Advertisement

मनोरंजन

अखेर आमिर अली आणि संजिदा शेख विभक्त

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jan 7, 2022
aamir-ali-and-sanjeeda-shaikh

Advertisement

आमिर अली (Amir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) ही टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी अखेर विभक्त झाली आहे. 2020 पासून हे दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अखेर आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. याबाबत दोघांनीही कोणतेही स्टेटमेंट दिले नसून दोघांनाही आपले आयुष्य खासगी असावे असं वाटत आहे. दरम्यान या दोघांची सरोगेट मुलगी आहे, जिचा ताबा आता संजिदाकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे.  आमिर अली आणि संजीदा शेख ही लहान पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय जोडी होती. त्यांच्या अचानक अशा वेगळं होण्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही दुःख झाले आहे. त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचे गेल्या दोन वर्षांपासून समोर येत आहे. अखेर यावर पडदा पडला असून हे दोघेही विभक्त झाल्याचे आता समोर आले आहे. 

अधिक वाचा – सिंधुताई सपकाळांच्या कार्याला सलाम, चित्रपटातूनही उलगडला होता प्रवास

आमिर आणि संजीदाची चुप्पी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर आणि संजीदा दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. मात्र या दोघांकडूनही कोणतीही पुष्टी यासंदर्भात मिळालेली नाही. आपल्या घटस्फोटाबाबत कोणतेही विधान या दोघांनाही कारयाचे नसून आपल्या नात्यातीत प्रत्येक बाब ही खासगी असायला हवी असा दोघांचा निर्णय असल्याचे समजत आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. ‘क्या दिल में है’ च्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि काही वेळ डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला साधारण 9 वर्ष झाली होती आणि त्यांच्या नात्यात कुरबुरी सुरू झाल्याच्या चर्चांना ऊत आला. तर संजीदा आमिरला सोडून आपल्या माहेरी येऊन राहू लागली. मात्र आता हे दोघे कायमचे वेगळे झाल्याचे समोर आले आहे. 

अधिक वाचा – धक्कादायक! कपिल शर्मा फेम या अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

चाहत्यांनाही दुःख

आमिर अली आणि संजीदा शेख दोघांनीही अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तर संजीदा गेले दोन वर्ष मॉडेलिंगही करत आहे. दोघांनाही सरोगसीद्वारे मुलगी आहे. सध्या या मुलीचा ताबा संजीदाकडे आहे. मात्र आमिरचेही आपल्या मुलीवर खूपच प्रेम आहे. मुलीच्या जन्मानंतरच दोघेही विभक्त झाले आहे. त्यामुळे नक्की दोघांमध्ये काय बिनसले हे कोणालच कळू शकलेले नाही. अभिनयासह दोघेही उत्तम डान्सरही आहे. एक नृत्य रियालिटी शो देखील या दोघांनी जिंकला आहे. दरम्यान या दोघांचेही अनेक चाहते आहेत. त्यांनी एकत्र राहावं असंच सर्वांना वाटत होतं. मात्र दोघेही विभक्त झाले असल्याच्या बातमीमुळे चाहत्यांनाही दुःख झाले आहे. इतकं असलं तरीही दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून आले असून सोशल मीडियावर दोघेही सक्रिय असतात. आमिर सध्या नव्या वर्षात फिरत असून संजीदा आपल्या नव्या नव्या प्रोजेक्ट्सवर काम करताना दिसून येत आहे. तर आपल्या मुलीसह अनेक रिल्स आणि व्हिडिओ दोघेही शेअर करत असतात. दोघांची मुलगीही अत्यंत गोड असून तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

अधिक वाचा – तनिषा मुखर्जीने केलं लग्नाचं सत्य उघड, यासाठी पायात घालते जोडवी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक