सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर डिप्रेशन या भयंकर आजाराबद्दल सगळेच भरभरुन बोलत आहेत. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे पुढे काय करायचे? याचा मार्ग सापडत नाही. योग्यवेळी मदत घेतली तर या महासागरातून अगदी व्यवस्थित बाहेर पडता येतं. गेल्या काही दिवसांपासून काही सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं मांडत आहे. आमिर खानची मुलगी इरा खान ही देखील गेल्या 4 वर्षांपासून तणावाखाली आहे. आयुष्यात काय करावे ? हे तिला कळत नव्हते. एका सुपरस्टारची मुलगी म्हणून लोकांच्या असलेल्या अपेक्षा आणि आयुष्यातील हरवलेली दिशा यामुळे ती डिप्रेशनमध्ये होते. पण आता ती यातून बाहेर आली असून तिने आपला अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या लग्नसोहळ्यातील आनंंदाचे क्षण, फोटो व्हायरल
इराने सांगितली आपबिती
इरा तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिने World Mental Health च्या निमित्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ती त्यामध्ये आपला एक अनुभव सांगत आहे. साधारण चार वर्षांपासून ती डिप्रेशनमध्ये होती. तिने योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर तिला ती क्लिनिकल डिप्रेस्ड असल्याचे कळले. योग्यवेळी सल्ला घेतल्यामुळे मी आता बरी आहे. आता मला फार चांगले वाटत आहे.त्यामुळेच मी माझा हा अनुभव शेअर करत आहे. तिने व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना आयुष्याचा अर्थ समजत नसेल आणि त्यांना काय करावे हे कळत नसेल अशांनी हमखास योग्य तो सल्ला घ्यायला हवा.
याला जीवन ऐसे नाव
इराने लिहलेली कॅप्शन ही फार सुंदर आहे. आयुष्य जगताना कधीकधी अशा गोष्टी समोर येतात. ज्यामुळे काय करायचे हे कळत नाही. मार्ग सापडत नाही असे वाटत राहते. काहीगोष्टी भ्रामक आणि नको तो निर्णय घ्यायला भाग पाडतात. पण आयुष्य हे असेच आहे. म्हणूनच याला जीवन ऐसे नाव आहे. आलेला प्रत्येक क्षण कसा जगायचा ते आपण शिकायलाच हवे. तरच फायदा.
इरा एक टॅटू आर्टिस्ट
आमिर खानची मुलगी अशी ओळख असल्यामुळे अनेकदा दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती निर्माण होते. आमिर खानची मुलगी एका स्टार किडची मुलगी म्हणून इराकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते. पण इरा या क्षेत्राशी निगडीत नाही. तिने जे काही काम केले आहे. ( दिग्दर्शनाचे) ते तुलनेने लोकांच्या अपेक्षाला उतरलेले नाही. पण इरा एक उत्तम टॅटू आर्टिस्ट आहे. तिने अनेकांच्या हातांवर आतापर्यंत टॅटू काढले आहेत. तिने तिच्या ट्रेनरच्या हातावरही टॅटू काढला होता. ज्यानंतर ती उत्तम टॅटू आर्टिस्ट असल्याचे म्हटले जाते.
अभिनेत्री आशा नेगीने ‘या’ अभिनेत्याच्या मारली कानाखाली, झाले व्हायरल
योग्यवेळी संवाद साधा
डिप्रेशन हा असा आजार आहे जो तुम्हाला बाहेरुन दिसत नाही. पण तो तुम्हाला आतून पोखरत असतो. जर तुम्हाला असं काही होत असेल तर तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा तरच तुम्हाला त्यातून योग्यवेळी बाहेर पडता येईल.
इरा खानचे हे अनुभव अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कलाकारांनी व्यक्त केल्या भावना