ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
नवाझुद्दीन सिद्दीकीच्या विरोधात पत्नीची पोलिसात तक्रार

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या विरोधात पत्नीची पोलिसात तक्रार

अभिनयाची जादू दाखवत कोणताही सिनेमा आणि वेबसीरिज हिट करणारा नवाझुद्दीन सध्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वादामुळे त्याचे नाव प्रकाशझोतात आले आहे. त्याची पत्नी आलिया नवाझुद्दीन आणि त्याच्यामधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून बिघडले आहेत. ही दोघं घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनाही मध्यंतरीच्या काळात उधाण आले होते. पण कोरोना दरम्यान सगळे काही शांत असताना आता पुन्हा एकदा आलिया सिद्दीकीने हा वाद उकरुन काढला आहे. नवाझुद्दीन आणि त्याच्या कुटुंबाविरोधात आलियाने पोलिसांमध्ये धाव घेत सगळ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नेमंक हे प्रकरण काय ते आता जाणून घेऊया.

अनुष्का शर्माचा नवा फोटो विरुष्काच्या फॅन्समध्ये होत आहे वायरल

या आधीही केली तक्रार

नवाझुद्दीन सिद्दीकीविरोधात या आधीही त्याच्या पत्नीने तक्रार केली आहे. घरगुती भांडण आणि हिंसा या विरोधात तिने त्याच्या कुटुंबियांविरोधातही तक्रार केली आहे. या आधी जुलै महिन्यात तिने मुंबई पोलिसांमध्ये धाव घेऊन नवाझुद्दीन आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार केली होती. पण नवाझुद्दीन मूळ उत्तरप्रदेश येथील असल्यामुळे मुंबई पोलिसांनी मुझ्झफरपुर येथील बुढाना पोलिसस्टेशनमध्ये ही तक्रार स्थानांतरीत केली. त्यामुळे आलियाला बुढाना येथे जाऊन पुन्हा एकदा या प्रकरणासंदर्भातील अधिक माहिती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन द्यावी लागली. 

झाला होता अत्याचार

 आलियाने केलेल्या तक्रारीनुसार 2012 साली नवाझुद्दीनचा भाऊ मिन्हाझुद्दीन सिद्दीकी याने तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला होता. या संदर्भात तिने कुटुंबाला आणि नवाझला तेव्हाच माहिती दिली होती. पण नवाझच्या कुटुंबाने घरातील गोष्ट घरातून बाहेर जाऊ नये यासाठी तिला गप्प बसण्यास सांगितल्याची माहिती तिने या तक्रारीमध्ये केली आहे. यामध्ये कुटुंबानेही चुकीच्या बाजूने झुकते माप दिल्यामुळे आणि नवाझनेही या प्रकरणात कुटुंबाची साथ दिल्यामुळे तिने या आधीही घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. सध्या या प्रकरणात पोलिस सगळ्यांचा जवाब नोंदवून घेत आहे. 

ADVERTISEMENT

मलायकाला सतावतेय म्हातारी होण्याची भीती, लवकर लस शोधा म्हणाली मलायका

कुटुंबाने नाकारले आरोप

कुटुंबाकडे या संदर्भात विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी आलिया ही खोटारडी असल्याचे म्हटले आहे. असा कोणताही प्रसंंग कधीच घडला नाही असे सांगितले.  आलिया बुढानाला येऊन गेली पण ती नवाझुद्दीनला भेटली सुद्धा नाही. असेही कुटुंबाने सांगितले आहे. आता पुन्हा एकदा आलियाने तक्रारसत्र सुरु केल्यामुळे नवाझुद्दीन आणि आलिया यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. 

नवाझुद्दीनसोबतचा कॉल केला वायरल

आलिया- नवाझुद्दीनच्या प्रकरणात नवाझुद्दीनने आतापर्यंत फार काही माहिती दिलेली नाही. किंवा त्याने सोशल मीडियावर फार काही सांगितले ही नाही. तर दुसरीकडे आलियाने जून महिन्यात त्याच्यासोबत झालेला एक फोन कॉल रेकॉर्ड करुन  तो ट्विटरवर पोस्ट केला होता. यामध्येही नवाझ फार काही बोलताना दिसत नाही. या आधी आलियाने तो चांगला नवरा  आणि पिता नाही. तर तो आलियाला त्रास कसा देता येईल, याचा विचार करुनच घरी येतो. असा आरोप केला होता. शिवाय नवाझुद्दीनचे बाहेर प्रेमप्रकरण असल्याचा दावाही तिने केला होता. 

आता आलियाचे आरोप पाहता नवाझुद्दीन या प्रकरणात काय बोलणार याकडे त्याच्या फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे.

ADVERTISEMENT

सारा अली खानचे नाव का येत आहे ड्रग्ज प्रकरणात, काय म्हणाली रिया

14 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT