उत्तम नमुना आहे. पण तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर इथे गेल्यानंतर तुमच्या शरीरातून एक झिणझिण होत राहते किंवा तुम्हाला Nausea-tic feelings सुद्धा येऊ शकतात. इथे बरेच विद्यार्थी येतात आणि मस्तीही चालू असते पण तरीही रात्री मात्र या ठिकाणी कोणीही येत नाही. इथल्या गोष्टी नेहमीच मीठमसाला लावून सांगितल्या जातात.
2. कुलधरा गाव- राजस्थान
1200 वर्षांपासून या गावामध्ये कोणीही राहात नाही. असं म्हटलं जातं की, या गावामध्ये तुम्हाला जर रात्र काढायची असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरेल. बऱ्याच वर्षांपूर्वी या गावातील काही लोकांनी या गावात कोणीच राहू शकणार नाही असा शाप दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत या गावात कोणीही राहात नाही. कोणीही या गावात चुकून जरी राहिलं तरी त्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो असंही म्हटलं जातं.
3. मलचा महल- दिल्ली
ही जागा पूर्वी राजा महाराजांच्या अखत्यारीत होती. पण या जागेबद्दल एक कथा सांगण्यात येते. या कथेनुसार, या ठिकाणी एका महिलेने आत्महत्या केली आणि तिचं शरीर या महालात अनेक दिवसांपर्यंत तसंच राहिलं होतं. तर काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी रात्री एक महिला धावताना आणि केस सोडलेली दिसते. पण नंतर ती महिला गायब होते. या आणि अशा अनेक कथा सांगितल्या जातात. पण काही व्यक्तींना इथे गेल्यानंतर असा अनुभव आलेला नाही.
4. GP ब्लॉक- मीरत
या ठिकाणाबद्दल अशी कहाणी आहे की, इथे लोकांना दारूड्यांचं भूत दिसतं आणि बऱ्याच वर्षांपूर्वी काही मित्र होते आणि त्यांचं इथे निधन झाल्यानंतर याठिकाणी हे मित्र अजूनही इथे मैत्री निभावत असल्याचं सांगण्यात येतं. पण हे कोणालाही त्रास देत नाहीत असंही सांगण्यात येतं. पण भीती वाटत असल्यामुळे इथे कोणीही जात नाही.
5. राज किरण हॉटेल- लोणावळा
लोणावळाच्या या हॉटेलबद्दल नेहमीच भयावह कथा सांगितल्या जातात. याठिकाणी राहून आलेल्या लोकांच्या अनुभवावरून इथे जाणं लोकांनी कमी केलं आहे. इथे गेलेल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे इथे मध्यरात्री कोणीतरी दरवाजावर येऊन खटखट करून जातं. तसंच रात्रभर इथे चित्रविचित्र आवाज येत राहतात. इतकंच नाही तर अर्ध्या रात्री दरवाजाला आतून कडी असली तरीही अचानक तुमच्या अंगावरची चादर गायब होते. या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे जर बघायचं असेल तर तिथे थांबूनच ते जाणून घ्यावं लागेल.
6. साऊथ पार्क स्ट्रीट cemetery- कोलकाता
याठिकाणी गेल्यानंतर जी व्यक्ती फोटो क्लिक करते त्या व्यक्तींना वाईट शक्तींच्या प्रभावाला सामोरं जावं लागतं असं म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी गेल्यानंतर लोक इथे फोटो काढायला घाबरतात. इथे लोक या कथा माहीत असूनही जातात. पण फोटो काढत नाहीत. यामध्ये किती खरं आणि किती खोटं हे तिथल्या लोकांच्या अनुभवावरून आपल्याला ठरवावं लागतं.
7. शनिवारवाडा- पुणे
बाजीराव मस्तानी ही जोडी कोणाला माहीत नाही? शनिवारवाडा ही जागा पुण्यातील अतिशय प्रसिद्ध जागा आहे. दिवसभर याठिकाणी तुम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पण पुण्यातील प्रत्येक माणूस इथल्या भूताच्या गोष्टी सांगत असतो. पौर्णिमेच्या दिवशी या वाड्यात वाईट शक्तींचा वावर असतो असं म्हटलं जातं. शिवाय याठिकाणी नेहमी ‘काका मला वाचवा’ अशी आरोळीही ऐकू येते असंही सांगण्यात येतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी याठिकाणी जायला मनाई तर आहेच. पण सहसा इथे कोणीही जाण्याचं धाडसही करत नाही. अतिशय शांत असणाऱ्या याठिकाणी रात्री अतिशय भयावह वाटतं.
वास्तविक अशी haunted ठिकाणं आपल्याला माहीत असली तरीही आपल्याला मराठीतील ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ ही म्हण माहीतच आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना रात्रीच्या काळोखाची भीती असल्याने आणि मनात सतत भूत या संकल्पनेचा विचार असल्यानेच भीती वाटत असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण तरीही अशा तऱ्हेच्या कथा रचून एकमेकांना सांगण्यात इथे कोणाचाच हात धरता येत नाही.
हेदेखील वाचा
ही प्रचलित भूतं कधी तुमच्या वाट्याला आली आहेत का?
अर्चना पूरन सिंहला भूतापेक्षा ‘या’ व्यक्तीची वाटते भीती
महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे