ADVERTISEMENT
home / Family
Aaji Aajoba Quotes In Marathi

Aaji Aajoba Quotes In Marathi | लाडक्या आजी-आजोबांसाठी कोट्स

घरात आजी-आजोबा असले की, घरातील वातावरण वेगळंच असतं. आई-बाबांपैकी कोणी ओरडलं की मायेचा हात फिरवायला आणि त्या फटक्यांपासून संरक्षण करायला आजी-आजोबा ढालीसारखे तत्पर असतात. सतत लाड करण्यासाठी आपले सगळे हट्ट पुरवणारे आजी-आजोबा आयुष्यात फारच स्पेशल असतात. खूप नशीबवान असतात अशी लोक ज्यांना आजी- आजोबांचे प्रेम मिळते. तुमच्या आठवणीच्या पोतडीतून एखादी आजी- आजोबांची आठवण काढायची झाली तर त्यांची कोणती आठवण तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद देऊन जाते याचा विचार करा. आजी-आजोबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जर तुम्हाला शब्दांची जोड हवी असेल तर आम्ही आजी-आजोबा कोट्स (Aaji Aajoba Quotes In Marathi निवडले आहेत. शिवाय आजी- आजोबांसाठी काही निवडक कविताही शोधून काढल्या आहेत. आवडल्यास नक्की शेअर करा आजी-आजोबांसाठीचे हे खास कोट्स, कविता, स्टेटस.

Aaji-Aajoba Quotes In Marathi | आजी-आजोबा कोट्स

Aaji - Aajoba Quotes In Marathi
Aaji-Aajoba Quotes In Marathi

आजी- आजोबांचे स्थान आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यातील त्यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी पाठवा आजी- आजोबा कोट्स.

  • आजी-आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखी…
    थोडीच लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी!
  • आजी आजोबा आहे आयुष्याचे असे पान ज्यात भरले आहेत फक्त लाडच लाड
  • तिच्या बटव्यामुळे बालपण समृद्ध झाले…
    आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं ते पात्र आहे…
    ती आहे माझी ‘आजी’
  • नातवंडाचे पहिले मित्र- मैत्रीण असतात आजी-आजोबा…
    जे नातवंडाच्या वयाचे बनून देतात आपल्याला साथ
  • देवा एक काम कर आयुष्यात जर कोणाला परत पाठवायचे
    असेल तर माझे आजी-आजोबा पाठव कारण
    या जगात मला समजून घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे
    आजी-आजोबा
  • आजी- आजोबा
    अनुभवातून तुम्ही दाखवली
    नवी वाट…
    बालपण घडवून तुम्ही दिली
    आयुष्याला नवी वाट
  • आजी-आजोबा असतात आयुष्याचा आधार
    त्यांच्या आठवणींमुळे नेहमीच मिळतो आयुष्याला आधार
  • आजी- आजोबांबद्दल बोलताना शब्दही कमी पडतात
    कारण त्यांच्या प्रेमाचा महिमा शब्दात मांडता येत नाही
  • आई-बाबानंतर सगळ्यात जवळचे असते आजी- आजोबा
    त्या देतात आयुष्याला नवी दिशा
  • आजी- आजोबा तुम्ही नसलात तरी तुमच्या प्रेमाची सावली अशीच राहूदे
    तुमच्या प्रेमात आम्हाला सतत ऋणी राहू दे
  • सुरकुतलेले हात कायम मायेचा आधार देतात
    माझे आजी- आजोबा मला खूप आवडतात.
  • आजोबांनी दिला आधार
    आजीने केली माया
    तुमच्यामुळे मिळाली माझ्या आयुष्याला नवी आशा
  • आजी तुझी आठवण रोज मला येते
    तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रोज झोपावेसे वाटते
  • प्रत्येक जन्मी मला मिळावे तुमच्यासारखे आजी-आजोबा
    बस्सं हीच आहे इश्वरचरणी प्रार्थना
  • आजी होतीच माझी
    दुसरी आई
    प्रेमळ त्या विठूची ‘रखुमाई’

वाचा – Father’s Day Quotes In Marathi

Aaji-Aajoba Status In Marathi | आजी-आजोबा व्हॉटसअॅप स्टेटस

Aaji-Aajoba Status In Marathi
Aaji-Aajoba Status In Marathi

हल्ली व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवायलाही खूप जणांना आवडते. जर तुम्हाला या स्टेटसवरुन आजी- आजोबांवरील प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्ही स्टेटसही ठेवू शकता.

ADVERTISEMENT
  • आजी- आजोबा असते दुधावरची साय, जी वाढवते आयुष्याची गोडी
  • आजी- आजोबा असतात म्हणूनच सगळ्या गोष्टी नीट चालतात
  • आजी करते माया, आजोबा करतात संस्कार… म्हणूनच आयुष्यात त्यांची जागा कोणीच भरुन काढत नाही
  • काहीही बोला प्रत्येक आजी- आजोबा असतात आपला जीव की प्राण!
  • कितीही चिडले तरी माया करायचे सोडत नाही… आजी- आजोबांशिवाय आयुष्यात काहीच होत नाही.
  • आयुष्य खऱ्या अर्थाने समजावतात ते असतात आजोबा
  • आजोबा असतात आधार आणि आजी असते मायेची चादर 
  • मायेचा ओलावा…. प्रेमाची सावली… आजी- आजोबांनी दिली मायेची सावली
  • तू शिवलेल्या गोधडीत आजही येते शांत झोप.. आजी तुझ्याशिवाय आता नाही करमत
  • पुन्हा पुन्हा तूच यावीस माझी आजी बनून… तुझ्याशिवाय माझा लागत नाही कुठेच जीव 
  • आजोबा तुमची सर कोणत्याच मित्रात नाही… तुमच्याशिवाय माझा कोणीच बेस्ट फ्रेंड नाही
  • आजोबा आहे पहिला मित्र.. जो समजून घेतो आणि समजावतो
  • हट्ट पुरे करावे तर आजी-आजोबांनी कारण त्यात वेगळीच मजा असते
  • आजी तुझ्या सुरकुतेल्या हातांना पकडून वाटते निघून जावे दूर जिथे असेल तू आणि मी… आणि आपल्या आठवणींची चाहूल
  • आजी तु्झ्या गोड आठवणी मला रोज आनंद देते.

वाचा – कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे फॅमिली कोटस

Aajoba Kavita In Marathi | आजोबांवर मराठी कविता

Aajoba Kavita In Marathi
Aajoba Kavita In Marathi

आजोबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आजोबांवरील काही भावनिक कविताही तुम्ही पाठवू शकता. खास आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ही शेअर करा.

  • नातवाचा पहिला मित्र
    आईवडिलांचा जीव की प्राण
    प्रेम व्यक्त न करताही ह्रदयात प्रेमाची खाण
  • नातवंडाबरोबर बालपणात रमून जाई
    त्यांना शेवटचा मित्र बनवून घेई
    जरी न लाभता सहवास जास्त
    जीव मात्र एकमेकांमध्ये अडकून राही
  • आ- आयुष्यभर कष्ट करुन मुलांचे आणि नातवंडाचे संगोपन करते
    जो -जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सगळ्यांना बांधून ठेवतो.
    बा- बालपण हे म्हातारपणाचं दुसरं रुप असतं. जे नातवंडाना खेळवण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जातं 
  • आजोबा आजी जीवनाचा आधार
    कधीही करु नका त्यांचा अवमान
    त्यांच्या येण्याने मिळेल प्रेम आणि माया
    त्यांना तुम्ही नेहमी जपा
  • सफेद सदरा, सफेद फेस
    असा आहे त्यांचा वेष
    थोडी मिरची थोडी गोड
    कधी कधी करतात थोडी खोड
    एकदम परफेक्ट जेवणाचं ताट
    लगेच मी मारतोय हाक
    अजूनही मजबूत आहेत
    करतात आमचे लाड
    असे आहेत आमचे आजोबा
  • आजोबांसोबत असते एक गोड नाते
    कधीही न विरणारे असे प्रेमळ नाते
    आजोबा असतात कुटुंबाचा आधार
    कायम देतात जगण्याला आधार
    आजोबा तुम्ही आहात आमचा सर्वस्वी आधार
  • कमी बोलतात तरी, काळजी घेतात आमची
    वय झाले तरी जबाबदाऱ्या पार पाडतात सारी
    आजोब नावाचे आहे हे अनोखे रसायन
    जे कधीच थकत नाही आणि थांबत नाही
    कुुटुंबावर येता आच उभे ठाकतात समोरी
    त्यांना नसते मोह-माया हवी असते प्रेमाची माया खरी
  • आजोबा तुम्ही नसता तेव्हा अस्वस्थ होतं माझं मन
    तुमच्या काठीचा आवाज येता मनावरचे जाते दडपण
    आजोबा तुम्ही नसता तेव्हा आयुष्य वाटते अपुरे
    तुमच्या येण्याने जीवनात येतात आनंदाचे झरे
  • आजोबा तुमचे कठोर शब्द देतात आम्हाला प्रेरणा
    तुमच्या असण्याने मिळते आयुष्याला नवी दिशा
    देवा आजोबांपासून मला कधी वेगळे करु नकोस
    कारण त्यांच्याशिवाय माझ्या आयु्ष्याला नसेल कोणतेही वळण

वाचा – Aai Quotes In Marathi

Aaji Kavita In Marathi | लाडक्या आजीवर कविता

Aaji Kavita In Marathi
Aaji Kavita In Marathi

आजी असतेच खूप खास तिच्यावरील कविता करतात भावनिक पण करुन देतात तिची आठवण.

ADVERTISEMENT
  • आजी म्हणजे जन्मभर
    काढल्या खस्ता केले कष्ट
    ‘तू’ म्हणजे त्या सगळ्याची
    शेवट असलेली गोष्ट
  • नुसतंच कथा पुराण झालं
    देव काही दिसला नाही
    कुशीत येतो तेव्हा कळतं
    कृष्ण काही वेगळा नाही- संदीप खरे
  • वर्षानुवर्षे गेली, संसाराचा सराव झाला,
    नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा ल्याला
    पैठणीच्या घडीघडीतून, अवघे आयुष्य उलगडत गेले
    सौभाग्य मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले- शांता शेळके
  • डोळ्याची पापणी लवते तेव्हा तेव्हा…
    आजी तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा
    आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर पान
    खूप आठवणी…. गोष्टी आणि संस्काराचा साठा छान
    नातवंडांना आवडणारी, लाड पुरवणारी
    आई-वडिलांचा मार चुकविणारी
    कुशीत घेऊन झोपवणारी,
    कडेवर घेऊन फिरणारी,
    हळव्या मनाला समजून घेणारी
    जुन्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारी
  • अजूनही हवाहवासा वाटतो
    तुझ्या मायेचा स्पर्श
    अजूनही ऐकावाश्या वाटतात,
    तुझ्या राजा-राणीच्या गोष्टी
    अजूनही आठवतात चांदोमामांची गाणी
    अजूनही हवीशी वाटते,
    तुझ्या मायेची कुस
    अजूनही हवीहवीशी वाटते तू
    परमेश्वराने द्यावे तुला दीर्घायुष्य
    आजीची ती प्रेमळ हाक
    तिच्या पदराची सावली
    आणि तिच्या सुरकुतलेल्या हातांनी
    चेहऱ्यावर मायेने फिरवलेला हात
    कितीही मोठे झालो तरी तिला विसरु शकत नाही
    आजी, तुझ्यासारखी या जगात दुसरी कोणीच असू शकत नाही
  • थरथरणाऱ्या हातांची
    मऊशार माया वाटते
    हवीहवीशी मनात साठवाया
    तिच्या मांडीवर डोके ठेवून
    आकाशातल्या चांदण्या मोजव्यात
    तिने सांगितलेल्या कथेत
    स्वत:चा  एक नवीन शोध लागावा
    तिचा पदर धरुन ,
    मगं मागे-मागे फिरावं
    बाबांकडे हट्ट पुरवण्यासाठी
    तिला लाडीगोडी लावावं
    तुझ्या हाताची चव
    या जगात कुठेही नाही
    आणि तू घास भरवल्याशिवाय
    माझी भूक संपत नाही
    तुझ्या नि: स्वार्थ प्रेमाची छाया
    नको सोडूस कधी,
    कारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला
    पूर्णत्व येणार नाही!
  • सोडवावे प्रश्न म्हटले तरी सुटत नाही
    आजी तुझ्या सारखे तोडगे कोणाकडेच नाही
    कधी भातुकलीच्या खेळात माझी मैत्रीण झालीस तू,
    तर कधी खडखडीत रागावून प्रेमाचे धडे दिलेस तू
    कधी ओवी कधी अभंग गाऊन निजवलेस तू
    तर कधी गोष्टीतून अलगद मनावर संस्कार केलेस तू
    तुझ्यासवे राहून जागरण आणि देवाची गोडी लागली
    मऊ अशा मातीच्या गोळ्याला तू आकार देत राहिलीस
    पुन्हा व्हायचं आहे गं लहान..तुझ्या कुशीत मावण्याएवढं
    झालीस कितीही दूर तरी तुझ्यावर प्रेम आहे आभाळाएवढं
  • आजी माझी जशी चंद्रकोर
    जगण्याचा तिचा अनुभव थोर
    भाळ्यावर तिच्या आठी
    शिकवताना जीवनातील आडकाठींच्या गाठीभेटी
    तरी धडधाकट आहे माझी आजी
    बनवते ती रुचकर भाकरी आणि भजी
    आजीच आमचा पाया
    आणि आजीचीच आमच्यावर अफाट माया

वाचा – आईसाठी करा खास आईच्या कविता

Aaji-Aajoba Charolya In Marathi | आजी-आजोबा चारोळ्या

Aaji-Aajoba Charolya In Marathi

Aaji-Aajoba Charolya In Marathi

आजी- आजोबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही चारोळ्याही पाठवू शकता. तसंच आजीआजोबा आजारी असल्यास त्यांना लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश ही पाठवा.

  • लहान असताना न समजलेले काही अर्थ
    आजी झाल्यावर उमगतात
    आणि आठवत राहते
  • आपल्या आजीच्या मायेची साय- विजया साठे
    आपल्यावर जीव लावते ती आजी
    दोनच शब्दात व्यक्त होणारी
    मायेची ती अनोखी माऊली
  • आजी म्हणजे एक उपचार
    भूगोलाचा ती समाचार
    ऐकवते चांगल्या गोष्टी चार,
    नाही ऐकल्या देते प्रेमाने मार
  • दिवसाचा सूर्य म्हणजे आजी
    रात्रीची चांदणी म्हणजे आजी
    अंधारातल्या पणतीचा प्रकाश म्हणजे आजी
    सर्वांना प्रेमाने जवळ करणारी असते फक्त आजी!
  • आपले जीवन फुलवणारे माळी
    आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
    सदैव आपली बाजू घेणारे
    आणि आपल्याच बाजूने न्याय देणारे
    असे आपले आजी- आजोबा
  • आईच्याही कुशीत जाण्याआधी
    होतो तुझ्या मिठीत मी
    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
    दिलीस मला साथ तू
    माझ्यासाठी असशील माझ सर्वस्व तू
    अशी माझी आजी
  • बाबा नसताना झालास तू माझा मित्र
    माझ्यासोबत वेळ घालवून केलेस माझ्यावर संस्कार तू
  • सुरकुतलेल्या हातांचा तो स्पर्श आजही हवा डोक्यावर
    उचलून हातात काठी आजही वाटे फिरावे रानावनात तुमच्या पाठी
    तुमची जागा कधीही निघणार नाही भरुन
    तुमच्या आठवणींने डोळे सतत येतात भरुन

आता आजी-आजोबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हे कोट्स नक्की पाठवा आणि मित्रांसोबतही शेअर करा.

ADVERTISEMENT

You Might Like This:

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, स्टेटस आणि कोट्स – Condolence Message In Marathi
मदर्स डे मैसेज
Mom Quotes in Hindi
Heart Touching Mothers Day Poem in Hindi

25 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT